Friday, June 16, 2017

*एमएमआरडीए नापास !!*

१५ जुन २०१७ | दुपारी १ वाजता 

*एमएमआरडीए नापास !!*

पालघर रायगड आणि ठाण्यातील गावकऱ्यांवर एमएमआरडीएने लादलेल्या प्रस्तावित प्रारूप आराखड्यावर सूचना व हरकती मागवल्या गेल्या होत्या.

पर्यावरण संवर्धन समिती वसई विरार , धारावी बेट बचाओ समिती, आदिवासी एकता परीषद , इतर संघटना, असंख्य कार्यकर्ते व हजारो गावकऱ्यांनी एकत्र येऊन ६०  हजारांपेक्षा जास्त हरकती एमएमआरडीएकडे नोंदवल्या आहेत.

गावकऱ्यांची गैरसोय टाळावी व त्यांना आपले म्हणणे हे लोकशाहीच्या मार्गाने कोणत्याही दडपणाशिवाय मांडता यावे ह्याकरिता सुनावणी ही गावांमध्येच व्हावी अशी लेखी मागणी एमएमआरडीए आयुक्तांकडे करण्यात आली होती. ही मागणी दुर्लक्षित करुन आज एमएमआरडीएने वांद्रे येथील कार्यालयात  सुनावणी आयोजित केली. या सुनावणीची वेळ ही गावकऱ्यांसाठी पूर्णपणे अडचणीची आहे. शेतीची कामे सुरु झाली आहेत. मच्छीमार बोटी जाळी दुरुस्ती व बांधणी अशी अतिमहत्त्वाची कामे सुरु आहेत. शाळा कॉलेजच्या प्रवेशासाठी पालकांची धावपळ सुरु आहे. वृद्ध , दिव्यांग , आजारी, विद्यार्थी अशांसाठी गाव ते वांद्रे असा प्रवास जीवघेणाच आहे. तरीसुद्धा जवळपास २००० गावकरी शक्य त्या वाहनाने सुनावणीस उपस्थित झाले.

१५ जुन २०१७ रोजी दुपारी २ वाजता धारावी बेट बचाओ समिती आणि भाईंदरचे धारावी बेटाचे रहिवासी एमएमआरडीएच्या कार्यालयाबाहेर  सुनावणीसाठी हजारोंच्या संख्येने जमले होते. त्यांच्यासोबत पर्यावरण संवर्धन समिती तर्फे समन्वयक समीर वर्तक , मार्गदर्शक शशी सोनावणे सर, मॅकेन्झी डाबरे, विक्रांत चौधरी, एव्हरेस्ट डाबरे, बावतीस फिगेर , रॉजर रॉड्रिग्स, ऑल्विन रॉड्रिग्स, जोएल डाबरे, ॲलन डिसोझा, राजा फोस, गॉडसन , विमलेश नाखवा, अमोल घरत, बिनिश, संदेश पवार, मिल्टन मस्करन , माल्कम परेरा, आदिवासी एकता परीषदेचे वसई तालुका अध्यक्ष दत्ता सांबरे, प्रकाश जाधव आणि समिती हे सर्व उपस्थित होते. मात्र एमएमआरडीएकडे इतक्या गावकऱ्यांची सुनावणी करण्याइतकी तयारी नव्हती. एमएमआरडीएनेच बोलावलेले गावकरी दुपारच्या रखरखत्या उन्हात तापलेल्या रस्त्यावर नाईलाजाने थांबले. त्यात बाहेरुन खाण्यापिण्याचे पदार्थ आतमध्ये नेण्याची परवानगी नव्हती. ४ तास ताटकळत ठेवलेल्या आजारी वृद्ध व महिलांना सावलीत बसायची व्यवस्था उपलब्ध करुन देता आली नाही. शौचालयाचा हक्कही नाकारण्यात आला. एकूणच हुकुमशाही पद्धतीने सुनावणी घेणाऱ्या एमएमआरडीएने लोकशाहीने गावकऱ्यांना दिलेले मूलभूत हक्क नाकारुन दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.

गावकऱ्यांना एमएमआरडीएमध्ये न घेता २ तास बाहेर उभे ठेवुनही गावकरी परत न गेल्याने नाईलाजाने एमएमआरडीए अधिकाऱ्यांनी गावकऱ्यातील काही सदस्यांना आतमध्ये बोलावुन जाहीर सुनावणी घेण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षात वैयक्तिक सुनावणीचा हक्क असताना एमएमआरडीएने जाहीर सुनावणीचा प्रयत्न करुन गावकऱ्यांचा एकप्रकारे विश्वासघात तर केलाच आहे.

पर्यावरण संवर्धन समिती, धारावी बेट बचाओ समिती व इतर संघटनांच्या प्रतिनिधींनी एमएमआरडीएचि सुनावणी ही गावागावातूनच झाली पाहिजे अशी ठाम मागणी करत  आजच्या अमानुष दडपशाहीविरोधात खेद व्यक्त केला.

अधिक माहीतीसाठी संपर्क

समीर वर्तक   9326471352
पर्यावरण संवर्धन समिती

https://www.youtube.com/watch?v=8R3Gk99h_34
एमएमआरडीए सुनावणीसाठी आलेले गावकरी सहकार्य करताना
---------------------------------
https://www.youtube.com/watch?v=q7gfWl9CVqk
शशी सोनावणे सर - मुलाखत - एमएमआरडीए प्रस्तावित प्रारूप आराखडा
---------------------------------
https://www.youtube.com/watch?v=e9Kwpkarr1M
एमएमआरडीएत सुनावणीसाठी आलेल्या नागरिकांची जाणीवपूर्वक गैरसोय
---------------------------------
https://www.youtube.com/watch?v=mqKk-OM_Ozk
शशी सोनावणे सर - भाषण - एमएमआरडीए प्रस्तावित प्रारूप आराखडा
---------------------------------
https://www.youtube.com/watch?v=HxOua6FeXWg
शशी सोनावणे सर - भाषण २ - एमएमआरडीए प्रस्तावित प्रारूप आराखडा
---------------------------------
https://www.youtube.com/watch?v=A7SGteXEnAo
शशी सोनावणे सर - भाषण ३ - एमएमआरडीए प्रस्तावित प्रारूप आराखडा
---------------------------------
https://www.youtube.com/watch?v=XEoR0RDZnsU
शशी सोनावणे सर - भाषण ४ - एमएमआरडीए प्रस्तावित प्रारूप आराखडा
---------------------------------
https://www.youtube.com/watch?v=-dY7cpf_480
एमएमआरडीए सुनावणीसाठी आलेले गावकरी
---------------------------------
https://www.youtube.com/watch?v=08V-vRtS5sU
एमएमआरडीए सुनावणीसाठी आलेल्या गावकऱ्यांचे आभार
---------------------------------
https://www.youtube.com/channel/UCil2YGhV4YMdkoknUA1fWJA
Paryavaran Sanvardhan Samiti - Vasai Virar
---------------------------------

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home