Saturday, October 8, 2016

पालघर न्यूज ८ ओक्टोबर


आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंगमध्ये वसईच्या सायलीला सुवर्णपदक.
रशिया येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील डायमंड किक बॉक्सिंग स्पर्धा नुकतीच झाली. वसईतील न्यू इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेजची विद्यर्थिनी सायली चंद्रकांत कान्हात हिला या स्पर्धेत किक लाईट या प्रकारात एक सुवर्ण, लाईट कॉन्टयक्ट  या प्रकारात एक रौप्य आणि खुला गट लाईट कॉन्टयक्ट या प्रकारात रौप्यपदक अशी  तीन पदके मिळाली.

विक्रमगड: मृत व्यक्तींच्या नावे लाखोंचा निधी फस्त, रोजगार हमीच्या नावाने ठेकेदार अन् भ्रष्ट अधिकार्‍यांची काळी कमाई, कृती समितीच्या मागणीकडे दुर्लक्ष
राहुल वाडेकर■ विक्रमगड
तालुक्यातील खुडेद येथे शंभर आदिवासी समाजाची कुटुंब असलेली वस्ती असून येथे रोजगार हमी योजनेतून अनेक रस्त्यांची कामे झाल्याचे चित्र कागदावर पाहायला मिळत आहे. मात्न, प्रत्यक्षामध्ये ही कामे झालीच नसल्याचे दिसून येत आहे. सही करणार्‍या व्यक्तीचे अंगठे टेकवून व अनेक मृत व्यक्तींच्या नावे तसेच अविवाहित तरु णांच्या पत्नीच्या नावे पैसे काढण्यात आल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. भ्रष्ट अधिकार्‍यांकडून हा सर्व पैसा वसूल करावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी व आदिवासी विद्यार्थी कृती समितीचे शाखाप्रमुख लहू नडग यांनी केली आहे. दरम्यान, पूर्ण पालघर जिल्ह्यात रोजगार हमी योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप युवा स्पर्श सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सचिन विलास भोईर यांनी केला आहे.
या ग्रामपंचायतीमध्ये येऊन मला एक वर्षच झालेय. मी चार्ज घेण्याच्या आधी झालेल्या कामांच्या गैरप्रकारांच्या चौकशीसाठी मी पूर्ण सहकार्य करेन. -संदीप घेगड, ग्रामसेवक,खुदेच ग्रामपंचायत खुदेड ग्रामपंचायतीमध्ये रोजगार हमीच्या कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी जिल्हाधिकारी कार्यालय करत आहे. याबाबत जिल्हा अधिकारी कार्यालयात बैठक बोलावली जाईल. - प्रदीप डोलारे, गटविकास अधिकारी, विक्रमगड

वसईत बेकायदा रेती वाहतूक करणारे ११ ट्रक जप्त.
वसई, दि. 07 - रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या ११ ट्रकवर पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. यावेळी ४ लाख २५ हजार रुपयांची चोरटी रेती आणि १ कोटी ११ लाखाचे ट्रक जप्त करून सर्व चालकांना अटक करण्यात आली. वसईतून मोठ्या प्रमाणावर रेतीची चोरटी वाहतूक सुरु असल्याची खबर मिळाल्याने पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या पथकाने मुंबई अहमदाबाद हायवेवर विरार फाटा येथे आज संध्याकाळी साफळा रचला होता. यावेळी पथकाने रेतीची चोरटी वाहतूक करणारे ११ ट्रक पकडले. तपासात ट्रकमध्ये चोरीची रेती असल्याचे उजेडात आले. पोलिसांनी महसूल अधिकाऱ्यांना आणि विरार पोलिसांना बोलावून ट्रक त्यांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी ट्रक चालकांना अटक केली. तसेच ट्रक मालकांवरही गुन्हे दाखल केले. ४ लाख २५ हजाराची रेती आणि १ कोटी ११ लाख किमतीचे ११ ट्रक जप्त करण्यात आले.

'सेल्फी विथ ट्री'साठी पारसची निवड, राज्यभरातून २३ स्पर्धक : राज्याच्या मुख्य वनसंरक्षकांनी केली छाननी
विक्रमगड : राज्य सरकार व वन विभागाच्या पुढाकाराने १ जुलै रोजी २ कोटी वृक्षलागवडीचा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी वन विभागाने वृक्ष लावतानाचे छायाचित्न वेबसाइटवर अपलोड करण्याचे आवाहन केल्यानंतर राज्यभरातून हजारोंच्या संख्येने छायाचित्ने वन विभागाला प्राप्त झाली. राज्याचे मुख्य वनसंरक्षक यांनी राज्यभरातून २३ व्यक्तींची निवड करण्यात आली. त्यात पालघर जिल्ह्यातून जव्हार येथील युवक पारस संजय सहाणे यांची निवड करण्यात आली आहे.

केळवे येथे प्राणिमित्रांनी नागास दिले जीवदान
पालघर/नंडोर : केळवेजवळील दरीपाड्यामध्ये शैलेश म्हात्ने यांच्या घरी मासेमारीसाठी ठेवलेल्या जाळ्यात अचानक नाग घुसला होता. प्रसंगावधान राखून प्राणिमित्न भावेश पाटील यास पाचारण केल्यानंतर त्यांचे सहकारी आशू व योगेश यांनी जाळे कापून त्यात अडकलेल्या नागाला जंगलात सोडून दिले.
प्लास्टिकमुक्ती व्याख्यान संपन्न
डहाणू/बार्डी : मराठी विज्ञान परिषद, बोर्डी विभागातर्फे बोर्डी व घोलवड ग्रामपंचायतीमध्ये वाणगाव एज्युकेशन ट्रस्टच्या सहकार्याने प्लास्टिक वापरावरील निर्बंधासंबंधी जनजागृती कार्यक्र माचे आयोजन केले होते. या वेळी प्लास्टिक आणि पर्यावरण विषयावर, मिलिंद पगारे यांनी व्याख्यान दिले.
कुपोषित भागात अन्नधान्यवाटप
वसई : लायन्स क्लबच्या माणिकपूर विभागातर्फेजव्हारमधील कोगदा येथील कुपोषित बालके आणि गरजूंना अन्नधान्य वाटण्यात आले. मुलांचे संगोपन आणि आहार यासंबंधी गावकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात आले. क्लबचे अध्यक्ष मनीषा कणेकर, चेअरमन इव्हेंट कुटीन्हो, सदस्य श्रद्धा मोरे, हबीब पटेल, साजीद खान उपस्थित होते.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home