आपले पालघर

कोकणच्या उत्तर भागास असलेला पालघर जिल्हा पुर्वेकडे असणार्या सहयाद्री पर्वत रांगा व पश्चिमेकडील अरबी समुद्राच्या किनारपट्टी दरम्यान पसरला आहे. पालघर जिल्ह्यात एकूण ८ तालुके आहेत त्यामध्ये जव्हार, मोखाडा, तलासरी, वसई, विक्रमगड, पालघर, डहाणू आणि वाडा तालुक्यांचा समावेश आहे़.

ऐतिहासिक पार्श्वभूमी, सांस्कृतिक वारसा, भौगोलिक आणि औद्योगिक महत्व असलेल्या जिल्ह्याविषयी ही वेबसाईट आहे.

वसई विरार शहर

वसई विरार हे शहर पालघर जिल्ह्यातील शहर आहे. बृहन्मुंबईच्या उत्तरेकडे वसलेले आहे. वसई विरार शहराचे एकूण क्षेत्रफळ ३११ चौ.किमी आहे. वसई-विरार शहर हे बृहन्मुंबई व मीरा भाईदर ह्या शहरापासून वसई खाडीमुळे वेगळे झाले आहेत.रेल्वे सेवा व मुंबई अहमदाबाद ह्या राष्ट्रीय महामार्गामुळे मुंबईला जोडलेले आहे. तसेच वसई दिवा रेल्वे लाईनमुळे वसई विरार शहर, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, कल्याण व पनवेल ह्या शहरांना जोडलेले आहे.
वसई-विरार शहर हे अति झपाट्याने वाढत असलेले शहर आहे. वसई विरार उपप्रदेश्याच्या उत्तरेस वैतरणा नदी आहे. दक्षिणेस वसई खाडी आहे, पश्चिमेस अरबी समुद्र असून, प्रदेश्याच्या पूर्वेकडील सीमेस सासूनवघर पासून चांदीप गावापर्यंत संपूर्ण जंगलानी व्यापलेली तुंगार पर्वतश्रेणी आहे. प्रदेशाच्या पूर्वेस अनेक टेकड्या आणि तुरळक शिखरे दिसून येतात. चिंचोटी धबधबा, तुंगारेश्वर मंदिर व घनदाट जंगल यामुळे पूर्वेकडील भागात पर्यटनदृष्ट्या विकास करण्यास उत्तम संधी निर्माण झाली आहे.
वसई विरार शहर महानगरपालिकेची स्थापना दिनांक ३ जुलै २००९ रोजी झाली आहे. 
आपत्कालीन यंत्रणा सज्ज पालिकेने शहरात आपत्कालीन यंत्रणेला सामोरे जाण्यासाठी ठिकठिकाणी कक्ष उघडले आहेत. तसेच सर्व यंत्रणांना तयार ठेवत कोणत्याही स्थितीशी लढण्याची जय्यत तयारी केली आहे. लाइफ जॅकेट, लाइफ गार्ड, बोट सज्ज करण्यात आली आहे. आपत्कालीन व्यवस्थेसाठी अग्निशमन दलाच्या २० जणांना खास स्कुबा ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण देण्यात आले आहे, तसेच २० ते ४० जणांचे विशेष पथक आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी तयार ठेवण्यात आले आहे.
*आपत्ती व्यवस्थापन*
टोल फ्री क्रमांक : १८००२३३४३५३
पोलीस : १००
अग्निशमन विभाग : १०१ / ०२५०-२४०२१०५
वैद्कीय मदत : १०८
जिल्हा संपर्क क्रमांक : १०७७

No comments:

Post a Comment