Friday, November 4, 2016

पालघर वार्तापत्र ०४ नोव्हेंबर


पालघर वार्तापत्र ०४ नोव्हेंबर

*चिमाजी आप्पांचे स्मारक धोक्यात*
वसई : आमची वसई या सामाजिक समुहाच्या सदस्यांनी दीपोत्सवा निमित्त वसई किल्ल्यातील नरवीर चिमाजी आप्पा स्मारकास भेट दिली तेव्हा एक गंभीर बाब त्यांच्या नजरेस पडली. वसई किल्ल्यात ज्या स्लॅब वर चिमाजी आप्पांचे स्मारक थाटात उभे आहे. त्याची अवस्था फार विकट झाली आहे. हा स्लॅब कधीही कोसळू शकतो. नरवीर चिमाजी आप्पांचा पुतळाही डळमळतो आहे. संबंधित यंत्नणेने यावर त्वरीत कारवाई करत वसई चे वैभव असलेल्या या स्मारकाचा तातडीने जीर्णोद्धार करावा, अशी मागणी 'आमची वसई' च्या सदस्यांनी केली आहे.

*जुन्या उड्डाणपूलाच्या पिलर्सना तडे*
वसई पूर्व आणि पश्‍चिमेला जोडणार्‍या जुन्या रेल्वे उड्डाणपूलाच्या पिलर्सना तडे गेले आहेत. माणिकपूर पोलिसांनी पाहणी केल्यानंतर पूलाची तातडीने दुरूस्ती करावी, असे पत्र सार्वजनिक बांधकाम खाते, रेल्वे आणि महापालिकेला दिले आहेत. रेल्वेने मात्र पूल सुरक्षित असून भक्कम असल्याचा दावा केला आहे. वसई पूर्व आणि पश्‍चिमेला जोडणारा रेल्वे वरील उड्डाणपूल रेल्वेने १९७६ साली बांधला आहे. एकच पूल असल्याने वाहतूकीची प्रचंड कोंडी होत असल्याने या पूलाशेजारीच एमएमआरडीएने नवा पूल बांधला आहे. या पूलाचे काम तब्बल सात वर्षे रखडून पडले होते. शेवटी ऑगस्ट महिन्यात नव्या पूलावरून वाहतूक सुरु करण्यात आली. सध्या जुन्या आणि नव्या पूलावरुन एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून जुन्या पूलाच्या पिलर्सने तडे गेलच्या तक्रारी वाहन चालकांकडून केल्या जात आहेत.

*विरारमधील खड्डय़ांवर ‘प्रश्नचिन्ह’, महापालिकेच्या कारभारावर सवाल उपस्थित*
खड्डे बुजविण्यासाठी अनेक आंदोलने होत असतात. राजकीय पक्ष या आंदोलनात स्वत:च्या प्रसिद्धीची हौस भागवतात. वारंवार तक्रारी करूनही रस्त्यांवरील खड्डे बुजवले जात नाहीत. परंतु सध्या विरारमधील जीवदानी रोडवरील रस्त्यांवरील खड्डय़ांना कुणी तरी पिवळ्या रंगाने प्रश्नचिन्ह रंगविले आहेत. हे प्रश्नचिन्ह सध्या शहरात चर्चेचा विषय बनले आहे. वसई-विरार शहरात जागोजागी खड्डे पडलेले आहेत. गणोशोत्सव, नवरात्री आणि दिवाळी सण गेला तरी हे खड्डे कायम आहे. हे खड्डे बुजविण्यासाठी जनआंदोलन समिती, मनसे आदी पक्षांनी आंदोलने केली होती. पण सध्या विरारमध्ये खड्डय़ांना पडलेले प्रश्नचिन्ह चर्चेचा विषय बनले आहेत. विरारच्या जीवदानी रोड या प्रमुख रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. या खड्डय़ांच्या भोवती कुणी तरी पिवळ्या रंगाने प्रश्नचिन्ह रंगवलेले आहे. या रस्त्यावरीत चार ते पाच ठिकाणी हे प्रश्नचिन्ह ऑइलपेंटने रंगविण्यात आले आहे. हे प्रश्नचिन्ह कुणी रंगवले त्याचा उलगडा झालेला नाही. राजकीय पक्ष खड्डय़ांसाठी आंदोलन करताना त्याची प्रसिद्धी करवून घेतात. मात्र याची कुणी प्रसिद्धी केलेली नाही किंवा आम्ही ते रंगवले, असे सांगणारेही कुणी पुढे आलेले नाही. पालिकेने मात्र हे खड्डे बुजवले आहेत.

*भाईंदर-ठाणे- वसई जलमार्ग सुकर*
भाईंदर ते ठाणे या मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी भाईंदर पूर्व येथील नवघर गावापासून घोडबंदर व पुढे गायमुख असा जलमार्ग प्रस्तावित आहे, तसेच हा मार्ग जेसल पार्क व पुढे वसईपर्यंतदेखील जाणार आहे. यासाठी नवघर गावालगत असलेल्या खाडीत जेटी तसेच जेटीपर्यंत जाण्यासाठी रस्ता बांधणे आवश्यक आहे आणि हा भाग सीआरझेडने बाधित होत असल्याने पर्यावरण विभागाची परवानगीदेखील घेणे गरजेचे होते. मीरा-भाईंदर महापालिकेने याची परवानगी मागणारा प्रस्ताव एमसीझेडएमकडे पाठवला होता. बुधवारी एमसीझेडएम अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत याबाबतची परवानगी देण्यात आली असल्याची माहिती आयुक्त नरेश गीते यांनी दिली.

*वाघदरी घाटातील दरड तीन महिने पडून!*
जाणार्‍या रस्त्यावर वाघदरी घाटात जुलै महिन्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यावर मोठं-मोठाले पडलेले दगड उचलण्यात अथवा ते दूर करण्यास सार्वजनिक बांधकाम खात्याला अजूनही फुरसत मिळालेली नाही त्यामुळे या घाटातील प्रवास जीवघेणा ठरतो आहे. मोठी दुर्घटना घडल्यानंतरच सां.बा. ला जाग येईल काय? असा प्रश्न वाहनचालक विचारत आहेत. सार्वजनिक बांधकाममंत्री शेजारच्या ठाणे जिल्हय़ातले असून त्यांना याबाबत आदेश द्यावेसे कधी वाटणार? असाही प्रश्न चर्चिला जात आहे.

*मजूरीसाठी आदिवासींची धडक*
पालघर : पालघर जिल्ह्यातील विविध कामांवर केलेल्या कामाची २५ लाख ९१ हजार ६४३ इतकी थकलेली मजुरी तात्काळ मिळावी व नवी कामे मंजूर होऊन रोजगार मिळावा या मागण्यांसाठी जव्हार, डहाणू, विक्र मगड येथील २४१ आदिवासी कुटुंबानी आपल्या कच्याबच्या सह पालघर जिल्हाधिकारी कार्यालया समोर आज पासून धरणे आंदोलन पुकारले आहे.

*वसई-विरार शहरात अवैध गतीरोधक झाले उदंड*
रार : वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीत नियमबाह्य शेकडो गतीरोधक बसविण्यात आलेले असून ते तातडीने हटवावेत अशी मागणी जनतेकडून होत आहे. जागोजागी असलेल्या या गतीरोधकांचा त्नास दुचाकी वाहनचालकांना होत असतो. अनेकांना गंभीर अशा पाठदुखी व मणक्यांचा त्नास होतो आहे. त्यामुळे वयोवृद्ध, आजारी रूग्ण व गर्भार स्त्नीयांना प्रवास करणे जिकरीचे होऊन बसले आहे. गणेशोत्सवाच्या वेळेस खड्डेमय रस्त्यांची तात्पुरती दगड-विटा व मुरुम टाकून डागडुजी करण्यात आली.

*मनवेलपाड्यात आठवडा बाजार*
वसई : विरारमधील ब्रिटीशकालीन असलेला आठवडा बाजार पालिकेने बंद केल्यानंतर आता नवा आठवडा बाजार मनवेल पाडा येथे सुरु झाला आहे. हा बाजार दर शनिवारी संध्याकाळी चार ते नऊ या वेळेत भरतो. विरारमध्ये पालिका मुख्यालयाशेजारी ब्रिटीशकाळापासून सुरु असलेला दर शनिवारचा आठवडा बाजार पालिकेने बंद केला आहे. हा बाजार सुरु व्हावा यासाठी काही संघटनांनी पालिकेकडे आग्रह धरला आहे. मात्र, पालिका ही मागणी मान्य करीत नसल्याने संघर्ष सुरु झाला आहे. आता विरार पूर्वेकडील मनवेल पाडा येथे शनिवारचा आठवडा बाजार भरू लागला आहे.

*मनपाचा कारभार प्रभारी सहाय्यक आयुक्तांकडेच*
वसई : वसई-विरार महापालिका सात वर्षांची झाली असूनही सर्वच प्रभाग समित्यांचा कारभार सहाय्यक आयुक्तांकडेच सोपवण्यात आल्यामुळे आयुक्तांची कार्यपणाली संशयास्पद असल्याची तक्रार भाजपाच्या गटनेत्याने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
महापालिका स्थापनेच्या सुरुवातीला पाच प्रभाग होते. त्यानंतर प्रभागात वाढ होवून नऊ प्रभाग झाले. या नऊ प्रभागांचा प्रभार सहाय्यक आयुक्तांकडे सोपवण्यात आला असून, कर्मचार्‍यांच्या सेवा जेष्ठतेनुसार हे सहाय्यक आयुक्त निवडण्यात आले आहेत. त्यापैकी अनेक सहाय्यक आयुक्त अकार्यक्षम आणि बेजबाबदार आहेत. काही जणांवर तर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. तर काहींना लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडले होते. अशा लोकांच्या खांद्यावर समित्यांची जबाबदारी सोपवण्यात आल्यामुळे आयुक्त सतीश लोखंडे यांच्या कार्यप्रणालीवर संशय येत आहे, अशी तक्रार भाजपाचे गटनेते किरण भोईर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच या प्रभारी सहाय्यक आयुक्तांची ज्या पद्धतीने बदली करण्यात येते,त्यात आयुक्तांचे आर्थीक साटेलोटे असल्याचे दिसून येत आहे, असा भोईर यांचा आरोप आहे. याप्रकरणी उपायुक्त अजीज शेख आणि सदानंद सुर्वे यांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही भोईर यांनी केली आहे. या आरोप प्रत्यारोपामुळे शहरात चर्चा सुरु आहे. (प्रतिनिधी)

*पाणी न मिळाल्यास ग्रामस्थांचे उग्र आंदोलन*
बोईसर : चाळीस टक्के पाणी कपातीनंतर तीव्र टंचाईला सामोरे जात असलेल्या सालवड, पास्थळ व बोईसर ग्रामपंचायतीने आंदोलनाचे पत्र देताच एमआयडीसीच्या वरीष्ठ अधिकार्‍यांनी ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींची आज बैठक घेऊन पाणी पुरवठा जास्तीत जास्त सुरळीत करण्याचे आश्‍वासन दिले मात्र आज देण्यात आलेले आश्‍वासन न पाळल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा उपस्थित प्रतिनिधिंनी दिला आहे.

*न.पं. निवडणुकीत मुद्दा विकासाचाच!*
१७ प्रभागांमध्ये होणार्‍या निवडणुकीत अनेक पाडे आजही सोई सुविधा पासून कोसोदूरच आहेत गभालपाडा वारघडपाडा गुबाडपाडा आंबेपाना टाकपाडा तोरणशेत तेलिपाडा कायम दुर्लक्षित राहिले आहेत. नळपाणी पुरवठा योजना नाहीत दिवाबतीची सोय नाही त्याचबरोबर स्वच्छतेच्या योजना अशा अनेक योजना या पाड्यांपर्यंत पोहचलेल्या नाहीत. नगरपंचायत कार्यालय असलेल्या तळ्याचापाडा प्रभागांमध्ये आजही येथील नागरिकांना प्यायला पाणी मिळत नसल्याने महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे तर अन्य पाड्याची स्थिती काही वेगळी नाही. तर उन्हाळ्यात मात्न घोटभर पाण्यासाठी भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो केवळ नावाला शहर असलेल्या मोखाड्या लगतच्या पाड्यांची अवस्था बिकट आहे. अनेक भागात पिण्याच्या पाण्याचा अनेक दिवस पुरवठाच होत नाही कचराकुंड्या नाहीत. अद्यावत प्रसाधनगृह नाहीत गटारी ची सुविधा नाहीत मोखाडा शहरात मनोरंजनाच्या साधने नाहीत बसस्थानकाच्या आवारात असलेल्या प्रसाधनगृहाची अवस्था बिकट आहे.

*महावितरणची दरवाढ*
मुंबई : महावितरणने घरगुती व व्यावसायिक विजेच्या दरात वाढ केली आहे. १ नोव्हेंबरपासून वीजदरांत दीड टक्के वाढ झाल्याचे गुरुवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आले. वीज नियामक आयोगाकडे महावितरणने सव्वादोन टक्के दरवाढीस परवानगी मागितली होती. मात्र ती दीड टक्केच मंजूर झाली. डिसेंबरची बिले नव्या दरानुसार आकारली जातील.

*सुरुंच्या बागा केल्या बकाल*
अनिरुद्ध पाटील■ डहाणू/बोर्डी
मागील आठवडाभर दिवाळीनिमित्त डहाणू आणि बोर्डीतील समुद्रकिनारा आणि सुरूंच्या बागा पर्यटकांनी गजबजल्या होत्या. दरम्यान काही अविवेकी पर्यटकांच्या वर्तणूकीने सुरू बागा बकाल बनल्या आहेत. पर्यटकांच्या गैरवर्तणूकीला आळा घालण्यात वन विभाग अपयशी ठरल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे.  काही अविवेकी पर्यटकांनी सुरू बागांमध्ये चूल पेटवून अन्न पदार्थ शिजवले, खाद्य पदार्थांचे अवशेष, प्लॅस्टिक पिशव्या, मद्याच्या बाटल्या उघड्यावर फेकल्याने अस्वच्छता पसरली आहे. शिवाय मद्याच्या रिकाम्या बाटल्या झाडांच्या बुंद्यांवर आदळून फोडल्याने सर्वत्न काचांचे तुकडे पसरल्याने चालणेही धोकादायक बनले आहे. पर्यटन विकासाच्या नावाखाली खेळणी, बैठक व्यवस्था, अनधिकृत विद्युत रोषणाई आणि पेव्हर ब्लॉकचा जॉगिंग ट्रक उभारण्याचा घाट वन विभागाने घातला आहे. सुरुंच्या बागांना हानी पोहचू देणार नाही. प्रशासनाने दखल न घेतल्यास उपोषणाचा मार्ग अवलंबिण्यात येईल.'' -कुंदन राऊत (पर्यावरणप्रेमी, डहाणू)

*वाढलेल्या गवतामुळे अपघात*
वसई/पारोळ : वसई तालुक्यातील अनेक मार्गावरील वळणांवर उंच वाढलेल्या गवतामुळे समोरून येणारे वाहन दिसत नसल्यामुळे अनेक अपघात घडत असून यामुळे निरपराध नागरिकांचा बळी पडत आहे. अंबाडी-शिरसाड, विरार फाटा-विरार, पारोळ-भिवंडी, उसगाव-भाताने,  मेढे-सायवन, कणेर-वैतरणा यामार्गाच्या कडेला उंच गवत वाढलेले आहे.

(वृत्त संकलन : दैनिक लोकसत्ता , दैनिक लोकमत , दैनिक महाराष्ट्रटाईम्स, दैनिक सकाळ )
सविस्तर वृत्त  http://www.palgharlive.com/2016/11/blog-post_4.html

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home