Wednesday, November 29, 2017

ठळक बातम्या २९ नोव्हेंबर २०१७

*ठळक बातम्या*
२९ नोव्हेंबर २०१७
• *आदिवासी जमीन संपादन ग्रामसभेच्या मान्यतेविना, बुलेट ट्रेनसह समृद्धी मार्ग, पेसा कायद्यानुसार बंधनकारक अट रद्द*
•भाईंदर: अवैध बांधकामप्रकरणी शिवसेना नगरसेवकावर ‘एमआरटीपी’ गुन्हा नाही
•सरपंच, उपसरपंचांच्या बडतर्फीचे आदेश. अर्नाळा किल्ला ग्रामपंचायत शौचालय घोटाळाप्रकरणी उच्च न्यायालयाचा दट्टय़ा
•नालासोपारायेथे नगरसेवकाने व्हाट्सपवर जिवंत पोलिस अधिकाऱ्यांना वाहिली श्रद्धांजली, शहीद पोलिस कर्मचाऱ्यांची नावे चुकीची, मनसेने तुळिंज पोलिस ठाण्यात नोंदवली तक्रार, नगरसेवक सचिन देसाई ह्यांनी दिलगीर नोंदवत अनवधानाने झाल्याचे स्पष्टीकरण दिले.
•सर्व सेवा आता एकाच क्रमांकावर, वसईविरार मनपाचा निर्णय.
•वसईत बेकायदा मोबाइल मनोऱ्यांच्या संख्येत वाढ; कोटय़वधी रुपयांच्या महसुलावर पाणी
•मोबाईल कंपन्या आणि वसईविरार महानगरपालिकेचे साटेलोटे असल्याचा शिवसेनेचा आरोप
•आणखी एक सेक्शन कार्यालय वाढवा, विक्रमगडकरांची मागणी, वीजेची समस्या कायम असल्याने नागरिकांमध्ये संताप
•बाळकापरा गावाला डेंग्यूचा विळखा, जव्हारच्या ग्रामीण रुग्णालयात २१ रुग्ण दाखल
•आदिवासी एकता परिषदेचा वसई विरार महापालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा. प्रधानमंत्री आवास योजना आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला यावेळी जोरदार विरोध.
• *विकासाच्या नावाखाली आदिवासींना हद्दपार करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना आणि पंतप्रधान आवास योजना राबवण्याचे कारस्थान. रस्ता रुंदीकरण, बुलेट ट्रेन, मुंबई-बडोदा एक्सप्रेस हायवे, मेट्रो ट्रेन, सागरी महामार्ग, रिंग रुट, स्मार्ट सिटी यामुळे आदिवासी विस्थापित होणार असल्याचा आरोप*
•चिंचणी दांडेपाडा राजेश आक्रे यांनी मुलीच्या लग्नात मिळालेला ५ लाखाचा आहेर बाबा आमटेच्या हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्पाला दिला,  महत्वाचे म्हणजे लग्नपत्रिकेत केलेल्या आवाहनाला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जास्तीत जास्त रोख रक्कम आहेर म्हणून दिली.
•आपल्या मच्छीमार समाजातील हळदी कार्यक्र मावर होणारी वारेमाप उधळपट्टी अनिष्ट प्रथा, अंधश्रद्धा, रोखण्यासाठी ते संघटनाद्वारे सतत कार्यरत राहीले असून त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नातही हळदीचा कार्यक्रमाला फाटा दिला.
•पालघर : शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम नाही?
•‘मनोरा’तील भ्रष्टाचार पोलीस ठाण्यात, भाजपा आमदाराने दिली तक्रार, सा. बां. खात्याने काम न करताच उचलले बिल
•बारावीच्या परीक्षेवेळी शिक्षक संपावर, ८ डिसेंबरपासून आंदोलन
•वडिलांच्या मृत्यूबद्दल कोणत्याही प्रकारचा संशय नाही, न्या. लोया यांच्या मुलाचे मुख्य न्यायमूर्तीना पत्र
•‘पैसेही गेले, अन् घरही गेले’, दलालांची घरे पडली महाग, वडाळ्यातील भक्ती पार्क परिसरातील ८२ कुटुंबे रस्त्यावर
•मागाठाणे मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे आणि त्यांचे सहकारी यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करा, या मागणीसाठी देसाई यांचे आंदोलन.
•मुकेश अंबानींच्या घरासाठी केलेली जमीनविक्री बेकायदा, लबाडीचा व्यवहार, वक्फ मंडळाचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र
•पाच डझनची हापूसची पहिली पेटी नऊ हजारांना, नवी मुंबई एपीएमसीत आंबा दाखल
•पंतप्रधान आवास योजनेतून राज्यात फक्त ६ घरे तयार , बांधायची होती दीड लाख घरे; राज्याने दिला नाही एकही पैसा
•कोपर्डीचा आज निकाल, नराधमांना फाशी की जन्मठेप ?
•उत्तर कोरियाने जपानवरून डागलं क्षेपणास्त्र; ट्रम्प खवळले!
•किशोरच्या मासिकाच्या १९७१ पासूनच्या ई-आवृत्ती kishor.ebalbharati.in/Archive या वेबसाइटच्या माध्यमातून रविवारी उपलब्ध
=====================
पाहिजेत:  RMO, नर्सींग स्टाफ, लेबोटोमिस्ट, सेल्स मुल/ मुली *संपर्क ७७०९९०७७०३*
###################
*Website Rs 3500/- , Mobile App 10,000/- Contact 7770074110*
###################
रक्ताचा एकही थेंब वाया न जाता रुग्णांपर्यंत पोहचविण्यासाठी *ब्लडॲप* ( *BloodApp* ) - रेणुका फाऊंडेशन
https://play.google.com/store/apps/details?id=com.renukafoundations
###################
*पाहिजेत: हेल्पर , फिटर, फॅब्रीकेशन, मशीन ऑपरेटर, वसई. संपर्क 7709907703*
###################
Website developer , UI/UX, Vasai, Contact 7770074110
###################
http://palgharlive.com
https://fb.com/palgharlive

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home