Sunday, December 24, 2017

ठळक बातम्या २४ डिसेंबर २०१७

*ठळक बातम्या*
२४ डिसेंबर २०१७
• डबेवाल्यानी केली रोटी बँकेची स्थापना, संपर्क ८६५५५८०००१  www.rotibankindia.org
• मुंबई एसी लोकलचे तिकीट दर ६० ते २०० रु.
• अजित पवारांच्या मालकीच्या साखर कारखान्याने 64 कोटी थकवले, नगरच्या अंबालिका कारखान्याला साखर आयुक्तांकडून नोटीस .
• गडचिरोली : एका महिलेसह तीन नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
• पालघरमध्ये कोकण विभागीय सरस 2017 चे उद्घाटन आदिवासी विकास मंत्री तथा पालक मंत्री विष्णू सावरा यांनी केले. कोकणातील 7 जिल्ह्यातील 122 महिला बचत गटांनी आपला सहभाग नोंदविला.
• ठाणे : सुटीचे चार दिवसांचा गैरफायदा घेत मुंब्रा-कळवा खाडीत सक्शसनपंपव्दारे अवैधरेतीचे मनमानी उत्खनन.
• गृहिणीच्या मृत्यूची भरपाई मोलकरणीच्या उत्पन्नानुसार, नोकरी न करणाऱ्या गृहिणींच्याही कामाचे मोल महत्त्वाचे असल्याचे दर्शवणारा न्यायालयाचा निकाल.
• पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, भंडाऱ्यातील मेजरसह चार जवान शहीद.
• 'वंदे मातरम'मध्ये आईला अभिवादन केले जाते, मग आक्षेप का; व्यंकय्या नायडूंचा सवाल
• कुलभूषण जाधव उद्या पत्नी आणि आईला भेटणार
• मुंबईत सार्वजनिक ठिकाणी जत्रा, प्रदर्शनांना बंदी
• राज्यात स्वाइन फ्लूचे ७७४ बळी; राज्यातील २१ लाख रुग्णांची तपासणी
• वसईविरार महानगरपालिका रूपेश जाधव , प्रकाश रॉड्रिग्स नवे महापौर-उपमहापौर.
• वसई कामण देवदळला तबेल्यांच्या दुर्गंधीने नागरीक हैराण, पालिकेकडून प्रतिसाद नाही.
•  ‘जेव्हा आम्ही हिरवा रंग परिधान करु तेव्हा सर्व ठिकाणी हिरवाच रंग दिसेल. आमच्या हिरव्या रंगासमोर कुठलाही रंग टिकणार नाही. आमच्या रंगासमोर ना मोदींचा रंग, ना काँग्रेसचा रंग… कोणताचा रंग टिकणार नाही. फक्त हिरवा रंग पाहाल.’ - असदुद्दीन ओवेसी
• चारा घोटाळा : लालूंसह 15 जण दोषी, तर 7 जण निर्दोष
=====================
*वजन घटवा, वजन वाढवा, तंदुरुस्त रहा, दुष्परिणाम न होता: 7770074110*
~~~~~~~~~~~~~~~~~
*सीसीटीव्ही, अलार्म, सिक्युरिटी, बायोमेट्रिक, नेटवर्किंग: 7770074110*
~~~~~~~~~~~~~~~~~
*वसई विरार : प्रधानमंत्री आवास योजनेत घर, आकर्षक दरात सुलभ ८०-१००% गृहकर्ज. संपर्क 7770074110*
~~~~~~~~~~~~~~~~~
*कॉम्प्युटर हार्डवेअर सॉफ्टवेअर नेटवर्क ॲनिमेशन कोर्स, भरपूर प्रात्यक्षिक, त्वरित जॉब, संपर्क 7770074110*
~~~~~~~~~~~~~~~~~
*टी परमिट, प्रायव्हेट गाड्यांसाठी नामांकित बॅंकेद्वारा कर्ज, सोपी प्रक्रिया, संपर्क 7770074110*
###################
http://palgharlive.com
https://fb.com/palgharlive

Saturday, December 23, 2017

ठळक बातम्या २३ डिसेंबर २०१७

*ठळक बातम्या*
२३ डिसेंबर २०१७
• वसईविरारच्या ४३ अनधिकृत शाळा बंद करण्यासाठी जिल्हापरीषदेची नोटीस.
•  मीरा-भार्इंदर: परिवहन विभागाला मिळणार आगार, १२ वर्षे प्रतीक्षा : मे २०१८ मध्ये खुला होणार, कर्मचा-यांना दिलासा
• विरार, नालासोपारा पोलिसांच्या जागेवर बेकायदा इमारती, कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
• वसईत नाताळनिमित्त बिशपहाउसमध्ये सर्वधर्म मेळावा २५ डिसेंबर सायं ४:३०-६:००
• वसई विरार अपुरी पार्किंग सुविधा, खाजगी कंत्राटदारांची मनमानी, नागरीकांची गैरसोय, पालिकेकडून अपुऱ्या टोईंगगाड्यांचे कारण.
• मोखाडा तहसील कार्यालयात कायमस्वरूपी तहसीलदार नसल्याने चार वर्षे कामे रखडली.
• ग्रामपंचायत क्षेत्रातील इ.स २००० पर्यंतची कामे , ५०० चौ मी ची २०११ पर्यंतची कामे नियमित, गावठाण हद्द २०० मीटरने वाढणार, गायरान जागा सरकारी प्रकल्पासाठी
• मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र , सातपाटी, पालघर येथे १ जानेवारी २०१८ पासुन आधुनिक मासेमारी प्रशिक्षण.
• जव्हारचे भूकंपमापन यंत्र गायब, सातत्याने भूकंप धक्के सुरु असल्याने चिंता.
• डहाणू तालुक्यात १४ ग्रामपंचायतसाठी निवडणूक.
• मद्यपी वाहनचालकामुळे झालेल्या अपघातात मृत्यू झाल्यास संबंधित वाहनचालकाला सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होण्याची
• जुन्या ठाण्याचा पुनर्विकास अडचणीत; वाढीव टीडीआर न देण्याची आयुक्तांची भूमिका
• मुंबई-जळगाव विमानसेवेची आज स्वप्नपूर्ती, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ
• राज्यातील ५९ हजार २६३ धर्मादाय संस्थांची नोंदणी रद्द, धर्मादाय आयुक्तालयाचा दणका
• चारा घोटाळा; सीबीआयचं विशेष कोर्ट आज देणार निकाल, प्रकरणात लालू प्रसाद यादव आरोपी
=====================
*वजन घटवा, वजन वाढवा, तंदुरुस्त रहा, दुष्परिणाम न होता: 7770074110*
~~~~~~~~~~~~~~~~~
*सीसीटीव्ही, अलार्म, सिक्युरिटी, बायोमेट्रिक, नेटवर्किंग: 7770074110*
~~~~~~~~~~~~~~~~~
*वसई विरार : प्रधानमंत्री आवास योजनेत घर, आकर्षक दरात सुलभ ८०-१००% गृहकर्ज. संपर्क 7770074110*
~~~~~~~~~~~~~~~~~
*कॉम्प्युटर हार्डवेअर सॉफ्टवेअर नेटवर्क ॲनिमेशन कोर्स, भरपूर प्रात्यक्षिक, त्वरित जॉब, संपर्क 7770074110*
~~~~~~~~~~~~~~~~~
*टी परमिट, प्रायव्हेट गाड्यांसाठी नामांकित बॅंकेद्वारा कर्ज, सोपी प्रक्रिया, संपर्क 7770074110*
###################
http://palgharlive.com
https://fb.com/palgharlive

Friday, December 22, 2017

दुपारच्या बातम्या २२ डिसेंबर २०१७

*दुपारच्या बातम्या*
२२ डिसेंबर २०१७
• गुजरातमधील एका अपक्ष आमदाराचा भाजपला बिनशर्त पाठिंबा, १०० संख्याबळ.
• आणीबाणीच्या आंदोलनात जे तुरुंगात गेले, लढले त्यांना स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा आणि पेन्शन.
• आदर्श घोटाळ्याप्रकरणी राज्यपालांनी दिलेली अशोक चव्हाणांच्या चौकशीची परवानगी मुंबई हायकोर्टाने बेकायदेशीर ठरवली, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांना मोठा दिलासा
• तिहेरी तलाक बेकायदेशीरच; युरोपियन महासंघाच्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
• अटक टाळण्यासाठी गायब झालेल्या डीएसकेंचा शोध सुरु; परराज्यात पथके रवाना
• मुंबई : नाताळ व नववर्षानिमित्त बार आणि पब्स पहाटेपर्यंत खुले राहणार (लोकसत्ता वृत्त)
• आतापर्यंत भारताला पाठिंबा देणाऱ्या इस्रायलला भारताचा पाठिंबा नाही, डोनाल्ड ट्रम्पना झटका ! जेरुसलेमच्या मुद्यावरुन भारताचे UNमध्ये अमेरिकेविरोधात मतदान
• कुलभूषण जाधव यांना तात्काळ फाशीचा धोका नाही, पाकिस्तानची माहिती
• ख्रिस्मसमध्ये खोडा घालणा-यांचे डोळे काढू; नवज्योत सिंग सिद्धू यांची उघड धमकी
• राज्यातील ज्येष्ठ नागरिकांचं वय लवकरच 65 वरुन 60, निवृत्ती योजनांसह अनेक सुविधा,
शासनावर 200 कोटींचा बोजा
• ‘सीआरझेड’ची मर्यादा आता ५० मीटर, किनारपट्टीची जमीन बांधकामासाठी मोकळी, पर्यावरणावर मोठ्या दुष्परीणामांची शक्यता.
• नवी मुंबई - ठाणे वाहतूक आजपासून ४ दिवस बंद, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
=====================
*Weight Loss, Weight Gain, Herbal Products : 7770074110*
~~~~~~~~~~~~~~~~~
*कॉम्प्युटर हार्डवेअर सॉफ्टवेअर नेटवर्क ॲनिमेशन कोर्स, भरपूर प्रात्यक्षिक, त्वरित जॉब, संपर्क 7770074110*
~~~~~~~~~~~~~~~~~
*CCTV, Networking, Biometric, Products & Services : 7770074110*
~~~~~~~~~~~~~~~~~
*वसई विरार : प्रधानमंत्री आवास योजनेत घर, आकर्षक दरात सुलभ ८०-१००% गृहकर्ज. संपर्क 7770074110*
~~~~~~~~~~~~~~~~~
*80-100% Home Loan, Buy, Sale, Rent, Lease, Budget Properties in Vasai Virar,  7770074110*
###################
http://palgharlive.com
https://fb.com/palgharlive

ठळक बातम्या २२ डिसेंबर २०१७

*ठळक बातम्या*
२२ डिसेंबर २०१७
• वसई विरार महानगरपालिका अतिक्रमणविरोधी विभाग पेचात, स्वतःच बांधलेल्या बांधकामावर कारवाई करण्याची वेळ, ११ कोटींचा चुराडा.
• वसई-विरारमधील रिसॉर्ट तपासणीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश, कारवाईची शक्यता? अतिक्रमण किंवा विनापरवाना बांधकाम, ८३ रिसॉर्ट बेकायदा? ९३ रिसॉर्टपैकी ३१ रिसॉर्टवर स्विमिंगपुल, सुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्ष, चोरट्या दारूची आयात, बलात्कार, विनयभंग, हत्येच्या घटनांचा आरोप?
• डहाणू वैतरणा सेवाभावी संस्थेचा लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या पालघर स्थानकातील थांब्यासाठी निकराचा प्रयत्न. १४ वर्षे पालघरवर सातत्याने अन्याय.
• कामण गावातील रस्ते शेणामुळे निसरडे, खत प्रकल्पातील चिलटे त्रासदायक, अनेक अपघात व मृत्यूचे कारण.
• १२३ देशातील जुन्या नोटा व नाण्यांचे प्रदर्शन. डिसेंबर सकाळी १० ते संध्याकाळी ६. किंग्स्टन टॉवर, १०० फुटी रस्ता, विरार पश्चिम.
• कुपारी महोत्सवात ॲलेक्स डाबरे ह्यांच्या "वेध संस्कृतीचा" पुस्तकाचे २६ डिसेंबरला उद्घाटन, स्थानिक संस्कृतीचा आठवणींच्या रुपात आढावा.
• मुंबई : नाताळ व नववर्षानिमित्त बार आणि पब्स पहाटेपर्यंत खुले राहणार
• ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ६५ वरून ६० वर्षांवर
• तीन वर्षांत रुळांना ५२० वेळा तडे!वातावरणातील बदलांमुळे तडे, नियमित पाहणीमुळे अपघातांची शक्यता टळते, तर रेल्वेस होणाऱ्या विलंबाने प्रवाशांची गैरसोय
• ‘सीआरझेड’ची मर्यादा आता ५० मीटर, किनारपट्टीची जमीन बांधकामासाठी मोकळी, पर्यावरणावर मोठ्या दुष्परीणामांची शक्यता.
• हार्बरवर आजपासून चार दिवसांचा ब्लॉक; सीवूड-उरण रेल्वे मार्गासाठी ब्लॉक; लोकल फेऱ्यांवरही परिणाम
• मुंबईतील अनिल अंबानी समुहातील रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा वीजव्यवसाय अदानींच्या ताब्यात
• आता मिळणार गरजेनुसार औषध , पूर्ण पाकीट घेण्याची सक्ती नाही : एफडीए
• होमीओपथी डॉक्टरांना अ‍ॅलोपथी प्रॅक्टिसला मनाई, सरकारच्या अधिसूचनेला तात्पुरती स्थगिती
• नवी मुंबई - ठाणे वाहतूक आजपासून ४ दिवस बंद, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
=====================
*कॉम्प्युटर हार्डवेअर सॉफ्टवेअर नेटवर्क ॲनिमेशन कोर्स, भरपूर प्रात्यक्षिक, त्वरित जॉब, संपर्क 7770074110*
~~~~~~~~~~~~~~~~~
*वसई विरार : प्रधानमंत्री आवास योजनेत घर, आकर्षक दरात सुलभ गृहकर्ज. संपर्क 7770074110*
~~~~~~~~~~~~~~~~~
*Home Loan, Buy, Sale, Rent, Lease, Budget Properties in Vasai Virar,  7770074110*
###################
http://palgharlive.com
https://fb.com/palgharlive

Thursday, December 21, 2017

ठळक बातम्या २१ डिसेंबर २०१७

*ठळक बातम्या*
२१ डिसेंबर २०१७
• निषाद घाडी मृत्यूप्रकरणी चौकशी, सर्व खाजगी रुग्णालयांची तपासणी.
• वसई विरार महानगरपालिका तरणतलाव अवैध. आदिवासींची जमीन लुबाडली ?
• बोर्डी पालघर येथे सीआरझेड नियम तोडुन बांधकाम.
• पारोळ येथ अवैध रेती उत्खनन, शेती पाण्यात जाण्याची भीती.
• मोखाडा येथे मुलींच्या वस्तीगृहाला ३ वर्षापासून महिला गृहपाल नाही.
• पालघर ठिबक सिंचन ऑनलाईन प्रक्रिया चार महिन्यांपासून बंद.
• वाडा तालुक्यातील गोऱ्हे ग्रामपंचायत कार्यालयाच्या निकृष्ट दर्जाविरुद्ध उपसरपंचांची तक्रार.
• भूमिपुत्र बचाव समितीचे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन. ग्रामसभांना जमीन हस्तांतरण रोखण्याचा हक्क रद्द केल्याने भूमिपुत्रांचे अस्तित्व संपण्याची भीती.
• वसई विरार महानगरपालिकेत १६०० पदे रिक्त,
• विरार मनवेल पाडा येथे पालकांच्या अंधश्रद्धेची मुलगी बळी, तिघांना अटक.
• पालघर जिल्ह्यातील ९२ गावांना पेसाचा दर्जा
• पालघर जिल्ह्यासाठी विधी अधिकारी, लघुटंकलेखक पदासाठी मंजुरी.
• ट्रिपल तलाकवर आज संसदेत विधेयक सादर होण्याची शक्यता
• राज्यामध्ये आता ‘कॉर्पोरेट’ शाळा! विधानसभेची मंजुरी : खासगी कंपन्यांना परवानगी
• मुंबई ढगाळलेलीच; २४ तासात थंडीचा जोर वाढणार
​ आरक्षण प्रवर्ग निवडीविरोधातील याचिका फेटाळली
• पिळवणुकीचे वास्तव उघडकीस आल्यानंतर राज्यात तब्बल २२० अनाथगृहांना टाळे.
• २०११ पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण , विधानसभेत विधेयकास मंजुरी
• दीड लाखावरील कर्जफेडीस ३१ मार्चपर्यंत मुदत, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
• सहा नगरसेवकांचा निर्णय पुढील महिन्यात?
• महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी बंद
• मुंबई – ठाण्यातील २०११ पर्यंतच्या झोपडय़ांनाही संरक्षण
• अकारण व प्रमाणापेक्षा जास्त सिझेरियन प्रसूती करणाऱ्या खासगी रुग्णालयांना यापुढे चौकशीस सामोरे जावे लागणार आहे.
• ‘सनबर्न’चा मार्ग अखेर मोकळा , जनहित याचिका फेटाळली
• जेरुसलेमचा मुद्दा पेटण्याची चिन्हे; अमेरिका, इस्त्रायली वस्तूंवर मुस्लीम समाजाचा बहिष्कार; आज मुंबईत बैठक
=====================
*वसई विरार : प्रधानमंत्री आवास योजनेत घर, आकर्षक दरात सुलभ गृहकर्ज. संपर्क 7770074110*
~~~~~~~~~~~~~~~~~
*Home Loan, Buy, Sale, Rent, Lease, Budget Properties in Vasai Virar,  7770074110*
###################
http://palgharlive.com
https://fb.com/palgharlive

Wednesday, December 20, 2017

ठळक बातम्या २० डिसेंबर २०१७

*ठळक बातम्या*
२० डिसेंबर २०१७
• डहाणू वैतरणा सेवाभावी संस्थेच्या पुढाकाराने राजकीय पक्ष पदाधिकारी, पत्रकारांचा रेल्वे प्रशासनाकडे जोरदार पाठपुरावा, पश्चिम रेल्वेकडून पालघर अद्यापही दुर्लक्षितच,
• मीरा रोडमध्ये सराईत गुन्हेगार अस्लम इस्राएल शेखला अटक, उत्तर प्रदेशातील माजी सरपंचाकडून घरफोडय़ा
•वसई तहसीलदार कार्यालयातुन बोगस दाखले
•भाईंदरला लाचखोर डॉक्टरच्या सहिने दाखले
•वसईविरार महानगरपालिका: लिपिक बनले प्रभारी सहाय्यक आयुक्त
•मीराभाईंदर नगरसेवकांच्या खाजगी गाड्यांवर पालिकेचे अनधिकृतपणे बोधचिन्ह
•पालघर सफाळे येथील ग्रामीण शिक्षण संस्थेच्या संकुलात आयोजित केलेल्या विज्ञान, कला व सांस्कृतिक प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
पालखी उत्सवाचा मान मुर्धा, राई ,मोर्वा, उत्तन गावांना
वसई-विरार महापौर निवडणूक २७ डिसेंबरला
•विदर्भात दरवर्षी पाच हजारांवर बालमृत्यू
•स्मार्ट सिटी योजनेंतर्गत आठ शहरांमध्ये १७ प्रकल्प पूर्ण
•मुंबई महापालिकेचे त्रिभाजन करा: आमदार नसीम खान यांची विधानसभेत मागणी
•नाताळपासून वातानुकूलित लोकल चालविण्याचे संकेत पश्चिम रेल्वेकडून देण्यात आले आहेत.
•ठाण्यातील पाच हजार वृक्ष बचावले, विविध कारणांनी ठाण्यातील हजारो वृक्षांवर पडणारी कुऱ्हाड टळली आहे.
•उल्हास नदीतील प्रदूषण कायम
=====================
*वसई विरार : प्रधानमंत्री आवास योजनेत घर, आकर्षक दरात सुलभ गृहकर्ज. संपर्क 7770074110*
~~~~~~~~~~~~~~~~~
*Home Loan, Buy, Sale, Rent, Lease, Budget Properties in Vasai Virar,  7770074110*
###################
http://palgharlive.com
https://fb.com/palgharlive

Tuesday, December 19, 2017

ठळक बातम्या १९ डिसेंबर २०१७

*ठळक बातम्या*
१९ डिसेंबर २०१७
• *शापूरजी पालनजी प्रकल्पाला अडीच कोटी रुपये दंडाची नोटीस, २० डिसेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश*
मातीभरावामुळे बोळींज, नानभाट आणि नंदाखाल या तीन गावांत पावसाळय़ात पूरपरिस्थिती, १६ मे २०१७ तलाठ्यांकडुन पंचनामा, १४ डिसेंबर २०१७ तहसीलदारांकडुन नोटीस.
जमिनीची बिनशेती परवानगी ठाणे आाणि पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडून , जागेचे बांधकाम करण्याचा परवाना वसई-विरार महापालिकेकडून,  मातीची रॉयल्टी शासनाकडे -  शापूरजी पालनजी.
ग्रामस्थांना उद्ध्वस्त करून हा प्रकल्प होणार असेल तर आम्ही तो होऊ  देणार नाही – समीर वर्तक, वसई विरार पर्यावरण संवर्धन समिती.
 नैसर्गिक नाले बंद केल्याचे आढळले तर नव्याने पाहणी करून कारवाई करण्यात येईल -  तहसीलदार, वसई.
 स्वामित्व धनाच्या पावत्या नसतील तर दंडात्मक कारवाई – स्मिता गुरव, निवासी नायब तहसीलदार.
•गुजरात निवडणूक: भाजपा ९९, कॉंग्रेस ८०, इतर ३
•हिमाचल निवडणूक: भाजपा ४४, कॉंग्रेस २१, इतर ३
•महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक :
नंदुरबार, नवापूरला कॉग्रेस. डहाणू, तळोदा येथे भाजपा. शिवसेना : जव्हार, वाडा.
•मीरारोड : यादव ह्यांच्या पत्त्यावर इलियास ह्यांचे बॅंक खाते, मुंब्र्याच्या एजंटची कमाल.
•पनवेल महानगरपालिका संपूर्ण दारुबंदी ठराव.
•वसई विरार महानगरपालिका २००% करवाढ, ग्रामीण भागात नाराजी व तीव्र विरोध. आंदोलनाची तयारी.
•वसई : अनधिकृत बांधकामाला ना हरकत दाखला देणाऱ्या पाली ग्रामपंचायत सरंपचावर कारवाई नाही.
•मीराभाईंदर महानगरपालिका २८% करवाढ
•मीराभार्इंदरमध्ये जन्म-मृत्यू दाखले देण्याचे काम झाले ठप्प वैद्यकीय अधिका-याला अटक : नवीन अधिका-याची नियुक्ती नाही
•जुहू किनाऱ्यावर प्रकाश प्रदूषण, आवाज फाउंडेशनची तक्रार.
•तानसा पाईपलाईन प्रकल्पग्रस्त विद्यार्थी शिक्षणबाह्य?
•एफआरडीआय विधेयक लांबणीवर
•नॉनक्रिमीलेयर मर्यादा ८ लाख
•अदानीचा ऑस्ट्रेलियातील प्रकल्प रद्द
=====================
*वसई विरार : प्रधानमंत्री आवास योजनेत घर, आकर्षक दरात सुलभ गृहकर्ज. संपर्क 7770074110*
~~~~~~~~~~~~~~~~~
*Home Loan, Buy, Sale, Rent, Lease, Budget Properties in Vasai Virar,  7770074110*
###################
http://palgharlive.com
https://fb.com/palgharlive

Wednesday, December 13, 2017

ठळक बातम्या , १३ डिसेंबर २०१७

*ठळक बातम्या*
१३ डिसेंबर २०१७
• *एमएमआरडीए विकास आराखडा सुनावणीशिवाय सादर होणार? आराखड्यावर ३८,००० हरकती घेणाऱ्या पर्यावरण संवर्धन समितीकडुन न्यायालयीन लढ्याची तयारी.*
• वसई विरार महापौर मॅरेथॉन १८००० धावपटुंसह यशस्वी
• *वसई किल्ल्यात हाकेच्या अंतरावर पोलिस ठाणे, ६ वर्षाच्या बालिकेवर बलात्कार*
• *नालासोपारा पुर्वेला ११ वर्षाच्या मुलाचा अपघाती मृत्यू, शाळेने ५ मिनिटांच्या उशीरासाठी नाकारला होता प्रवेश, ४ रुग्णालयानी दाखल करण्यास दिला होता नकार, वसईविरारच्या अपुऱ्या आरोग्यव्यवस्थेचा ठरला बळी*
• *वसई विरार मनपाचा उत्पन्न वाढीसाठी करवाढीचा सोपा उपाय? मोबाईल टॉवर, जाहिरात धोरणाकडे दुर्लक्ष , अनधिकृत बांधकाम कारवाईचा खर्चही पालिकेकडून, पालिका हद्दीत होणाऱ्या चित्रीकरणाचे शुल्क नाही, वाहनतळ नाही, नागरीकांची नाराजी*
• वसईतील एसटीची शालेय बससेवा सुरू, विद्यार्थ्यांना पासचेही वितरण
• पालघर जिल्ह्यात लागवड केलेल्या मोगरा व हळदीला बाजारपेठेत भाव व उचल नसल्याने आदिवासींचे रोजगारासाठीचे स्थलांतर
• विरारजवळील अर्नाळा गावात ‘मी जागृत बंदरपाडेकर स्वच्छता अभियानाने' शंभरावी स्वच्छता मोहीम पूर्ण केली.
• ठाणे : वीजचोरी केल्याप्रकरणी माजी महापौर नईम खान, दिव्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष विजय भोईर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक साजीद अन्सारी आणि अश्रफ अली चौधरी ह्यांच्यावर  गुन्हा दाखल.
• वांद्रे विरार उन्नत मार्गाचा पुनर्विचार? बोरीवली विरार पाचवी सहावी मार्गिका सुरु होणार
• विरार पनवेल मार्ग प्रकल्पास उशीर.  येत्या काही वर्षात ५ लाख प्रवासी वाहतुकीसाठी तरतूद
• विरार डहाणू चौपदरीकरणासही उशीर.
• पॅनकार्ड क्लबच्या ५१ लाख गुंतवणूकदारांचे ७००० करोड अडकले. मालमत्ता विकुन गुंतवणूक परत करण्यासाठी विशेष प्राधिकरणाची नियुक्ती
• मीरा भाईंदर आशा सेविकांवर बेरोजगारीची वेळ
• ठाणे महापालिकेचे रुग्णालय : ११ महिन्यांत ९०५ मृत्यू, अपुरा औषध पुरवठा
• विकास नियंत्रण नियमावली ३३ (७)चा बिल्डरांच्या फायद्यासाठी गैरवापर होत असल्याचा आरोप,  मुंबई महापालिकेच्या मालकीच्या भूखंडांवरील इमारती धोकादायक जाहीर करून इमारतींच्या पुनर्विकासाचे काम मर्जीतील बिल्डरांना देण्यात येत असल्याचा दावा
=====================
*नामांकित कंपनीसाठी मुले-मुली  पाहिजेत , पात्रता १०वी पास-नापास, वेळ सकाळी ९ ते ५, ठिकाण वसई-विरार , संपर्क 7770074110*
###################
http://palgharlive.com
https://fb.com/palgharlive

Saturday, December 9, 2017

ठळक बातम्या ९ डिसेंबर 2017

*ठळक बातम्या*
९ डिसेंबर २०१७
• *वसईतल्या गावांवर एसटीनंतर वाढीव घरपट्टीचे संकट. वसईविरार महानगरपालिकेने घरपट्टी जवळपास दुप्पट केली असून, अजुन वाढ होण्याचे संकेत दिले आहेत.*
•वसई-विरार शहरात भूमाफियांकडुन अनधिकृत बांधकामांचा सपाटा, त्यावर बेकायदा इमारती उभ्या राहिल्या आहेत. शासनाने आरक्षित केलेल्या जागाही अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांनी हडप केल्या आहेत. आरक्षित जागा नष्ट होण्याचा धोका निर्माण. ८०० आरक्षित भूखंड मिळवण्याच्या प्रक्रिया सुरू, पालिकेने आरक्षित भूखंडांचा शोध सुरू केला, शासनाकडून हस्तांतरण नाही.
•बोरिवली-विरार रेल्वे प्रवास, पाचवी-सहावी मार्गिका विरारपर्यंत.
• *दिवाणमान, वसई येथे मिठागर जागा भरावप्रकरणी स्थानिक नागरीकांचा उच्च न्यायालयात लढा,* पालिकेला १ कोटी ५ लाख रुपयांची नोटीस. दोन वर्षात पालिका कंत्राटदारावर कारवाई नाही?
•गुजरात निवडणूक: वृद्ध मतदाराने मनमोहन सिंगांच्या हातात ठेवली घोटाळ्यांची यादी
• *वसईविरार महानगरपालिकेने दिव्यांगांसाठीच्या योजनांवर पुरेसा खर्च व जनजागृती न केल्याचा आरोप.* पालिकेकडून जनजागृती सुरु असल्याचा व पुरेसा निधी वापर असल्याचा दावा.
•खानिवडे वसई येथे बंधाऱ्याचा खांब वाहुन गेल्याने शेतीत खारे पाणी.
•उत्तन भाईंदर येथे वादळाचा सुक्या मासळीला फटका. अवकाळी पावसाने मासळी कुजली, मासळी सुकत घालण्याची व्यवस्था मोडली. नुकसानभरपाईची मागणी.
• *बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण, किनारपट्टीच्या काही भागांत पावसाची शक्यता.*
•कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा (केडीएमसी) आर्थिक डोलारा केव्हाही कोसळण्याची शक्यता.
•चोरून वीज वापरणाऱ्या माजी महापौर नईम खान यांच्यावर केलेली कारवाई ताजी असतानाच दिव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंब्रा, कौसा, शीळ, दिवा ब्लॉक कार्याध्यक्ष विजय अनंत भोईर बारमध्ये वीज चोरी केल्याची व बारला वीज मीटरच नसल्याची बाब समोर.
• *व्यापा-याला खंडणीसाठी दाऊद इब्राहिमच्या नावाने धमक्या?*  या प्रकरणात पंकज भगवानदास ठाकूर आणि संजय जोशी या दोन इसमांचा सहभाग असल्याचा पुरवणी जबाब फिर्यादीने दिला, वसई हद्दीत कोट्यवधी रुपयांची जमीनीवर गुंडांकडुन कब्जा, सशस्त्र गुंडांचा चोवीस तास पहारा, वालीव पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. या टोळीने हायवे परिसरात मोकळ्या जागांवर कब्जा करून खंडणीसाठी अनेकांना धमक्या दिल्याच्या तक्रारी आहेत.
•डहाणूत वीज बेपत्ता, डायमेकर्स, उद्योजक त्रस्त
•सव्वा कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या पत्रकारासह पोलीस कोठडी, बिल्डरकडे मागितली होती खंडणी; सापळा रचून केली अटक,  कल्याण येथील पत्रकार सिद्धार्थ अशोक मोकळने साप्ताहिक राजकीय दर्शन, फ्लेक्स आणि यूट्यूबच्या माध्यमातून गृहनिर्माण प्रकल्पाची बदनामी केली.
• *यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व नवमहाराष्ट्र युवा अभियान यांच्यातर्फे यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कार – २०१८साठी अर्ज करण्याचे अवाहन*. माहिती व फॉर्म www.ycpmumbai.com या वेबसाइटवरून डाऊनलोड करावेत. प्रस्ताव व अर्ज १० डिसेंबरपर्यंत संघटक, नवमहाराष्ट्र युवा अभियान, चव्हाण प्रतिष्ठान, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, मुंबई – २१ या पत्त्यावर, अथवा navmaharashtra@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवावेत.
=====================
पाहिजेत:  RMO, नर्सींग स्टाफ, लेबोटोमिस्ट, सेल्स मुल/ मुली *संपर्क 7709907703*
###################
*Website Rs 3500/- , Mobile App 10,000/- Contact 7770074110*
###################
रक्ताचा एकही थेंब वाया न जाता रुग्णांपर्यंत पोहचविण्यासाठी *ब्लडॲप* ( *BloodApp* ) - रेणुका फाऊंडेशन
https://play.google.com/store/apps/details?id=com.renukafoundations
###################
http://palgharlive.com
https://fb.com/palgharlive

Friday, December 8, 2017

ठळक बातम्या ८ डिसेंबर २०१७

*ठळक बातम्या*
८ डिसेंबर २०१७
•वसईतल्या गावांना एसटी आणि पालिका दोन्ही नसल्याने नागरीकांची गैरसोय. पालिकेची सेवा एसटीपेक्षा महाग, पालिकेने केले महागाईचे समर्थन. संतप्त ग्रामस्थ पालिका मॅरेथॉन रोखणार?
•वसई येथील तहसीलची परवानगी न घेताच भरावाद्वारे भूखंड बळकावल्याचा प्रकार उघडकीस. वसई-विरार महापालिकेने वसईतील मौजे दिवानमन या सरकारच्या सर्व्हे क्र. १७६ व १७६ अ या मिठागर असलेल्या भूखंडावर भराव टाकून जमीन ताब्यात घेतली व त्यावर बांधकाम केले आहे.
•नायगाव खाडीतील प्रदूषणाने मेलेले मासे ओखीच्या प्रभावाने गास सनसिटीपर्यंत. प्रशासनाचे दुर्लक्ष, स्थानिकांनी घेतले प्रदूषित मासे.
• *पालघर ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग येथे मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रे स्थापन.* Commissioner of Fisheries,Taraporwala Aquarium, Mumbai
Phone: 022-22821239
•१० डिसेंबर वसई विरार मॅरेथॉन, १८००० स्पर्धक.
• *११ बांग्लादेशीयाना टाकीपाडा गास नालासोपारा येथुन अटक.* स्थानिक पोलिस अंधारात. दहशतवादविरोधी पथकाने केली कारवाई. ह्या आधी दहशतवादी गुन्हेगारी पाश्वर्भूमीच्या गुन्हेगारांना सोपाऱ्यातुन अटक करण्यात आली होती. स्थानिक एजंटकडुन बांग्लादेशींना
•बनावट शिक्के बनवल्याप्रकरणी वसईतील सहा जणांविरोधात गुन्हा दाखल
•लग्नानंतर महिलेचा धर्म बदलत नाही: सुप्रीम कोर्ट
•पालघर : कुंटणखान्यातल्या सेप्टिक टँकमध्ये मानवी हाडे सापडल्यानंतर पोलिसांनी महिलेला केले अटक, तिने १२ वर्षांपूर्वी पतीची हत्या करून प्रेत टाकीत टाकल्याची दिली कबुली
•पालघर : शेतकरी-मच्छीमारांना ओखीचा फटका, २ हजार ३६६.५४ हेक्टर क्षेत्रावर परिणाम
•आठवड्याभरात उत्तर भारतनंतर नेपाळमध्ये भूकंप. ५ रिश्टर स्केलचे भूकंप
•प्रियांका पाचव्यांदा ठरली 'सेक्सीएस्ट एशियन वुमन', चित्रपटात स्त्रियांना सेक्स सिंबॉल म्हणून सादर केले जात असल्याची तक्रार करणाऱ्या कलाकारांची सेक्सीएस्ट वूमनसाठी चढाओढ.
•सरपंचांचे मानधन वाढवुन ओळखपत्र देण्याचे आश्वासन.
• *यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व नवमहाराष्ट्र युवा अभियान यांच्यातर्फे यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कार – २०१८साठी अर्ज करण्याचे अवाहन*. या पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३१ डिसेंबर २०१६ अखेरीस ३५ वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. या पुरस्कारासंबंधीची माहिती व फॉर्म www.ycpmumbai.com या वेबसाइटवरून डाऊनलोड करावेत. प्रस्ताव व अर्ज १० डिसेंबरपर्यंत संघटक, नवमहाराष्ट्र युवा अभियान, चव्हाण प्रतिष्ठान, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, मुंबई – २१ या पत्त्यावर, अथवा navmaharashtra@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवावेत.

=====================
पाहिजेत:  RMO, नर्सींग स्टाफ, लेबोटोमिस्ट, सेल्स मुल/ मुली *संपर्क ७७०९९०७७०३*
###################
*Website Rs 3500/- , Mobile App 10,000/- Contact 7770074110*
###################
रक्ताचा एकही थेंब वाया न जाता रुग्णांपर्यंत पोहचविण्यासाठी *ब्लडॲप* ( *BloodApp* ) - रेणुका फाऊंडेशन
https://play.google.com/store/apps/details?id=com.renukafoundations
###################
*पाहिजेत: हेल्पर , फिटर, फॅब्रीकेशन, मशीन ऑपरेटर, वसई. संपर्क 7709907703*
###################
Website developer , UI/UX, Vasai, Contact 7770074110
###################
http://palgharlive.com
https://fb.com/palgharlive

Thursday, December 7, 2017

ठळक बातम्या - ७ डिसेंबर २०१७

*ठळक बातम्या*
७ डिसेंबर २०१७
•वसईतल्या गावांना एसटी आणि पालिका दोन्ही नसल्याने नागरीकांची गैरसोय. पालिकेची सेवा एसटीपेक्षा महाग, पालिकेने केले महागाईचे समर्थन. संतप्त ग्रामस्थ पालिका मॅरेथॉन रोखणार?
•नायगाव पुर्व येथे पालिकेनेच केली झाडांची कत्तल? खाडीचे पाणी रोखणारी झाडे तोडली गेली.
•चित्रपटगृहामध्ये घरी तयार केलेले खाद्यपदार्थ, पाणी घेऊन जाण्यास प्रतिबंध नाही, विद्यार्थ्यांकडून पार्किंग घेतल्यास कारवाई - राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समिती
•पालघर पोलिसांची बोईसर दांडीपाड़ा येथे सेक्स रॅकेटवर कारवाई, 5 महिलांना अटक
•वसई-विरार पालिका बसमुळे मुलीचा अपघात? तक्रार घेण्यास पोलिस टाळाटाळ करत असल्याचा आरोप
• ‘काम द्या, अन्यथा रोजगार भत्ता द्या!’, श्रमजीवी संघटनेतर्फे विक्रमगड तहसीलदार कार्यालयावर मोर्चा
• कल्याण-डोंबिवली ‘परिवहन’च्या व्यवस्थापकांची हकालपट्टी
• नायगाव पुर्व येथे अनेक वर्षानंतर टॅंकरमुक्ती?  सूर्या पाणी योजनेतून हे पाणी दिले जाणार आहे. सोसायट्यांना अर्ज करण्याचे आवाहन.
• *पालघर ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग येथे मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रे स्थापन.* सागरी मत्स्यव्यवसाय नौकानयन, सागरी मासेमारी पद्धती, नौका इंजिनाची देखभाल व परिरक्षण इ. प्रशिक्षण. प्रशिक्षणार्थीस मच्छीमार सहकारी संस्थेची शिफारस आवश्यक.
•जव्हार तालुक्यातील १० ग्रा.पं.ची चौकशी, भ्रष्टाचाराच्या शेकडो तक्रारी दाखल
•पालघर जिल्हयात जव्हार, डहाणू या नगरपरिषदांसह वाडा नगरपंचायतीची निवडणूक 13 डिसेंबरला.  सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची रणनिती आखत स्टार प्रचारकांच्या सभांचे आयोजन
•१० डिसेंबर वसई विरार मॅरेथॉन, १८००० स्पर्धक,
•ठाणे आणि वसई-विरार परिसरात धुक्याचे साम्राज्य
• *११ बांग्लादेशीयाना टाकीपाडा गास नालासोपारा येथुन अटक.* महाराष्ट्र एटीएस विक्रोळी शाखेने केली कारवाई.  पश्चिम बंगाल ग्रामपंचायतचे जन्म दाखले बनवले गेले, त्यानंतर नालासोपाराच्या स्थानिक एजंटमार्फत भाडेकरार वापरून आधारकार्ड व पॅनकार्ड मिळवण्यात आले, त्यातुन पासपोर्ट मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
•मुंबई : मध्य रेल्वे , पश्चिम रेल्वे, हार्बर रेल्वे मार्गावरील लोकलचे वेळापत्रक पुन्हा कोलमडले, धुक्यामुळे लोकल पंधरा मिनिटे उशिरा
•पालघरला होणार शिक्षण विभागाची पाच कार्यालये
•साखरशेत प्राथमिक आरोग्य केंद्रात २५ पदे रिक्त, रुग्णांचे प्रचंड हाल, लोकप्रतिनिधींनी टेकले अखेर हात
•रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी ५५ हजार ८८९ झाडे तोडण्यात येणार.
•‘कट प्रॅक्टिस हा डॉक्टर, रुग्णालयांचा भ्रष्टाचारच!’ - बदलता महाराष्ट्र, लोकसत्ता
•रात्रबाजाराची योजना शिवसेनेने रोखली. शिवसेनेच्या गच्चीवरील पार्टीचा प्रस्ताव भाजपाने रोखल्यामुळे भाजपाच्या रात्रबाजार या संकल्पनेला शिवसेनेचा विरोध असल्याची चर्चा. हॉटेलच्या गच्चीवरील पार्टीला होणार धिंगाणा चालतो, सामान्यांसाठी असलेला रात्रबाजार नको, भाजपाचा आरोप.
•कॅशलेस व्यवहार स्वस्त होणार: आरबीआय
•आजचे डिझेलचे दर (प्रति लिटर, रुपयांमध्ये) : मुंबई ६१.२०, पुणे ६०.१९, नाशिक ६०.६८, औरंगाबाद ६२.१६, नागपूर ६१.७३, अमरावती ६१.७३
•आजचे पेट्रोलचे दर (प्रति लिटर, रुपयांमध्ये) : मुंबई ७६.६१, पुणे ७६.४८, नाशिक ७६.९९, औरंगाबाद ७७.५६, नागपूर ७७.१०, अमरावती ७७.१०
• *यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व नवमहाराष्ट्र युवा अभियान यांच्यातर्फे यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कार – २०१८साठी अर्ज करण्याचे अवाहन*. या पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३१ डिसेंबर २०१६ अखेरीस ३५ वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. या पुरस्कारासंबंधीची माहिती व फॉर्म www.ycpmumbai.com या वेबसाइटवरून डाऊनलोड करावेत. प्रस्ताव व अर्ज १० डिसेंबरपर्यंत संघटक, नवमहाराष्ट्र युवा अभियान, चव्हाण प्रतिष्ठान, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, मुंबई – २१ या पत्त्यावर, अथवा navmaharashtra@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवावेत.

=====================
पाहिजेत:  RMO, नर्सींग स्टाफ, लेबोटोमिस्ट, सेल्स मुल/ मुली *संपर्क ७७०९९०७७०३*
###################
*Website Rs 3500/- , Mobile App 10,000/- Contact 7770074110*
###################
रक्ताचा एकही थेंब वाया न जाता रुग्णांपर्यंत पोहचविण्यासाठी *ब्लडॲप* ( *BloodApp* ) - रेणुका फाऊंडेशन
https://play.google.com/store/apps/details?id=com.renukafoundations
###################
*पाहिजेत: हेल्पर , फिटर, फॅब्रीकेशन, मशीन ऑपरेटर, वसई. संपर्क 7709907703*
###################
Website developer , UI/UX, Vasai, Contact 7770074110
###################
http://palgharlive.com
https://fb.com/palgharlive