Friday, December 22, 2017

ठळक बातम्या २२ डिसेंबर २०१७

*ठळक बातम्या*
२२ डिसेंबर २०१७
• वसई विरार महानगरपालिका अतिक्रमणविरोधी विभाग पेचात, स्वतःच बांधलेल्या बांधकामावर कारवाई करण्याची वेळ, ११ कोटींचा चुराडा.
• वसई-विरारमधील रिसॉर्ट तपासणीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश, कारवाईची शक्यता? अतिक्रमण किंवा विनापरवाना बांधकाम, ८३ रिसॉर्ट बेकायदा? ९३ रिसॉर्टपैकी ३१ रिसॉर्टवर स्विमिंगपुल, सुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्ष, चोरट्या दारूची आयात, बलात्कार, विनयभंग, हत्येच्या घटनांचा आरोप?
• डहाणू वैतरणा सेवाभावी संस्थेचा लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या पालघर स्थानकातील थांब्यासाठी निकराचा प्रयत्न. १४ वर्षे पालघरवर सातत्याने अन्याय.
• कामण गावातील रस्ते शेणामुळे निसरडे, खत प्रकल्पातील चिलटे त्रासदायक, अनेक अपघात व मृत्यूचे कारण.
• १२३ देशातील जुन्या नोटा व नाण्यांचे प्रदर्शन. डिसेंबर सकाळी १० ते संध्याकाळी ६. किंग्स्टन टॉवर, १०० फुटी रस्ता, विरार पश्चिम.
• कुपारी महोत्सवात ॲलेक्स डाबरे ह्यांच्या "वेध संस्कृतीचा" पुस्तकाचे २६ डिसेंबरला उद्घाटन, स्थानिक संस्कृतीचा आठवणींच्या रुपात आढावा.
• मुंबई : नाताळ व नववर्षानिमित्त बार आणि पब्स पहाटेपर्यंत खुले राहणार
• ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ६५ वरून ६० वर्षांवर
• तीन वर्षांत रुळांना ५२० वेळा तडे!वातावरणातील बदलांमुळे तडे, नियमित पाहणीमुळे अपघातांची शक्यता टळते, तर रेल्वेस होणाऱ्या विलंबाने प्रवाशांची गैरसोय
• ‘सीआरझेड’ची मर्यादा आता ५० मीटर, किनारपट्टीची जमीन बांधकामासाठी मोकळी, पर्यावरणावर मोठ्या दुष्परीणामांची शक्यता.
• हार्बरवर आजपासून चार दिवसांचा ब्लॉक; सीवूड-उरण रेल्वे मार्गासाठी ब्लॉक; लोकल फेऱ्यांवरही परिणाम
• मुंबईतील अनिल अंबानी समुहातील रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा वीजव्यवसाय अदानींच्या ताब्यात
• आता मिळणार गरजेनुसार औषध , पूर्ण पाकीट घेण्याची सक्ती नाही : एफडीए
• होमीओपथी डॉक्टरांना अ‍ॅलोपथी प्रॅक्टिसला मनाई, सरकारच्या अधिसूचनेला तात्पुरती स्थगिती
• नवी मुंबई - ठाणे वाहतूक आजपासून ४ दिवस बंद, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
=====================
*कॉम्प्युटर हार्डवेअर सॉफ्टवेअर नेटवर्क ॲनिमेशन कोर्स, भरपूर प्रात्यक्षिक, त्वरित जॉब, संपर्क 7770074110*
~~~~~~~~~~~~~~~~~
*वसई विरार : प्रधानमंत्री आवास योजनेत घर, आकर्षक दरात सुलभ गृहकर्ज. संपर्क 7770074110*
~~~~~~~~~~~~~~~~~
*Home Loan, Buy, Sale, Rent, Lease, Budget Properties in Vasai Virar,  7770074110*
###################
http://palgharlive.com
https://fb.com/palgharlive

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home