Saturday, December 9, 2017

ठळक बातम्या ९ डिसेंबर 2017

*ठळक बातम्या*
९ डिसेंबर २०१७
• *वसईतल्या गावांवर एसटीनंतर वाढीव घरपट्टीचे संकट. वसईविरार महानगरपालिकेने घरपट्टी जवळपास दुप्पट केली असून, अजुन वाढ होण्याचे संकेत दिले आहेत.*
•वसई-विरार शहरात भूमाफियांकडुन अनधिकृत बांधकामांचा सपाटा, त्यावर बेकायदा इमारती उभ्या राहिल्या आहेत. शासनाने आरक्षित केलेल्या जागाही अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांनी हडप केल्या आहेत. आरक्षित जागा नष्ट होण्याचा धोका निर्माण. ८०० आरक्षित भूखंड मिळवण्याच्या प्रक्रिया सुरू, पालिकेने आरक्षित भूखंडांचा शोध सुरू केला, शासनाकडून हस्तांतरण नाही.
•बोरिवली-विरार रेल्वे प्रवास, पाचवी-सहावी मार्गिका विरारपर्यंत.
• *दिवाणमान, वसई येथे मिठागर जागा भरावप्रकरणी स्थानिक नागरीकांचा उच्च न्यायालयात लढा,* पालिकेला १ कोटी ५ लाख रुपयांची नोटीस. दोन वर्षात पालिका कंत्राटदारावर कारवाई नाही?
•गुजरात निवडणूक: वृद्ध मतदाराने मनमोहन सिंगांच्या हातात ठेवली घोटाळ्यांची यादी
• *वसईविरार महानगरपालिकेने दिव्यांगांसाठीच्या योजनांवर पुरेसा खर्च व जनजागृती न केल्याचा आरोप.* पालिकेकडून जनजागृती सुरु असल्याचा व पुरेसा निधी वापर असल्याचा दावा.
•खानिवडे वसई येथे बंधाऱ्याचा खांब वाहुन गेल्याने शेतीत खारे पाणी.
•उत्तन भाईंदर येथे वादळाचा सुक्या मासळीला फटका. अवकाळी पावसाने मासळी कुजली, मासळी सुकत घालण्याची व्यवस्था मोडली. नुकसानभरपाईची मागणी.
• *बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण, किनारपट्टीच्या काही भागांत पावसाची शक्यता.*
•कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा (केडीएमसी) आर्थिक डोलारा केव्हाही कोसळण्याची शक्यता.
•चोरून वीज वापरणाऱ्या माजी महापौर नईम खान यांच्यावर केलेली कारवाई ताजी असतानाच दिव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंब्रा, कौसा, शीळ, दिवा ब्लॉक कार्याध्यक्ष विजय अनंत भोईर बारमध्ये वीज चोरी केल्याची व बारला वीज मीटरच नसल्याची बाब समोर.
• *व्यापा-याला खंडणीसाठी दाऊद इब्राहिमच्या नावाने धमक्या?*  या प्रकरणात पंकज भगवानदास ठाकूर आणि संजय जोशी या दोन इसमांचा सहभाग असल्याचा पुरवणी जबाब फिर्यादीने दिला, वसई हद्दीत कोट्यवधी रुपयांची जमीनीवर गुंडांकडुन कब्जा, सशस्त्र गुंडांचा चोवीस तास पहारा, वालीव पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. या टोळीने हायवे परिसरात मोकळ्या जागांवर कब्जा करून खंडणीसाठी अनेकांना धमक्या दिल्याच्या तक्रारी आहेत.
•डहाणूत वीज बेपत्ता, डायमेकर्स, उद्योजक त्रस्त
•सव्वा कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या पत्रकारासह पोलीस कोठडी, बिल्डरकडे मागितली होती खंडणी; सापळा रचून केली अटक,  कल्याण येथील पत्रकार सिद्धार्थ अशोक मोकळने साप्ताहिक राजकीय दर्शन, फ्लेक्स आणि यूट्यूबच्या माध्यमातून गृहनिर्माण प्रकल्पाची बदनामी केली.
• *यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व नवमहाराष्ट्र युवा अभियान यांच्यातर्फे यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कार – २०१८साठी अर्ज करण्याचे अवाहन*. माहिती व फॉर्म www.ycpmumbai.com या वेबसाइटवरून डाऊनलोड करावेत. प्रस्ताव व अर्ज १० डिसेंबरपर्यंत संघटक, नवमहाराष्ट्र युवा अभियान, चव्हाण प्रतिष्ठान, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, मुंबई – २१ या पत्त्यावर, अथवा navmaharashtra@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवावेत.
=====================
पाहिजेत:  RMO, नर्सींग स्टाफ, लेबोटोमिस्ट, सेल्स मुल/ मुली *संपर्क 7709907703*
###################
*Website Rs 3500/- , Mobile App 10,000/- Contact 7770074110*
###################
रक्ताचा एकही थेंब वाया न जाता रुग्णांपर्यंत पोहचविण्यासाठी *ब्लडॲप* ( *BloodApp* ) - रेणुका फाऊंडेशन
https://play.google.com/store/apps/details?id=com.renukafoundations
###################
http://palgharlive.com
https://fb.com/palgharlive

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home