Friday, June 30, 2017

पश्चिम वसईवर जीवनसंकट

*पश्चिम वसईवर जीवनसंकट*

http://www.loksatta.com/thane-news/drinking-water-issue-in-west-vasai-1502339/

सुहास बिऱ्हाडे, वसई, लोकसत्ता | Updated: June 30, 2017 3:17 AM

पाण्यात क्षारांचे प्रमाण अधिक; पिण्यायोग्य नसल्याचा धक्कादायक निष्कर्ष

वसईच्या पश्चिम पट्टय़ातील रहिवाशांना विहिरीचे पाणी प्यावे लागत असून जवळपास सर्वच विहिरींचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा निष्कर्ष जलतपासणीनंतर काढण्यात आला आहे. गावातील ५० ठिकाणच्या पाण्याच्या नमुन्यांवर आठ तपासण्या करण्यात आल्या, त्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या पाण्यात क्षार, क्लोराइडचे प्रमाण अधिक असून ते आरोग्यास हानीकारक असून हे पाणी पिण्यायोग्य असल्याचे तपासणीनंतर पुढे आले आहे.

वसईच्या पश्चिम पट्टय़ातील रहिवाशांचा विहीर हाच एकमेव जलस्रोत आहे. गेल्या काही वर्षांपासून येथील ग्रामस्थांना विविध आजारांची लागण होत आहे. ‘पाणी वाचवा’ या मोहिमेअंतर्गत काम करत असताना ‘स्वाभिमानी वसईकर’ या संस्थेला याबाबतची माहिती मिळाली. पाण्यात वाढलेले क्षार, गढूळपणा आणि बदललेली चव त्यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे संस्थेचे कार्यकर्ते व रसायनतज्ज्ञ ऑल्विन रॉड्रिक्स यांनी पाण्याची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. एप्रिल ते जून या कालावधीत मूळगाव, रमेदीपासून बोळिंज, राजोडी, आगाशी, नंदाखाल यांच्यासह वेगवेगळ्या गावांतील विहिरींतून ५०पेक्षा जास्त पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासले. प्रत्येक पाण्याच्या नमुन्यावर ८ चाचण्या करण्यात आल्या. पाण्यात आवश्यक घटक कोणते आहेत आणि विषारी, अयोग्य घटक कोणते आहे याची धक्कादायक माहिती समोर आली. हे पाणी दूषीत असून पिण्यास अयोग्य असल्याचे तपासणीनंतर समोर आले आहे. या परिसरात रहिवासी आजारी पडण्याचे कारण हेच दूषीत पाणी असल्याचे रॉड्रिक्स यांनी सांगितले.

*इलेक्ट्रॉनिक कचरा विहिरींमध्ये*

पाण्यातील विषारी घटकांचा प्रादुर्भाव वाढत चालल्याचे या चाचण्यांवरून दिसत आहे. बावखले, तळे, वापरात नसलेल्या विहिरी मोठे खड्डे यामध्ये वापरलेले सेल (बॅटरी), मोबाइलमधील खराब झालेली बॅटरी, खराब झालेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे, रसायने टाकली जात आहेत. ते झिरपून विहिरींचे पाणी प्रदूषित होत असल्याचे रॉड्रिक्स यांनी सांगितले. हा अहवाल पालिका, प्रांत आणि विविध शासकीय यंत्रणांकडे सादर केला जाणार आहे.

*पाण्यात कोणते घटक?*

नंदाखाल, बोळिंज, नानभाट, आगाशी, उमराळे, निर्मळ, गास, भुईगाव या सर्वच गावांतील पाण्यात क्षाराचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात आढळले आहे. हे प्रमाण ब ७०० पासून १५०० ते २०० मिलिग्रॅम प्रतिलिटर आहे. मूत्रपिंडांसह शरीरातील विविध अवयवांवर, केसांवर क्षारांचे दुष्परिणाम होतात.

या पाण्याचा सामू (पीएच) ८.५ आहे. काही ठिकाणी पाण्याचा सामू ९ ते ९.५ पर्यंत असल्याचे आढळून आले. त्यांचा परिणाम शरीरातील पेशींवर होतो, त्याशिवाय कर्करोगही होऊ शकतो.

पाण्यात जंतू, माती व रसायनेही आढळली असून त्यामुळे साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे.

पाण्यात क्लोराइडचेही प्रमाण जास्त आढळून आले आहे. सामान्य मानकाप्रमाणे त्याचे प्रमाण २५० मिलिग्रॅम प्रति लिटर असणे आवश्यक आहे. मात्र बोळींज-जापके, नंदाखाल, भुईगाव या ठिकाणी क्लोराइडचे प्रमाण ३०० मिलिग्रॅम प्रति लिटर आढळले आहे. नैसर्गिकरीत्या अतिउपशामुळे खारे पाणी स्वच्छ पाण्याची जागा घेत आहे.

आगाशी, नंदाखाल, बोळिंज या ठिकाणी नायट्रेटचे प्रमाण ४५ पासून १०० मिलिग्रॅमपर्यंत प्रतिलिटर असे आढळले आहे. हा घटक जास्त प्रमाणात असल्यास लहान मुले व गर्भवती महिलांना त्याची बाधा होऊ शकते.

*लोह आणि ‘फ्लुराइड’चे प्रमाण योग्य*

पाण्यातील विषारी घटक वाढत असताना लोह आणि फ्लुराइडचे प्रमाण मात्र योग्य असल्याचे आढळून आले. पाण्यामध्ये लोहाचे प्रमाण ०.३ मिलिग्रॅम प्रति लिटर आवश्यक असते.

चाचण्यांमध्ये लोहाचे प्रमाण योग्य असल्याचे आढळून आले, तर १ मिलिग्रॅम प्रति लिटर फ्लूराइडचे प्रमाण योग्य मानले जाते, तेदेखील योग्य प्रमाणात असल्याचे रॉड्रिक्स यांनी सांगितले.

Monday, June 26, 2017

चिंचणी दांडे पाडा येथे ऑलिव्ह रिडली कासव


24 जून 2017 चिंचणी दांडे पाडा येथे आणखी एक जखमी ऑलिव्ह रिडली कासव आढळले.
WCAWA चे  सदस्य विशाल राऊत,  स्थानिक रहिवासी रोहिदास आरेकर, निलेश दांडेकर आणि इतर मदतनीसांनी सहभाग घेतला.

https://fb.com/palgharlive
http://palgharlive.com

==

या आठवडय़ात ड़हाणू आणि पालघर किनारपट्टीवर असे पाच ऑलिव्ह रिड़ले कासव सापडले
उपचारासाठी ते ड़हाणू येथील WCAWA संस्थेच्या रेस्क्यू सेंटर मधे ठेवले आहेत.
आम्ही फक्त किनार्‍यावरून उचलून सुरक्षित ठिकाणी आणून ठेवतो,
धवल कंसारा, ड़ाॅ दिनेश विन्हेरकर आणि त्यांचे सहकारी त्याच्यावर योग्य उपचार करून पुन्हा समुद्रात सोडतात.
निसर्गाचा समतोल राखणारी ऑलीव्ह रिडले
समुद्री कासवांची जात नामशेष होऊ नये,
यासाठी ड़हाणू येथील WCAWA संस्थेने कासव
संवर्धन मोहिम हाती घेतलीय.
Sea turtles clearly play important roles in marine ecosystems. ... Whether by grazing on seagrass, controlling sponge distribution, feasting on jellyfish, transporting nutrients or supporting other marine life, sea turtles play vital roles in maintaining the health of the oceans."
Dhaval kansara (WCAWA)
==
संपर्क : विशाल राऊत, पालघर 9860535753

Sunday, June 25, 2017

२५ जुन २०१७ : जोरदार पाऊस, सुर्या नदी पाणीपातळीत वाढ.


सूर्यानदी, मासवण, पालघर

सूर्यानदी, मासवण, पालघर

२५ जुन २०१७, सकाळी १०:००
🌊🌊
पालघर तालुक्यातील सुर्या नदीच्या पाण्याच्या पातळीत वेगाने वाढ होते आहे. २४ जुन रोजी अर्नाळा किनाऱ्यावर लाटांचा तडाखा बसला.
🌊🌊
दुपारी १ वाजता भरतीच्या वेळी ५ मीटरपेक्षा उंच लाटा असण्याची शक्यता आहे.
🌊🌊
मुंबईत सखल भागात पाणी तुंबले आहे. काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना आहेत.
🌊🌊
पश्चिम रेल्वे काही विलंबाने सुरु आहे. मध्य रेल्वेवर  मेगाब्लॉक असल्याने अत्याआवश्यक असल्यासच प्रवास करावा.
🌊🌊
वीजेच्या गडगटासह पाऊस नागरीकांनी योग्य खबरदारी घ्यावी. झाडांच्याखाली थांबु नका. वीज पडण्याची किंवा झाड उन्मळून पडण्याची शक्यता आहे.
🌊🌊

https://facebook.com/palgharlive

http://palgharlive.com

Friday, June 16, 2017

*एमएमआरडीए नापास !!*

१५ जुन २०१७ | दुपारी १ वाजता 

*एमएमआरडीए नापास !!*

पालघर रायगड आणि ठाण्यातील गावकऱ्यांवर एमएमआरडीएने लादलेल्या प्रस्तावित प्रारूप आराखड्यावर सूचना व हरकती मागवल्या गेल्या होत्या.

पर्यावरण संवर्धन समिती वसई विरार , धारावी बेट बचाओ समिती, आदिवासी एकता परीषद , इतर संघटना, असंख्य कार्यकर्ते व हजारो गावकऱ्यांनी एकत्र येऊन ६०  हजारांपेक्षा जास्त हरकती एमएमआरडीएकडे नोंदवल्या आहेत.

गावकऱ्यांची गैरसोय टाळावी व त्यांना आपले म्हणणे हे लोकशाहीच्या मार्गाने कोणत्याही दडपणाशिवाय मांडता यावे ह्याकरिता सुनावणी ही गावांमध्येच व्हावी अशी लेखी मागणी एमएमआरडीए आयुक्तांकडे करण्यात आली होती. ही मागणी दुर्लक्षित करुन आज एमएमआरडीएने वांद्रे येथील कार्यालयात  सुनावणी आयोजित केली. या सुनावणीची वेळ ही गावकऱ्यांसाठी पूर्णपणे अडचणीची आहे. शेतीची कामे सुरु झाली आहेत. मच्छीमार बोटी जाळी दुरुस्ती व बांधणी अशी अतिमहत्त्वाची कामे सुरु आहेत. शाळा कॉलेजच्या प्रवेशासाठी पालकांची धावपळ सुरु आहे. वृद्ध , दिव्यांग , आजारी, विद्यार्थी अशांसाठी गाव ते वांद्रे असा प्रवास जीवघेणाच आहे. तरीसुद्धा जवळपास २००० गावकरी शक्य त्या वाहनाने सुनावणीस उपस्थित झाले.

१५ जुन २०१७ रोजी दुपारी २ वाजता धारावी बेट बचाओ समिती आणि भाईंदरचे धारावी बेटाचे रहिवासी एमएमआरडीएच्या कार्यालयाबाहेर  सुनावणीसाठी हजारोंच्या संख्येने जमले होते. त्यांच्यासोबत पर्यावरण संवर्धन समिती तर्फे समन्वयक समीर वर्तक , मार्गदर्शक शशी सोनावणे सर, मॅकेन्झी डाबरे, विक्रांत चौधरी, एव्हरेस्ट डाबरे, बावतीस फिगेर , रॉजर रॉड्रिग्स, ऑल्विन रॉड्रिग्स, जोएल डाबरे, ॲलन डिसोझा, राजा फोस, गॉडसन , विमलेश नाखवा, अमोल घरत, बिनिश, संदेश पवार, मिल्टन मस्करन , माल्कम परेरा, आदिवासी एकता परीषदेचे वसई तालुका अध्यक्ष दत्ता सांबरे, प्रकाश जाधव आणि समिती हे सर्व उपस्थित होते. मात्र एमएमआरडीएकडे इतक्या गावकऱ्यांची सुनावणी करण्याइतकी तयारी नव्हती. एमएमआरडीएनेच बोलावलेले गावकरी दुपारच्या रखरखत्या उन्हात तापलेल्या रस्त्यावर नाईलाजाने थांबले. त्यात बाहेरुन खाण्यापिण्याचे पदार्थ आतमध्ये नेण्याची परवानगी नव्हती. ४ तास ताटकळत ठेवलेल्या आजारी वृद्ध व महिलांना सावलीत बसायची व्यवस्था उपलब्ध करुन देता आली नाही. शौचालयाचा हक्कही नाकारण्यात आला. एकूणच हुकुमशाही पद्धतीने सुनावणी घेणाऱ्या एमएमआरडीएने लोकशाहीने गावकऱ्यांना दिलेले मूलभूत हक्क नाकारुन दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.

गावकऱ्यांना एमएमआरडीएमध्ये न घेता २ तास बाहेर उभे ठेवुनही गावकरी परत न गेल्याने नाईलाजाने एमएमआरडीए अधिकाऱ्यांनी गावकऱ्यातील काही सदस्यांना आतमध्ये बोलावुन जाहीर सुनावणी घेण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षात वैयक्तिक सुनावणीचा हक्क असताना एमएमआरडीएने जाहीर सुनावणीचा प्रयत्न करुन गावकऱ्यांचा एकप्रकारे विश्वासघात तर केलाच आहे.

पर्यावरण संवर्धन समिती, धारावी बेट बचाओ समिती व इतर संघटनांच्या प्रतिनिधींनी एमएमआरडीएचि सुनावणी ही गावागावातूनच झाली पाहिजे अशी ठाम मागणी करत  आजच्या अमानुष दडपशाहीविरोधात खेद व्यक्त केला.

अधिक माहीतीसाठी संपर्क

समीर वर्तक   9326471352
पर्यावरण संवर्धन समिती

https://www.youtube.com/watch?v=8R3Gk99h_34
एमएमआरडीए सुनावणीसाठी आलेले गावकरी सहकार्य करताना
---------------------------------
https://www.youtube.com/watch?v=q7gfWl9CVqk
शशी सोनावणे सर - मुलाखत - एमएमआरडीए प्रस्तावित प्रारूप आराखडा
---------------------------------
https://www.youtube.com/watch?v=e9Kwpkarr1M
एमएमआरडीएत सुनावणीसाठी आलेल्या नागरिकांची जाणीवपूर्वक गैरसोय
---------------------------------
https://www.youtube.com/watch?v=mqKk-OM_Ozk
शशी सोनावणे सर - भाषण - एमएमआरडीए प्रस्तावित प्रारूप आराखडा
---------------------------------
https://www.youtube.com/watch?v=HxOua6FeXWg
शशी सोनावणे सर - भाषण २ - एमएमआरडीए प्रस्तावित प्रारूप आराखडा
---------------------------------
https://www.youtube.com/watch?v=A7SGteXEnAo
शशी सोनावणे सर - भाषण ३ - एमएमआरडीए प्रस्तावित प्रारूप आराखडा
---------------------------------
https://www.youtube.com/watch?v=XEoR0RDZnsU
शशी सोनावणे सर - भाषण ४ - एमएमआरडीए प्रस्तावित प्रारूप आराखडा
---------------------------------
https://www.youtube.com/watch?v=-dY7cpf_480
एमएमआरडीए सुनावणीसाठी आलेले गावकरी
---------------------------------
https://www.youtube.com/watch?v=08V-vRtS5sU
एमएमआरडीए सुनावणीसाठी आलेल्या गावकऱ्यांचे आभार
---------------------------------
https://www.youtube.com/channel/UCil2YGhV4YMdkoknUA1fWJA
Paryavaran Sanvardhan Samiti - Vasai Virar
---------------------------------

Tuesday, June 13, 2017

पावसाळ्यातल्या रानभाज्या

दरवर्षी पावसाळ्यात विविध रानभाज्या आपल्या आसपास उगवलेल्या आढळून येतात. या भाज्या चवीला रुचकर असतातच; तसेच त्या पौष्टिक आणि औषधीसुद्धा असतात. अशाच काही रानभाज्यांची माहिती आज आपण पाहू
.
टाकळा :
- ही वनस्पती पावसाळ्यात उगवते व ऑक्टोवर ते डिसेंबर या कालावधीत तिला फुले येतात.
- टाकळा ह्या वनस्पतीला उग्र वास किंवा दुर्गंधी असला तरी टाकळ्याच्या कोवळ्या पानांची भाजी करतात.
- टाकळ्याच्या पानांची भाजी सर्व प्रकारच्या त्वचारोगात देतात तर त्याच्या बिया वाटून लेप त्वचेवर लावतात.
- तसेच भाजी गुणाने उष्ण असल्याने शरीरातील वात व कफदोष कमी होण्यास मदत होते.

आंबुशी :
- पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला आंबुशी ही नाजूक वनस्पती उगवलेली पाहावयास मिळते.
- ही महाराष्ट्रात सर्वत्र आढळते.
- आंबुशी गुणाने रूक्ष व उष्ण आहे. ही वनस्पती पचनास हलकी असून, भूक वाढीसाठी उपयुक्त आहे
- तसेच कफ, वात आणि मूळव्याध यात आंबुशी गुणकारी आहे

मायाळू :
- मायाळू ही बहुवर्षायू वेल असून, या वनस्पतीची बागेत, अंगणात, परसात तसेच कुंडीत लागवड करतात.
- मायाळूचे वेल कोेकणात सर्वत्र आढळतात.
- मायाळूची कोवळी पाने भाजीसाठी वापरतात.
- रक्ताची किंवा पित्ताची उष्णता अतिशय वाढल्यास मायाळूची भाजी देतात.
- गुणधर्माने ही भाजी थंड स्वरूपाची आहे.
- मायाळूची भाजी पालकाप्रमाणे जिरण्यास हलकी आहे.

करटोली :
- करटोलीची वेल कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम घाट व पश्‍चिम महाराष्ट्र परिसरात आढळतात.
- करटोलीला जून ते ऑगस्ट महिन्यात फुले व त्यानंतर फळे तयार होतात.
- करटोलीच्या फळांची भाजी कारल्यासारखीच असून, पावसाळ्याच्या अखेरीस ही भाजी बाजारात काही ठिकाणी येते.
- करटोली हे डोकेदुखीवरील उत्तम औषध आहे. तसेच मधुमेहाच्या रुग्णांनी या भाजीचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर कमी होते.

कपाळफोडी :
- ही वेलवर्गीय वनस्पती असून, पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात आढळते.
- या वनस्पतीची वेल महाराष्ट्रातील जंगले, शेत आणि ग्रामीण भागात आढळते.
- सांधेसुजीवर पंचांग पाण्यात किंवा दुधात वाटतात व लेप करतात. यामुळे ठणका कमी होतो व सूज उतरते.
- कानदुखीत तसेच कानफुटीत कानात घालतात. यामुळे कानदुखी थांबते म्हणूनच या वनस्पतीला कानफुटी असेही नाव आहे.

शेवळा :
- शेवळा ही वर्षायू, कंदवर्गीय वनस्पती आहे.
- महाराष्ट्रामध्ये शेवळा वनस्पती कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र व अकोला येथील जंगलात आढळते.
- शेवळ्याचा कंद औषधात वापरतात. याच्या कंदाची पाने दूध आणि साखरेबरोबर वाजीकरणासाठी देतात.
- शेवळ्याचे कंद व कोवळी पाने भाजीसाठी वापरतात.

मोरशेंड :
- ही वर्षायू रोपवर्गीय वनस्पती पावसाळ्यात सर्वत्र आढळते.
- शेतात, जंगल परिसरात, रस्त्यांच्या कडेने, ओसाड पडीक जमिनीवर, गावांत, गावाबाहेर सर्वत्र वाढलेली आढळते.
- मोरशेंड वनस्पतीच्या कोवळ्या पानांची भाजी करतात.
- या भाजीच्या सेवनामुळे रक्तातील युरिक ऍसिडचे प्रमाण कमी होऊन सांध्यांची सूज कमी होते.

नळीची भाजी :
- नळीची भाजी ही वनस्पती तळी व तलावांच्या शेजारी, काठांवर, पाणथळ, ओलसर जमिनीवर, दलदलीच्या ठिकाणी वाढलेली आढळते.
- महाराष्ट्रात ही वनस्पती सर्वत्र आढळते. या वनस्पतीचे वेल जमिनीवर पसरत वाढतात.
- नागिणीच्या उपचारात ही वनस्पती वापरली जाते. तसेच कावीळ, श्‍वासनलिका दाह व यकृतविकारात या वनस्पतीचा वापर करतात.

आघाडा :
- आघाडा ही वर्षायू रोपवर्गीय वनस्पती असून, पावसाळ्यात जंगलात, ओसाड, पडीक जमिनीवर, रस्त्यांच्या कडेने, शेतात सर्वत्र आढळते.
- प्रामुख्याने उष्ण कटिबंधीय प्रदेशात भारतात, महाराष्ट्रात सर्वत्र ही वनस्पती आढळते.
- या वनस्पतीची मुळे, पाने, फुले, फळे (पंचांग) औषधात वापरतात.
- अंगातील जास्त चरबी कमी होण्यासाठी आघाड्याच्या बिया उपयुक्त आहेत.
- जेवण्यापूर्वी आघाड्याचा काढा दिल्यास पाचक रस वाढतो, तर जेवणानंतर दिल्यास आम्लता कमी होते.
- रातांधळेपणात आघाड्याच्या मुळाचे चूर्ण देतात.

भुईआवळी :
- भुईआवळी ही वर्षायू रोपवर्गीय वनस्पती असून, 20 ते 50 सें.मी.पर्यंत उंच वाढते.
- भुईआवळी ही वनस्पती "इफोरबिऐसी' कुळातील म्हणजेच एरंडाच्या कुळातील आहे.
- याची पाने, कोवळी खोडे व फांद्या भाजी करण्यासाठी वापरतात.
- फ्ल्यूसारख्या थंडी-तापाच्या आजारात, तसेच वरचेवर सर्दी-खोकला, ताप येणे अशा लक्षणांत ही भाजी नियमितपणे खावी.

Monday, June 12, 2017

पालघर वार्ता १२ जुन २०१७

अनधिकृत शाळेत प्रवेश न घेण्याचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचे आवाहन

पालघर दि.12 जुन 2017:
 पालघर जिल्ह्यात सन 2016-17 या शैक्षणिक वर्षामध्ये 64 अनधिकृत शाळा सुरु आहेत. तरी सन 2017-18 या शैक्षणिक वर्षामध्ये या अनधिकृत शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये. असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद पालघर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे. अनधिकृत शाळेची नावे पुढील प्रमाणे आहेत.

वसई :- 1.) डॉ. दी.ज.गाळवणकर इंग्लिश हायस्कूल अर्नाळा कोळीवाडा जुना, 2.) रामकृष्ण इंग्लिश स्कूल बोळींज, 3.) प्रार्थना स्कूल कामन, 4.) लिटल एंजल्स हायस्कूल साष्टीकरण पाडा कामन, 5.) बाबा इंग्लिशस्कूल देवदळ कामन, 6.) भावधारा एकेडमी कातकरीपाडा चंदनसार, 7.) अदिन एकेडमी राईपाडा, 8.) सलम इंग्लिश स्कूल कोपरी, 9.) सिद्धी विनायक स्कूल भाटपाडा, 10.) चेलंगे एकेडमी गास कोपरी, 11.) बीबीसी हिंदी स्कूल पाटणकर पार्क नालासोपारा, 12.) राजीव गांधी इंग्रजी माध्यम निलेगाव नालासोपारा,   13.) सेंट जॉन हायस्कूल आशानगर कोल्ही, 14.) स्वामी विवेकानंद आशानगर कोल्ही, 15.) एम.के.जे. इंग्लिश स्कूल गांजाडीपाडा कोल्ही, 16.) सेंट थोमस स्कूल पाटीलपाडा चिंचोटी, 17.) वन नेस्ट स्कूल गवळीपाडा चिंचोटी, 18.) एफ.के.एकेडमी गोरातपाडा चिंचोटी, 19.) गुरुकुल विद्यालय उंबरपाडा राधावली, 20.) सनरोध इंग्लिश स्कूल मानेचापाडा नालासोपारा, 21.) अम्बेसेंटर स्कूल डोंगरपाडा पेल्हार गाव, 22.) ट्विंकल लिटील स्टार डोंगरपाडा पेल्हार गाव, 23.) मॉर्निंग स्टार स्कूल सह्याद्रीनगर वलई पाडा नालासोपारा, 24.) सीताराम बाप्पा इंग्लिश स्कूल जाबरपाडा नालासोपारा, 25.) सेंट लॉरेन स्कूल गणेशनगर बिलालपाडा, 26.) आदर्श कालवती विद्यामंदिर वैष्णव नगर हरवटेपाडा धानीव, 27.) मारुती विद्यामंदिर गावदेवी मंदिर नालासोपारा, 28.) राजीव गांधी मेमोरियल भाटपाडा धानीव बाग, 29.) फर्स्ट स्टेप स्कूल जाधव पाडा धानीव बाग, 30.) महात्मा फुले हायस्कूल जाधव पाडा धानीव बाग, 31.) होरीजन इंग्लिश स्कूल जाधव पाडा धानीव बाग, 32.) राजापती स्कूल गणेश चाळ, हनुमान मंदिर रोड धानीव बाग, 33.) के.नगर इंग्लिश एकेडमी अनुचाळ धानीव बाग, 34.) प्रथमेश पब्लिक हायस्कूल भागवत टेकडी पांढरेपाडा धानीव बाग, 35.) पिरेमेड स्कूल सुयोगनगर, 36.) ट्रेगल एकेडमी हायस्कूल जानकीपाडा वालीव, 37.) न्यू लिटील स्टार जानकीपाडा वालीव, 38.) वाय के पाटील हायस्कूल फुलपाडा विरार, 39.) सिद्धीविनायक शाळा गहूक पाडा विरार, 40.) ट्विंकल हायस्कूल क्वारी, उर्दू शाळेजवळ, 41.) दिशा एकेडमी नालासोपारा, 42.) सूर्योदय बाल विद्यामंदिर (इंग्रजी) नालासोपारा, 43.) सूर्योदय बाल विद्यामंदिर (हिंदी) नालासोपारा.

जव्हार :-  आनंदीबाई  पागी हायस्कूल दादर कोपरा ता.जव्हार.

पालघर : - 1.) दुर्वेश विद्यामंदिर दुर्वेश, 2.) आदर्श विद्यालय महागाव, 3.) सानेगुरुजी विद्यालय घाटीम, 4.) मातोश्री आशादेवी विद्यालय बोईसर, 5.) श्री.टी. आर.पी. इंग्लिश स्कूल बोईसर, 6.) सभापती मेमोरियल हायस्कूल बोईसर, 7.) फलाह ए. दराईल उर्दू हायस्कूल सरावली बोईसर, 8.) मदर वेलंकनी इंटरनेशनल स्कूल कुरगाव, 9.) बोईसर पब्लिक स्कूल चालवड, 10.) लिटील एंजल्स विद्यालय दांडी, 11.) पिओनीर इंग्लिश स्कूल उमरोली.

विक्रमगड :-  1.) शांतीरतन विद्यालय कोंड्गाव, 2.) सरस्वती विद्यालय सावरोली, 3.) श्री.महंत देवीपुराजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कुंजपाडा, 4.) नूतन विद्यालय केगवे.

वाडा :-  1.) छत्रपती शिवाजी इंग्लिश स्कूल खानिवली, 2.) दाढरे आदिवासी पंचकृषी विद्यालय दाढरे, 3.) यशोदा वाय. चौधरी इंग्लिश स्कूल कुडूस, 4.) कै. बाबुराव जी पाटील माध्यमिक स्कूल मानीवली, 5.) कै. बाबुराव जी पाटील माध्यमिक स्कूल उजैनी.