Wednesday, December 13, 2017

ठळक बातम्या , १३ डिसेंबर २०१७

*ठळक बातम्या*
१३ डिसेंबर २०१७
• *एमएमआरडीए विकास आराखडा सुनावणीशिवाय सादर होणार? आराखड्यावर ३८,००० हरकती घेणाऱ्या पर्यावरण संवर्धन समितीकडुन न्यायालयीन लढ्याची तयारी.*
• वसई विरार महापौर मॅरेथॉन १८००० धावपटुंसह यशस्वी
• *वसई किल्ल्यात हाकेच्या अंतरावर पोलिस ठाणे, ६ वर्षाच्या बालिकेवर बलात्कार*
• *नालासोपारा पुर्वेला ११ वर्षाच्या मुलाचा अपघाती मृत्यू, शाळेने ५ मिनिटांच्या उशीरासाठी नाकारला होता प्रवेश, ४ रुग्णालयानी दाखल करण्यास दिला होता नकार, वसईविरारच्या अपुऱ्या आरोग्यव्यवस्थेचा ठरला बळी*
• *वसई विरार मनपाचा उत्पन्न वाढीसाठी करवाढीचा सोपा उपाय? मोबाईल टॉवर, जाहिरात धोरणाकडे दुर्लक्ष , अनधिकृत बांधकाम कारवाईचा खर्चही पालिकेकडून, पालिका हद्दीत होणाऱ्या चित्रीकरणाचे शुल्क नाही, वाहनतळ नाही, नागरीकांची नाराजी*
• वसईतील एसटीची शालेय बससेवा सुरू, विद्यार्थ्यांना पासचेही वितरण
• पालघर जिल्ह्यात लागवड केलेल्या मोगरा व हळदीला बाजारपेठेत भाव व उचल नसल्याने आदिवासींचे रोजगारासाठीचे स्थलांतर
• विरारजवळील अर्नाळा गावात ‘मी जागृत बंदरपाडेकर स्वच्छता अभियानाने' शंभरावी स्वच्छता मोहीम पूर्ण केली.
• ठाणे : वीजचोरी केल्याप्रकरणी माजी महापौर नईम खान, दिव्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष विजय भोईर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक साजीद अन्सारी आणि अश्रफ अली चौधरी ह्यांच्यावर  गुन्हा दाखल.
• वांद्रे विरार उन्नत मार्गाचा पुनर्विचार? बोरीवली विरार पाचवी सहावी मार्गिका सुरु होणार
• विरार पनवेल मार्ग प्रकल्पास उशीर.  येत्या काही वर्षात ५ लाख प्रवासी वाहतुकीसाठी तरतूद
• विरार डहाणू चौपदरीकरणासही उशीर.
• पॅनकार्ड क्लबच्या ५१ लाख गुंतवणूकदारांचे ७००० करोड अडकले. मालमत्ता विकुन गुंतवणूक परत करण्यासाठी विशेष प्राधिकरणाची नियुक्ती
• मीरा भाईंदर आशा सेविकांवर बेरोजगारीची वेळ
• ठाणे महापालिकेचे रुग्णालय : ११ महिन्यांत ९०५ मृत्यू, अपुरा औषध पुरवठा
• विकास नियंत्रण नियमावली ३३ (७)चा बिल्डरांच्या फायद्यासाठी गैरवापर होत असल्याचा आरोप,  मुंबई महापालिकेच्या मालकीच्या भूखंडांवरील इमारती धोकादायक जाहीर करून इमारतींच्या पुनर्विकासाचे काम मर्जीतील बिल्डरांना देण्यात येत असल्याचा दावा
=====================
*नामांकित कंपनीसाठी मुले-मुली  पाहिजेत , पात्रता १०वी पास-नापास, वेळ सकाळी ९ ते ५, ठिकाण वसई-विरार , संपर्क 7770074110*
###################
http://palgharlive.com
https://fb.com/palgharlive

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home