Sunday, November 6, 2016

पालघर वार्तापत्र ०६ नोव्हेंबर

*पालघर वार्तापत्र ०६ नोव्हेंबर*
======================
*हप्ता दिला नाही तर होते कारवाई, रिक्षा चालकांनी दंड थोपटले : वसईतील वाहतुकीचा प्रश्न एरणीवर*
शशी करपे, लोकमत, वसई
बेकादा रिक्षा वाहतूकीमुळे त्रस्त झालेल रिक्षाचालकांनी वाहतूक पोलिसांविरोधातच दंड थोपटले आहेत. बेकायदा रिक्षा वाहतूकीला वाहतूक पोलीस जबाबदार असून हप्ता दिला नाही तर कारवाई केली जाते असा थेट आरोप करण्यात आला आहे. इतकेच नाही तर अनेक वाहतूक पोलीस एकाच पाँईंटवर गेल्या अनेक महिन्यांपासून ठाण मांडून बसले असून त्यांच्या बदलीची मागणी केली आहे. ठाणे जिल्हा ऑटो रिक्षा टॅक्सी संघटनेने रिक्षा चालकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि बेकादा रिक्षा वाहतूकीविरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी येत्या ८ नोव्हेंबरला वसईत मोच्र्याचे आयोजन केले आहे.
वसई तालुक्यात वाढती लोकसंख्या लक्षात घेता येथे वाहतुक कोंडीची समस्या वारंवार भेडसावत आहे. त्यातच येथे अवैधरित्या टप्पा प्रवासी वाहतुक करणार्‍या वाहनांची संख्या वाढल्याने वाहतुकोंडीत अजुनही भर पडत आहे. यामुळे येथील अधिकृत रिक्षा चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या व इतर समस्यांच्यां निराकरण करण्यासाठी ठाणे जिल्हा ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेचे उपाध्यक्ष खालीद शेख यांनी अप्पर पोलिस अधिक्षक यांना एक निवेदन दिले आहे. यामध्ये त्यांनी विविध समस्या मांडल्या आहेत. या समस्यांचे तात्काळ निराकरण न झाल्यास ८ नोव्हेंबरला अप्पर पोलिस अधिक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असा इशारा दिला आहे.
वसई तालुक्यात सुमारे १५ हजार रिक्षा परवाने आहेत. मात्र येथे टप्पा प्रवासी वाहतुकीचा परवाना नसताना, अवैधरित्या प्रवाशी वाहतूक करणार्‍या टाटा मॅजिक, खाजगी बसेस, नोंदणी रद्द झालेल्या रिक्षा, खाजगी रिक्षा मोठय़ा प्रमाणात चालत आहेत. यामुळे अधिकृतपणे शासनाला कर भरणार्‍या व वेळोवेळी पासिंग करणार्‍या रिक्षा चालकांच्या व्यवसायावर गडांतर आले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलची तक्रार संघटनेने केली आहे. नियमित कर भरणार्‍या रिक्षा चालकांचा यामुळे व्यवसाय होत नाही व रिक्षावर बँकेतून घेतलेल्या कर्जाची परतफेड होत  नाही. परिणामी रिक्षा बँकेवाले खेचून घेवून जात आहेत, अशी रिक्षाचालकांची व्यथा आहे. वसई वाहतूक विभागात गेले अनेक वर्षे एकाच पॉईंटवर वाहतूक पोलिसांची नेमणूक केलेली आहे. त्यांना त्वरित हटवून प्रत्येक दिवशी अथवा आठवड्याने वाहतूक पोलिसांची एका नाक्यावर नेमणूक करावी अशी मागणी केली आहे. मोर्चाचा इशारा एका रिक्षा संघटनेने वाहतूक पोलिसांविरोधातच आरोप करीत थेट वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडे दाद मागण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. इतकेच नाही तर यावर कार्यवाही झाली नाही तर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे वसईत रिक्षा चालक विरुद्ध वाहतूक पोलीस या नव्या वादाला तोंड फुटणची शक्यता आहे.

_बेकायदा वाहतुक_
संघटनेने बेकादेशिरपणे चालणार्‍या रिक्षा आणि त्याला वाहतूक पोलीस देत असलेल्या संरक्षणाची तक्रारही केली आहे. नोंदणी रद्द झालेल्या खाजगी रिक्षा, लायसेन्स बॅच नसताना रिक्षा चालवणो, बेकादेशिरपणो टप्पा प्रवासी वाहतूक करणार्‍या टाटा मॅजिक, खाजगी बस, टाटा सुमो खुलेआम प्रवाशी वाहतूक करीत आहेत. कलम २०७ चा होतो गैरवापर
1वसई रोड पश्‍चिम येथील नवघर वसई डेपोच्या प्रवेशद्वारासमोर वाहतूक पोलिसांच्या आशिर्वादाने, रिक्षा तळ सोडून दररोज शेकडो रिक्षाचालक प्रवाशी भरतात. याचा एस.टी. बसेसना आत-बाहेर जाण्यास त्रास होतो. पालिकेच्या परिवहन बसेसना देखील येथे वळण घेण्यास त्रास होतो.
2अधिकृतपणे रिक्षा व्यवसाय करणार्‍या रिक्षा चालकांना देखील याचा त्रास सहन करावा लागतो. वसई वाहतूक विभागामार्मत मोटार वाहन कलम २०७ चा सर्रासपणे गैरवापर केला जात आहे. कलम २०७ अंतर्गत नोटीस अपवादात्मक परिस्थितीत म्हणजेच ज्या रिक्षा चालकांकडे लायसेन्स बॅच नसेल गाडीची फीटनेस, आर.सी.बुक, व परमीट नसेल अशांनाच ही नोटीस देऊन रिक्षा जमा करण्याचा अधिकार आहे.
3वाहतूक विभागाने ए.टी.एम. पावती असताना जे रिक्षा चालक मासिक हफ्ता देत नाहीत अशांना त्रास व्हावा त्याचा व्यवसाय बुडावा व कंटाळून त्याने वाहतूक विभागाला हप्ता सुरू करावा म्हणून कलम २०७ ची नोटीस देऊन रिक्षा चालकांची रिक्षा जप्त केली जाते. त्यामुळे रिक्षा चालकाचा व्यवसाय बुडतो, अशी तक्रार करण्यात आली आहे.
======================
*वाडा : चारमिनार कंपनीवर कामगारांचे उपोषणास्त्र*
तालुक्यातील मुसारणे येथील चारिमनार या कंपनीने गेल्या दोन महिन्यांपूर्वी येथील ४२ कामगारांना तडकाफडकी कमी केले होते. या कामगारांना पुन्हा कंपनीत कामाला घ्यावे या मागणी करिता येथील कामगार आपल्या कुटुंबियांसह येत्या सोमवार दि. ७ पासून वाडा तहसील कार्यालया समोर बेमुदत उपोषण आंदोलन छेडणार असल्याचा इशारा एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या कंपनीत छतावरील पत्र्याचे उत्पादन या कंपनीत केले जाते. येथील ४२ कामगारांना कंपनी प्रशासनाने कामावरून तडकाफडकी काढून टाकले. त्यानंतर कामगारांनी संबंधित शासकीय कार्यालयाचे दरवाजे ठोठावले पण न्याय मिळाला नाही. अशा परिस्थितीत कामगारांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. त्या नंतर न्यायालयाने कामगारांना कामावर घेण्याचा आदेश दिला. मात्न या आदेशालाही कंपनी जुमानत नसल्याचा आरोप निवेदनात केला आहे. दरम्यान, चारमिनार कंपनीचे व्यवस्थापक फारुख मनियार यांनी सांगितले की, काढून टाकलेले ४२ कामगार हे ठेकेदारी पद्धतीने कंपनीमध्ये काम करीत होते. त्यामुळे त्यांचा थेट कंपनीशी संबध नाही. (लोकमत)
======================
*सहा महापालिका हद्दीत ‘झोपु’ योजना लागू होणार?*
मुंबई महानगर प्राधिकरणाअंतर्गत वसई-विरार, मीरा-भाईंदर, भिवंडी- निजामपूर, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई या महापालिका येतात. या हद्दीत मोठय़ा प्रमाणात झोपडपट्टी उभी राहिली आहे. या प्रशासनापुढेही या झोपडय़ांचे अतिक्रमण हा मोठा अडथळा ठरला आहे. त्यापैकी काही झोपडय़ा या दोन हजार सालापूर्वीच्या आहेत. त्यामुळे या ठिकाणीही झोपु योजना लागू करावी, असा आग्रह विविध राजकीय पक्षांकडून केला जात होता. आतापर्यंत काँग्रेसप्रणीत शासनाने याबाबत निर्णय घेतला नाही. आता या शासनाने तसा निर्णय घेतल्यास आगामी पालिका निवडणुकांत फायदा मिळू शकेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. उल्हासनगर, मीरा-भाईंदर आणि भिवंडी-निजामपूर महापालिकांच्या निवडणुका २०१७-१८ मध्ये होणार आहेत. त्याआधी हा निर्णय लागू करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे सूत्रांनी सांगितले. (लोकसत्ता)
======================
*आदिवासी मजुरांचे स्थलांतर थांबता थांबेना*
पालघर जिल्ह्यातील पेसा कायद्यात लागू असलेला आणि शंभर टक्के आदिवासी तालुका असणार्‍या जव्हार, मोखाडा, डहाणू व तलासरी तालुक्यात रोजगार हमीचा प्रश्न कायम आहे. राज्यातील सरकार बदलून दोन वर्षे होऊनही परिस्थिती बदललेली नाही. दिवाळी संपल्यानंतर घरची शेतीची किरकोळ कामे आटोपून गेल्या दोन दिवसांपासून येथील महिला व पुरुष मजुरीच्या शोधामध्ये स्थलांतर व्हायला सुरवात झाली असून, लोंढेचे लोंढे एसटी स्थानकात व नाक्यानाक्यावर पहायला मिळत आहेत.
जव्हार तालुक्यामध्ये १ लाख ६० हजार लोकसंख्या असून, या तालुक्यात जॉबकार्ड धारक मजुरांची संख्या ८९ हजार ३०० आहे. यापैकी सध्या फक्त ६०० मजुरांचे ई-मस्टर काढून रोजगार देण्यात आला आहे. ८८ हजार ७०० मजुरांना रोजगार हमीवर कामी नसल्याने या रोहयो मजुरांचे स्थलांतर व्हायला सुरवात झाली आहे. पुरु ष, महिला आणि तरुणवर्ग असे रोज शेकडो मजूर मिळेल ते काम करण्यासाठी मजुरीच्या शोधात निघतांना दिसत आहेत.
दिवाळीचा सण संपल्यानंतर घरच्या शेतीची अल्प कामे भात, वरई, नाचणी, ही पिके आटोपून खळ्यावर पिके जमा करून सर्वजण मजुरीच्या शोधात शहरांकडे निघाले आहेत. भात कापणी, गवत कापणी, रेती बंदर, बिल्डिंग वरील बिगारी कामे करण्यासाठी मजुरांचे स्थलांतर होतांना दिसत आहेत. भात व गवत कापणीची ही सिझनची कामे असल्याने, मजूर सावकरांशी मजुरी ठरावतांना दिसत आहेत. भात व गवत कापणीची दिवसाची मजुरी ३०० ते ३५० रु पये मिळत आहे. मजुरांचे स्थलांतर ठाणे, कल्याण, भिवंडी, सफाळा, उल्हासनगर, पालघर,केळवा आदी ठिकाणी भात, गवत व बिल्डींगवरील बिगारी कामे करण्यासाठी येथील मजुरांचे स्थलांतर होतांना दिसत आहेत.
======================
*महापालिका परिवहनच्या बसला लागली आग*
वसई : रस्त्यात बंद पडणार्‍या बसेस, कालबाह्य बसेस, सत्तर वर्षांचा म्हातारा ड्रायव्हर या आणि अशा अनेक प्रकारांमुळे वादात सापडलेल्या वसई विरार पालिकेच्या परिवहन खात्याच्या एका बसला गुरुवारी संध्याकाळी विरारमध्ये आग लागली. त्यामुळे परिवहनच्या कारभाराबाबत पुन्हा एका वाद निर्माण झाला आहे.
वसई विरार पालिकेची ठेका पद्धतीने सुरु असलेली परिवहन बस सेवा सतत वादाच्या भोवर्‍यात सापडत आहे. कालबाह्य बसेस, काचेऐवजी प्लावूडची खिडकी, धुर ओकणार्‍या बसेस, रस्त्यात बंद पडणारा बसेस, कालबाह्य बसेस आणि सत्तर वर्षांचा म्हातारा ड्रायव्हर अशा अनेक गोष्टींमुळे पालिकेची बससेवा वादात अडकून पडली आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी वाहून नेले जात असतानाही ठेकेदाराने तोटयाचे कारण पुढे करीत राज्य सरकारचा कोट्यवधी रुपयांचा कर थकवला आहे. असे असताना पालिका आणि राज्य सरकारकडून कारवाई होताना दिसत नाही. गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास विरार पश्‍चिमेकडील विराट नगर ग्राउंडच्या बाजूकडील रस्त्यावर महानगर पालिका परिवहन सेवेती (वाहन क्रमांक एमएच-०४--१२०३) अर्नाळा ते विरार बसच्या इंजिन बॉक्समध्ये अचानक आग लागली. त्यानंतर एकच घबराट पसरली. ड्रायव्हरने बस थांबवून प्रवाशांना बाहेर काढले. त्यानंतर वॉटर मिस्ट फोमचा वापर करून फायर बुलेट च्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. बस वाहतूक आता धोकादायक होऊ लागल्याने प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
_सुरक्षित बससेवेची गरज_
प्रवाशांकडून तिकीटाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा कर खिशात घालणारा ठेकेदार सुरक्षित बस सेवा देण्यातही अपयशी ठरला असल्याचे गुरुवारच्या घटनेनंतर पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. पालिका आणि राज्य सरकारकडून कारवाई होत नसल्याने नाराजी वाढली आहे. (लोकमत)
======================
*आश्रमशाळेच्या कुकची मुजोरी*
भातसानगर : शहापूर आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत येणार्‍या सावरोली आश्रमशाळेतील स्वयंपाकीने विद्यार्थी सु्टीला घरी जाण्याच्या अखेरच्या दिवशी आलेल्या पालकवर्गासमोर धिंगाणा घालीत शाळेतील मुख्यापकाला शिवागाळ करून धमकी दिल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे की नाही ? हा प्रश्न पालकवर्गाला पडला आहे . दरम्यान शहापूर पोलीस ठाण्यात अदखलपात्न गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे .
तालुक्यातील सावरोली आश्रमशाळा ही ठाणे - पालघर जिल्ह्यातील पहिली इंग्रजी माध्यमाची शाळा म्हणून ओळख आहे. या शाळेत ठाणे - पालघर जिल्ह्यातील आदिवासी , कातकरी , वारली , समाजाची ५०० मुले - मुली पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण घेतात व तेथेच राहतात. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना २५ ऑक्टोबरला दिवाळीची सुटी लागल्याने यादिवशी पालक आपल्या पाल्यांना घरी नेण्यासाठी आलेले असताना शाळेचा स्वयंपाकी संजय परदेशी याने पालकवर्ग व शिक्षकांमध्ये येऊन शाळेचे मुख्याध्यापक किशोर पाटील यांना शिवीगाळ करत हुज्जत घातली. दिवाळी सुटीच्या अगोदर हा प्रकार घडला आहे. शाळा सुरु झाल्यानंतर पालकांच्या तक्र ारी घेऊन त्या कर्माचार्‍याच्या बदलीसाठीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला जाईल - लोमेश सलामे,प्रकल्प अधिकारी, शहापूर
======================

सविस्तर वृत्त http://www.palgharlive.com/2016/11/blog-post_6.html

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home