Sunday, November 13, 2016

पालघर वार्तापत्र १३ नोव्हेंबर

पालघर वार्तापत्र १३ नोव्हेंबर
================

‘लोकशक्ती’चा विरार, सफाळे थांबा रद्द
पालघर : पालघर, डहाणू तील रेल्वे प्रवाशांना सोयीेसुविधा देण्याबाबत नेहमीच हात आखडते घेणाऱ्या पश्चिम रेल्वे ने लोकशक्ती एक्स्प्रेसचे सफाळे, विरार येथे असणारे थांबे रद्द केल्याने प्रवाशामधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून पालघर जिल्हा रेल्वे प्रवासी संघाने तीव्र आंदोलना चा इशारा दिला आहे.
पश्चिम रेल्वेचे सफाळे हे एक महत्वाचे स्टेशन असून बागायती, मत्स्यव्यवसाय आणि दुग्ध व्यवसायाने हा परिसर समृध्द आहे इथल्या भाजीपाल्याला आणि दुधाला मुंबईतून मोठी मागणी आहे. त्यामुळे सफाळे लगतच्या माकूणसार, कोरे, दातीवरे, एडवन, मथाने, ई. ३० ते ४० गावा मधून त्याचा मुंबईत मोठ्या प्रमाणात पुरवठा केला जातो. डहाणू पर्यंतचा भागाला उपनगरीय दर्जा प्राप्त झाल्या नंतर नागरिकीकरणाला वेग येत असून ह्या भागातून दररोज हजारो लोक रोजगार, नोकरी, शिक्षणासाठी मुंबईला जात असतात त्यांना एक्स्प्रेस, शटल, लोकल गाड्याच्या थांब्यांची उणीव भासू लागली. पूर्वी शटल, मेमू आणि वीरमगाव पॅसेंजर (दुधवाली गाडी) या ठराविक गाड्यांचा थांब्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही गाड्या नसल्याने त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते सफाळे येथील प्रवाशांनी १५ ते १८ वर्षा पूर्वी केलेल्या आंदोलना नंतर लोकशक्ती एक्स्प्रेस ला सफाळे स्टेशन ला रेल्वे प्रशासनाने थांबा दिला. त्यामुळे माझगाव डॉक, अन्य कार्यालयीन अधिकारी-कर्मचारी, भाजीपाला, दूध, मासे व्यावसायिक ई. सुमारे तीनशे ते चारशे सफाळेकरांचा प्रवास काही अंशी सुखकर झाला होता. असे असतांना आता पश्चिम रेल्वेचे मंडल रेल्वे प्रबंधक मुकुल जैन यांनी ग्रँट रोड पासून ते थेट पालघर, वलसाड, सुरत ई. स्टेशन वरील अधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात लोकशक्ती एक्स्प्रेस ला विरार, सफाळे स्टेशन वरील थांबे रद्द करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. या निर्णयाच्या कार्यवाही ला कधीपासून सुरु वात होणार आहे या बाबत कुठलाही उल्लेख नसला तरी कधीही याची अंमलबजावणी होण्याची शक्यता असल्याने प्रवाश्यामधून संताप व्यक्त होत आहे. चर्चगेट, दादर येथून संध्याकाळनंतर पालघर, डहाणूसाठी थेट लोकल सेवेत वाढ करण्याऐवजी रेल्वे प्रशासनाने सौराष्ट्र मेलला सुपर फास्टचा दर्जा देऊन तीची वेळ एक तास उशिराची केली. त्याची भरपाई म्हणून ८.३७ ला चर्चगेट ते डहाणू लोकल सुरु केली. मात्र यात विरार आणि पालघर - डहाणू प्रवाशांमध्ये नेहमीची बाचाबाची सुरु झाली. (प्रतिनिधी,लोकमत)

अंधेरी - डहाणू लोकलसाठी नवी मागणी
पश्चिम रेल्वे कडून पालघर, डहाणू भागातील प्रवाशांना नेहमीच सापत्न वागणूक देण्यात येत असून लोकशक्ती चा थांबा रद्द करावयाचा निर्णय अमलात आणायचाच असेल तर त्या वेळेत नवीन अंधेरी ते डहाणू लोकल सुरु करून तीला बोरिवली ते वैतरणा दरम्यान थांबा देऊ नये अशी मागणी पालघर जिल्हा रेल्वे प्रवाशी संघाचे सेक्रेटरी नंदू पावगी यांनी केली आहे.

डहाणूपर्यंत उपनगरीय दर्जा प्राप्त झाल्यानंतर नागरिकीकरणाला वेग येत असून ह्या भागातून दररोज हजारो लोक रोजगार, नोकरी, शिक्षणासाठी मुंबईला जात असतात त्यांना एक्स्प्रेस, शटल, लोकल गाड्याच्या थांब्यांची उणीव भासू लागली. पूर्वी शटल, मेमू आणि वीरमगाव पॅसेंजर यांद्वारे मुंबईत मोठ्या प्रमाणात पुरवठा व्हायचा. मात्र, सध्या सोयीस्कर पडत असलेल्या लोकशक्ती एक्सप्रेसचा थांबा रद्द करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

================
मच्छिमारच जाळ्यात
दामोदर तांडेल,महाराष्ट्र टाइम्स
समुद्राचा तळ उपसून काढणाऱ्या पर्ससीन मासेमारीमुळे मत्स्यसाठ्याचे कमालीचे नुकसान होत आहे. तर पारंपरिक मच्छिमारांना मासळीच मिळत नसल्याने ग्राहकांनाही कमालीच्या चढ्या दराने मासे खरेदी करावी लागत आहे. हे असेच चालू राहिले, तर मच्छिमार देशोधडीला लागेल. या सर्वाला कारणीभूत आहे ती पर्ससीन जाळ्याने होणारी बड्या भांडवलदारांच्या ट्रॉलर्सची मासेमारी.  या पर्ससीने जाळ्याचे दुष्परिणाम लक्षात घेण्यासाठी त्या जाळ्याचे कामकाज समजून घ्यावे लागेल. पर्ससीन जाळी पर्सच्या आकारासारखी गोलाकार आणि ३ किमी लांब असते. ही जाळी तीन किमी अंतरात ती गोलाकार समुद्रात सोडली जाते. नंतर खालून बंद होते. ४० ते ५० लाख रुपये किंमतीची ही जाळी मोठ्या भांडवलदार ट्रॉलर्सकडे असते. हे ट्रॉलर्स माशांना बेशुद्ध करण्यासाठी समुद्रात रसायने सोडतात. त्यामुळे घोळ, रावस, दांडा, सुरमई, बांगडा, शिंगाडा, शार्कमुशी असे ताकदवान मासेही अर्धमेले होतात. पर्ससीन जाळ्याने मासेमारी करणारे फक्त निर्यातीची मासळी उचलतात. ती मासळी एका वेळी ५ ते १० टनांपेक्षा जास्त असते. जाळ्यात सापडलेले बाकीचे बोंबिल, मांदेळी, शिंगाडे, छोटे बांगडे इत्यादी कमी किंमतीचे मासे ५ ते १० टन मासे समुद्रात फेकून देतात. त्यामुळे तीन किलोमीटरच्या मोठ्या अंतरातील माशांचे साठे एकाच वेळी संपुष्टात येतात. पर्ससीन जाळ्यामुळे माशांची पिल्ले प्रजोत्पादनायोग्य होण्याआधीच पकडली जातात. त्यामुळे समुद्रतळावरील जीवसृष्टीची हानी होते. पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होऊन मत्स्योत्पादन बाधित होते. अशा एक हजारापेक्षा जास्त भांडवलदारांच्या पर्ससीन जाळ्यांनी सध्या धुमाकूळ घातला आहे
 पर्ससीन जाळ्याने मासेमारीसाठी १९८७ साली फक्त रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरात राज्य सरकारने प्रथम परवानगी दिली. त्यावेळी पर्ससीन जाळी असलेले हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच ट्रॉलर्स होते. १९९९ साली ससून डॉक, भाऊचा धक्का, सातपाटी व देवगड या चार बंदरात परवानगी दिली. २०१२पर्यंत महाराष्ट्रात एकूण ४९५ पर्ससीन ट्रॉलर्सना परवाने देण्यात आले होते. या नौकांचा धुमाकूळ पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात चालू झाला. परिणामी, पारंपरिक मच्छिमारांच्या १२ हजार यांत्रिक व ११ हजार बिगर यांत्रिक अशा एकूण २३ हजार मच्छिमार नौकांचा व्यवसाय नष्ट झाला आहे. गेली १६ वर्षे भांडवदारांच्या पर्ससीन ट्रॉलर्सवाल्यांनी आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयामधील अधिकाऱ्यांना प्रत्येक ट्रीपमागे २५ हजारांचा हप्ता बिन भोमाट चालू आहे. ससून डॉकमध्ये फक्त १६९ ट्रॉलर्सना पर्ससीन मासेमारीचा परवाना असताना, ६०० पेक्षा जास्त ट्रॉलर्स बेकायदा पर्ससीन जाळ्यांनी मासेमारी करीत आहेत. या परवान्याच्या कलर झेरॉक्स प्रती काढून एकाच नंबरच्या आधारे तीन-चार ट्रॉलर्स सर्रास मासेमारी करतात. परंतु त्यावर कोणतीच कारवाई होत नाही. मत्स्यव्यवसाय आयुक्तालयातील अधिकारी पंधरा-पंधरा वर्षे एकाच जागेवर असून शेकडो कोटींचे हप्ते गोळा करून मंत्री, सचिव, वरिष्ठ अधिका-यांना दर महिन्याला पोहोचते होतात. याप्रश्नी गेल्या पंधरा वर्षात मच्छिमार संघटनांनी सातत्याने संघर्ष केला. सिंधुदुर्गात आचरा येथे पारंपरिक मच्छिमार व पर्ससीन नेटवाल्यांमध्ये गेल्या दोन वर्षांपूर्वी मोठा संघर्ष झाला. त्याचे पडसाद विधानसभा, विधान परिषदेत उमटले. उत्तन, वसईच्या मच्छिमारांनी पर्ससीन ट्रॉलर्सवर समुद्रात हल्ले केले. अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने २००९, २०१० व २०११ रोजी लागोपाठ गिरगाव चौपाटीवरून राज्यव्यापी मोर्चे काढले. तेव्हा राज्य सरकार जागे झाले. २०११ साली तत्कालीन मत्स्यव्यवसाय मंत्री मधुकर चव्हाण यांनी डॉ. के. व्ही. एस. सोमवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पर्ससीन मासेमारी व तिचा परिणाम यांचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमली होती. या समितीने सखोल अभ्यासानंतर २०१२मध्ये आपला अहवाल राज्य सरकारला सादर केल्या. त्यात पारंपरिक मच्छिमारांचे हित जपण्यासाठी व मत्स्यसाठ्यांचे जतन करण्यासाठी उपाय सुचिवले आहेत. मात्र पर्ससीन ट्रॉलर्सवाल्यांकडून मिळणारा मलिदा लक्षात घेता, तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने पर्ससीन जाळ्यावर बंदी घालणारी अधिसूचना काढली नाही. अखेर युती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत ५ फेब्रुवारी २०१६ रोजी अधिसूचना काढून पर्ससीन जाळ्यांवर बंदी घातली.

पर्ससीन ट्रॉलर्सची संख्या ४९५ ऐवजी फक्त १८२पर्यंत ठेवण्यात आली. डहाणू ते मुरुड-जंजिरापर्यंत कायमस्वरूपी पर्ससीन नेट मासेमारीला बंदी घालण्यात आली, तर मुरुड जंजिरा ते बुरंडी, बुरंडी ते जयगड व जयगड ते बांदा पट्ट्यात सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांसाठी पर्ससीन मासेमारीला परवानगी दिली. हायड्रॉलिक विंचच्या साह्याने पर्ससीन जाळे ओढण्यास तसेच रसायनांचा वापर करून माशांना भुल देऊन पकडण्यास बंदी घातली. मात्र बंदी घातल्यानंतरही १ ऑगस्ट २०१६ ते ११ नोव्हेंबर २०१६ पर्यंत डहाणू ते मुरुड या पूर्ण बंदी असलेल्या पट्ट्यात ससून डॉक व भाऊचा धक्का येथे ७०० ट्रॉलर्सद्वारे पर्ससीन मासेमारी खुलेआम चालू आहे. एका पर्ससीन ट्रॉलर्सच्या एका ट्रिपमागे २५ हजारांचा हप्ता चालू आहे, असा आमचा आरोप आहे. तत्कालीन कृषी मंत्री शरद पवार यांनी नवी दिल्लीत बैठक घेऊन पर्ससीन जाळ्याने मासेमारीला बंदी घालण्याचे निर्देश प्रत्येक राज्याच्या मत्स्यव्यवसाय सचिवांना दिले होते. महाराष्ट्रात केंद्र व राज्याच्या हद्दीत मासेमारीस बंदीचे निर्देश ६ सप्टेंबर २०१२ रोजी दिले आहेत. ३ ऑगस्ट २०१२ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ससून डॉक येथे ६००पेक्षा जास्त पर्ससीन ट्रॉलर्सवर कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय आयुक्त, गृहविभाग, व कृषी विभागाला दिले होते. मात्र गेल्या चार वर्षांत एकाही बेकायदा पर्ससीन ट्रॉलरवर फौजदारी गुन्हे दाखल झालेले नाहीत. कारवाई करून बेकायदा पर्ससीन ट्रॉलर्स पकडले, तरी ते ट्रॉलर्स किरकोळ दंड भरून पुन्हा मासेमारीला जातात, यातच काळेबेरे आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छिमारांमध्ये असंतोष आहे. बेकायदा पर्ससीन जाळ्याची मासेमारी बंद झाली नाही, तर समुद्रात संघर्ष अटळ आहे.

दोन वर्षांत संपतील मत्स्यसाठे 
मासळीच्या १२८ जातींपैकी ७० जातींचीच मासळी शिल्लक आहे. गेल्या पाच वर्षांत पापलेटचे उत्पादन ६ हजार टनांवरून २०० टनांपर्यंत घसरले आहेत. बोंबील फक्त २०%, रावस १०%, घोळ १५%, तांब २%, दाढा १५%, कोळंबी ३०%, बांगडा ३५%, शिंगाडा ४०%, मुशी ३०% शिल्लक आहेत. महाराष्ट्रातल्या समुद्रात माशांचे फक्त १५ ते २० टक्के साठे शिल्लक आहेत. दोन वर्षात हे साठे १०-१५ टक्क्यांवर येण्याची भीती केंद्रीय मासळी संशोधन संस्थेचे मुंबई केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. विनय देशमुख व राष्ट्रीय मत्स्यकी शिक्षण संस्थेचे प्रधान शास्त्रज्ञ डॉ. एस. एस. ओझा व डॉ. चक्रवर्ती यांनी व्यक्त केली आहे. पर्ससीन जाळ्यावर बंदी आणली नाही, तर पुढच्या दोन वर्षांनंतर संपूर्ण मासेमारी व्यवसाय संपुष्टात येणार आहे, अशा इशारा त्यांनी दिला आहे. (लेखक मच्छिमार नेते आहेत.)
==============
Vasai Christians get a burial ground, finally
By Vishal Rajemahadik, Mumbai Mirror
After a 6-year-long wait, community gets same two-acre plot earmarked in 2011.
Almost six years after a burial ground was earmarked for the community, Vasai’s Christian community has been allotted one. While the official handover is pending, the community is elated as soon, they will not have to run between individual churches there seeking special permissions to bury their dead kin in their premises.
The community, which lacked a common burial ground, has been allotted a two acre plot in Gokhivare, Vasai (East), by the Vasai Virar Municipal Corporation (VVMC).
Vasai’s churchgoers were of the opinion that the news could not come at a better time as the lack of a burial ground was turning out to be a cause of worry to the growing Christian community in the area. “The situation had got so bad that people had even started talking of cremation and worse still, donating the dead for medical studies,” said a community member.
The two-acre plot will be managed by the Diocese of Vasai while their day-to-day functioning will be handled by two church trusts in Vasai East –Infant Jesus Church and St Thomas Church.

==============
आता तक्रार नोंदवा थेट जिल्हाधिकार्‍यांकडे
पालघर : ५00 आणि १000 रु पयांच्या जुन्या नोटा बंद करण्याच्या निर्णयाच्या पार्श्‍वभूमिवर जिल्ह्यातील बँका ,पेट्रोल पंप, केमिस्ट, खाजगी व शासकीय रूग्णालयांना नागरिकांना सहकार्य करण्याच्या सूचना असून त्यांचे उल्लंघन कुणी केल्यास त्याची तक्रार नोंदविण्यासाठी जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक कार्यालयात नियंत्नण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.
या तक्र ारी नोंदवितांना संबंधित संस्था अथवा व्यक्ती यांची माहिती द्यावी. यामध्ये तालुका, गावाची माहिती असावी. तसेच तक्र ारदारांनी आपले संपर्क क्र मांक द्यावेत. नियंत्नण कक्ष क्रमांक 0२५२५ २९७४७४, पोलिस नियंत्नण कक्ष क्रमांक 0२५२५२९७00४, ९७३0८११११९. असे आहेत. ५00 व १000 च्या जुन्या नोटा बँका व पोस्टामध्ये स्वीकारल्या जाणार आहेत त्यामुळे नागरिकांनी घाई गडबडीत कोणत्याही अमिषाला बळी पडू नये आणि कोणी अडवणूक किंवा फसवणूक करत असेल त्याची तक्र ार उपरोक्त नियंत्नण कक्षामध्ये नोंदवावी, त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी केले आहे. (प्रतिनिधी,लोकमत)
==============

वसई :  संचालक परेरांना हजर राहण्याचे आदेश
नोटीस देऊनही सुनावणीस हजर न राहणार्‍या बॅसीन कॅथालिक बँकेचे संचालक सचिन परेरा यांना पुढच्या तारखेला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यावेळी ते अनुपस्थित राहिल्यास त्यांचे काहीच म्हणणे नसल्याचे समजून एकतर्फी निर्णय जाहीर केला जाईल, असा इशारा पुणे येथील सहकार खात्याच्या अप्पर आयुक्तांनी दिला आहे. तीन अपत्य असल्याने आपले संचालक पद रद्द का करू नये? अशी नोटीस बजावून सहकार खात्याने यांना पुणे येथे सुनावणीसाठी १0 नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, परेरा या तारखेला हजर राहिले नाहीत. कामानिमित्ताने बाहेरगावी असल्याने ते येऊ शकत नसल्याचे कारण बँकेकडून उपस्थित कर्मचारी रोशन परेरा यांनी दिले. यावर तक्रारदार कायस फर्नांडिस यांनी आक्षेप नोंदवत रोशन परेरा हे बँकेचे पगारी कर्मचारी असून संचालकांचे पत्र हे कसे देऊ शकतात असा सवाल उपस्थित केला. आयुक्तांच्या आदेशाला संचालक परेरा जुमानत नसल्याचे फर्नांडीस यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. यावर अप्पर आयुक्तांनी पुढच्या सुनावणीला जर संचालक परेरा येत नसतील तर त्यांना हजर करा. येत नसतील तर माझा निर्णय तयार आहे असा आदेश दिला. सहकारी संस्था अधिनियम कलम ७३ उ नुसार तीन अपत्य असल्या कारणाने वसईतील कॅथॉलिक बँकेचे स्वीकृत संचालक रॉड्रिग्ज यांना पात्र घोषित करताच त्यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर त्याच कारणासाठी परेरा यांना करणे दाखवा बजावली गेली होती. (प्रतिनिधी,लोकमत)
==============

14 नोव्हेंबरला सुपर मून
ठाणे : प्रतिनिधी , पुढारी
पृथ्वीवरील दीपोत्सव नुकताच संपला. आता खगोलप्रेमींना आकाशातील दीपोत्सवाचे दर्शन घडणार आहे. नोव्हेंबर महिन्यात आकाशात सूपर मून दर्शन, चंद्र - रोहिणी पिधान युतीने दर्शन आणि उल्का वर्षावाचे मनोहारी दर्शन घडणार आहे. आकाशात घडणार्‍या या तिन्ही घटना केवळ म्हणजे आकाशातील  दीपोत्सवच आहे. अशी माहिती प्रसिद्ध खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी दिली.
सुपर मूनचे दर्शन
येत्या सोमवारी 14 नोव्हेंबर रोजी आकाशात  सुपर मूनचे  दर्शन घडणार आहे. सुपर मून म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येत असेल तर त्याला  सुपर मून असे म्हणतात. ‘सुपर मून’ योगात चंद्र बिंब खूप मोठे दिसते. अशावेळी चंद्रबिंब चौदा टक्के मोठे दिसते आणि चंद्र तीस टक्के जास्त तेजस्वीपणे दिसतो. या दिवशी सायंकाळी 7 वाजून 22 मिनिटांनी आकाशात पूर्वेला सुपरमूनचे सुंदर दर्शन घडणार असल्याचे ते म्हणाले.
 चंद्र  पृथ्वीपासून सरासरी 3 लक्ष 84 हजार किलोमीटर अंतरावर आहे. पौर्णिमेच्या दिवशी सोमवारी चंद्र पृथ्वीपासून 3 लक्ष 56 हजार 509 किलोमीटर  अंतरावर येणार आहे. 68 वर्षांपूर्वी म्हणजे 26 जानेवारी 1948 रोजी पौर्णिमेच्या दिवशी तो असाच पृथ्वीच्या जवळ आला होता. आता यानंतर 18 वर्षांनी 25 नोव्हेंबर 2034 रोजी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीपासून 3 लक्ष 56 हजार 445 किलोमीटर इतका  इतका जवळ येणार आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी सहा वाजून चार मिनिटानी चंद्र उगवेल. संपूर्ण रात्रभर आकाशात दर्शन देऊन सकाळी 7 वाजून 22 मिनिटांनी तो मावळतीला जाईल अशी माहिती त्यांनी दिली.
चंद्र - रोहिणीचा लपंडाव
या सुपर मूनच्या दर्शनानंतर लगेच दुसर्‍या दिवशी 15 नोव्हेंबर रोजी रात्री आकाशात चंद्र - रोहिणीचा लपंडाव पहावयास मिळणार आहे. या दुसर्‍या खगोल घटनेविषयी माहिती देताना ते म्हणाले, या दिवशी सायंकाळी सात वाजता पूर्वेला चंद्र उगवेल. बरोबर रोहिणी तारकाही उगवेल. रोहिणी तारका चंद्रप्रकाशामुळे नीट दिसत नाही. त्यामुळे ती बारकाईने पहावी लागणार आहे. कारण चंद्रप्रकाशामुळे नंतर ती नीट दिसू शकणार नाही. रात्री 8 वाजून 49 मिनिटांनी चंद्र रोहिणी तारकेला आच्छादून टाकील. रात्री 9 वाजून 44 मिनिटांनी रोहिणी तारका चंद्रबिंबाआडून बाहेर पडेल. याला  पिधान युती असे म्हणतात. दुर्बिणीच्या साह्याने या युतीचे दर्शन जास्त चांगल्या प्रकारे  घडेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
================

तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक
महाराष्ट्र टाइम्स. खास प्रतिनिधी, मुंबई मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर १३ नोव्हेंबरला सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर मुलुंड-माटुंगामध्ये अप स्लो, हार्बरवर सीएसटी ते चुनाभट्टी आणि माहीम स्थानकापर्यंत अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर ब्लॉक आहे. मेन लाइनवर मुलुंड ते माटुंगापर्यंत अप स्लो मार्गावर स. ११.२० ते दु. ४.२० पर्यंत दुरुस्तीसाठी ब्लॉक आहे. या दरम्यान मुलुंड ते माटुंगापर्यंत अप स्लो मार्गावरील वाहतूक स. १०.५८ ते दु. ४.०३ वाजेपर्यंत अप फास्ट मार्गावरून चालेल. अप स्लोवरील लोकल नाहूर, कांजूरमार्ग, विद्याविहार स्थानकांवर थांबणार नाहीत. सीएसटीहून डाऊन फास्ट मार्गावर सुटणाऱ्या लोकल स. १०.०८ ते दु. २.४२ पर्यंत, तर अप फास्ट लोकलना स. ११.२२ ते दु. ३.२८ पर्यंत घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड येथे थांबा आहे. हार्बरवर सीएसटी ते चुनाभट्टी आणि माहीमपर्यंत अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर स. ११.१० ते दु. ४.४० पर्यंत मेगाब्लॉक आहे. स. ९.५२ ते दु. ४.४३ वाजेपर्यंत सीएसटी ते चुनाभट्टी आणि सीएसटी ते वांद्रे-अंधेरीदरम्यानची अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. दरम्यान, पश्चिम रेल्वेवर रविवारी स. १०.३५ ते दु. ३.३५ कालावधीत अप-डाउन फास्ट मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल मार्गावर मेगाब्लॉक चालणार आहे. या काळात अप आणि डाऊन फास्ट लोकल स्लो मार्गावर चालतील.

 सविस्तर वृत्तhttp://www.aamchivasai.org/2016/11/blog-post_13.html

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home