Thursday, December 7, 2017

ठळक बातम्या - ७ डिसेंबर २०१७

*ठळक बातम्या*
७ डिसेंबर २०१७
•वसईतल्या गावांना एसटी आणि पालिका दोन्ही नसल्याने नागरीकांची गैरसोय. पालिकेची सेवा एसटीपेक्षा महाग, पालिकेने केले महागाईचे समर्थन. संतप्त ग्रामस्थ पालिका मॅरेथॉन रोखणार?
•नायगाव पुर्व येथे पालिकेनेच केली झाडांची कत्तल? खाडीचे पाणी रोखणारी झाडे तोडली गेली.
•चित्रपटगृहामध्ये घरी तयार केलेले खाद्यपदार्थ, पाणी घेऊन जाण्यास प्रतिबंध नाही, विद्यार्थ्यांकडून पार्किंग घेतल्यास कारवाई - राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समिती
•पालघर पोलिसांची बोईसर दांडीपाड़ा येथे सेक्स रॅकेटवर कारवाई, 5 महिलांना अटक
•वसई-विरार पालिका बसमुळे मुलीचा अपघात? तक्रार घेण्यास पोलिस टाळाटाळ करत असल्याचा आरोप
• ‘काम द्या, अन्यथा रोजगार भत्ता द्या!’, श्रमजीवी संघटनेतर्फे विक्रमगड तहसीलदार कार्यालयावर मोर्चा
• कल्याण-डोंबिवली ‘परिवहन’च्या व्यवस्थापकांची हकालपट्टी
• नायगाव पुर्व येथे अनेक वर्षानंतर टॅंकरमुक्ती?  सूर्या पाणी योजनेतून हे पाणी दिले जाणार आहे. सोसायट्यांना अर्ज करण्याचे आवाहन.
• *पालघर ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग येथे मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रे स्थापन.* सागरी मत्स्यव्यवसाय नौकानयन, सागरी मासेमारी पद्धती, नौका इंजिनाची देखभाल व परिरक्षण इ. प्रशिक्षण. प्रशिक्षणार्थीस मच्छीमार सहकारी संस्थेची शिफारस आवश्यक.
•जव्हार तालुक्यातील १० ग्रा.पं.ची चौकशी, भ्रष्टाचाराच्या शेकडो तक्रारी दाखल
•पालघर जिल्हयात जव्हार, डहाणू या नगरपरिषदांसह वाडा नगरपंचायतीची निवडणूक 13 डिसेंबरला.  सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची रणनिती आखत स्टार प्रचारकांच्या सभांचे आयोजन
•१० डिसेंबर वसई विरार मॅरेथॉन, १८००० स्पर्धक,
•ठाणे आणि वसई-विरार परिसरात धुक्याचे साम्राज्य
• *११ बांग्लादेशीयाना टाकीपाडा गास नालासोपारा येथुन अटक.* महाराष्ट्र एटीएस विक्रोळी शाखेने केली कारवाई.  पश्चिम बंगाल ग्रामपंचायतचे जन्म दाखले बनवले गेले, त्यानंतर नालासोपाराच्या स्थानिक एजंटमार्फत भाडेकरार वापरून आधारकार्ड व पॅनकार्ड मिळवण्यात आले, त्यातुन पासपोर्ट मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
•मुंबई : मध्य रेल्वे , पश्चिम रेल्वे, हार्बर रेल्वे मार्गावरील लोकलचे वेळापत्रक पुन्हा कोलमडले, धुक्यामुळे लोकल पंधरा मिनिटे उशिरा
•पालघरला होणार शिक्षण विभागाची पाच कार्यालये
•साखरशेत प्राथमिक आरोग्य केंद्रात २५ पदे रिक्त, रुग्णांचे प्रचंड हाल, लोकप्रतिनिधींनी टेकले अखेर हात
•रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी ५५ हजार ८८९ झाडे तोडण्यात येणार.
•‘कट प्रॅक्टिस हा डॉक्टर, रुग्णालयांचा भ्रष्टाचारच!’ - बदलता महाराष्ट्र, लोकसत्ता
•रात्रबाजाराची योजना शिवसेनेने रोखली. शिवसेनेच्या गच्चीवरील पार्टीचा प्रस्ताव भाजपाने रोखल्यामुळे भाजपाच्या रात्रबाजार या संकल्पनेला शिवसेनेचा विरोध असल्याची चर्चा. हॉटेलच्या गच्चीवरील पार्टीला होणार धिंगाणा चालतो, सामान्यांसाठी असलेला रात्रबाजार नको, भाजपाचा आरोप.
•कॅशलेस व्यवहार स्वस्त होणार: आरबीआय
•आजचे डिझेलचे दर (प्रति लिटर, रुपयांमध्ये) : मुंबई ६१.२०, पुणे ६०.१९, नाशिक ६०.६८, औरंगाबाद ६२.१६, नागपूर ६१.७३, अमरावती ६१.७३
•आजचे पेट्रोलचे दर (प्रति लिटर, रुपयांमध्ये) : मुंबई ७६.६१, पुणे ७६.४८, नाशिक ७६.९९, औरंगाबाद ७७.५६, नागपूर ७७.१०, अमरावती ७७.१०
• *यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व नवमहाराष्ट्र युवा अभियान यांच्यातर्फे यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कार – २०१८साठी अर्ज करण्याचे अवाहन*. या पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३१ डिसेंबर २०१६ अखेरीस ३५ वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. या पुरस्कारासंबंधीची माहिती व फॉर्म www.ycpmumbai.com या वेबसाइटवरून डाऊनलोड करावेत. प्रस्ताव व अर्ज १० डिसेंबरपर्यंत संघटक, नवमहाराष्ट्र युवा अभियान, चव्हाण प्रतिष्ठान, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, मुंबई – २१ या पत्त्यावर, अथवा navmaharashtra@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवावेत.

=====================
पाहिजेत:  RMO, नर्सींग स्टाफ, लेबोटोमिस्ट, सेल्स मुल/ मुली *संपर्क ७७०९९०७७०३*
###################
*Website Rs 3500/- , Mobile App 10,000/- Contact 7770074110*
###################
रक्ताचा एकही थेंब वाया न जाता रुग्णांपर्यंत पोहचविण्यासाठी *ब्लडॲप* ( *BloodApp* ) - रेणुका फाऊंडेशन
https://play.google.com/store/apps/details?id=com.renukafoundations
###################
*पाहिजेत: हेल्पर , फिटर, फॅब्रीकेशन, मशीन ऑपरेटर, वसई. संपर्क 7709907703*
###################
Website developer , UI/UX, Vasai, Contact 7770074110
###################
http://palgharlive.com
https://fb.com/palgharlive

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home