ऐतिहासिक पालघर

1.पालघर जिल्हयातील पालघर वसई व जव्हार तालुक्यांना सोनेरी इतिहासाचा वारसा आहे .
2.वसई तालुक्यावर पूर्वी पोतुर्गीजांचे अधिराज्य होते. पेशवे काळामध्ये चिमाजी अप्पांनी पोतुर्गीजांचे साम्राज्यास सुरुंग लावत पावणे तीनशे वर्षापूर्वी मराठी झेंडा रोवला.
3.भारतीय स्वातंत्र्य लढयामध्ये 'सन १९४२ चे चाले जाओ' आंदोलनामध्ये पालघर हे महत्वाचे केंद्र होते.इंग्रज साम्राज्याशी लढा देण्यासाठी पालघर तालुक्यात १४ ऑगस्ट १९४२ रोजी उठाव झाला होता.या उठावामध्ये पालघर तालुक्यातील पाच हुतात्मा शहीद झाले होते.
4.सातपाटीचे काशिनाथ हरी पागधरे , नांदगावचे गोविंद गणेश ठाकूर ,पालघरचे रामचंद्र भीमाशंकर तिवारी ,मुरबे येथील रामचंद्र महादेव चुरी ,शिरगाव चे सुकुर गोविंद मोरे हे हुतात्मे स्वातंत्र्यासाठी इंग्रजाशी लढा देताना शहीद झाले.
5.या शहीदांचे स्मृती म्हणून पालघर शहरामध्ये हुतात्मा चौक उभारलेला आहे.
6.तसेच सन १९३०चा मिठाचा सत्याग्रह सुरु झाला तेव्हा पालघर तालुक्यातील वडराई ते सातपाटी पासून अनेक कार्यकर्ते या सत्याग्रहात सामिल झाले होते.
7.सातपाटी येथे परदेशी वस्तूंची होळी करण्यात आली होती.
8.जव्हार येथे राजे मुकणे यांचे स्वतंत्र संस्थान होते . तेथील राजे मुकणे संस्थानाचा प्रसिद्ध राजवाडा आजही इतीहासाची साक्ष देत आहे .

No comments:

Post a Comment