Tuesday, October 11, 2016

पालघर न्यूज ११ ऑक्टोबर

 वसईत बेकायदा वाहतूक, विरार, नालासोपारा शहरात मॅजिक रिक्षा, खाजगी बसमधून वाहतूक, एसटी स्टँडला भूर्दंड बसतोय - शशी करपे■ वसई,,लोकमत)
नालासोपारा पूर्वेली तुळींज पोलीस स्टेशनलगत संध्याकाळी सहा नंतर सफेद रंगाच्या सहा आसनी मॅजिक रिक्शा प्रवाशी वाहतूक करीत आहेत. शंभरहून अधिक मॅजिक रिक्शा पोलिसांदेखत कायदेशिरपणो वाहतूक करीत असून क्षमतेपेक्षा जादा प्रवाशी वाहून नेत असल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येते.
विरार रेल्वे स्टेशनपासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍याचे कार्यालय आहे. त्यांच्या देखत पालिका हद्दीत परवानगी नसलेल सहा आसनी सफेद रिक्शा प्रवाशी वाहतूक करीत असताना कोणतीच कारवाई केली जात नसल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येते.
दरम्यान, वसई विरार परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखा तयार करण्यात आली आहे. मात्र, वाहतूक पोलीस सकाळी आठ ते अकरा आणि संध्याकाळी पाच ते सात दरम्यान काही ठिकाणी पहावयास मिळतात.
शहरात अनेक ठिकाणी बेकायदेशिर रिक्शा स्टँड आहेत. त्याठिकाणी र्मयादेपेक्षा जादा रिक्शा असल्याने वाहतूक कोंडी होत असले लोक त्रासलेले आहेत. त्यातच रिक्शा चालक किमान पाच प्रवाशी वाहून नेत असताना दिसतात. हा प्रकार रोखण्यासाठी तैनात असलेले पोलीस नाक्यावर कधीच दिसत नाहीत.
रिक्शा स्टँडवरून गायब असलेले पोलीस आता नव रस्त्यांवर दुचाकी आणि खाजगी वाहतुकदारांची कागदपत्रे तपासण्यात गुंग असल्याचे पहावास मिळते. ज्या रस्त्यांवर दुचाकी आणि मालवाहतूक होते त रस्त्यांवर वाहतूक पोलिसांची गर्दी दिसून येते. त्यांच दिमतीला बिट मार्शलही दिसू लागले आहेत. बिट मार्शलना सतत मोटार सायकलवरून फिरत राहून गस्त घालण्याचे काम आहे. मात्र, आता बिट मार्शलही दुचाकी वाहनांची तपासणी करू लागले आहेत. पोलिसांकडून दुचाकी वाहनधारकांना दिला जाणारा छळ चर्चेला विष बनला आहे. विरार एसटी स्टँडला लागून आता वसई विरार महानगरपालिका परिवहन बस स्टँड बनवण्यात आला आहे. हा स्टँड रस्त्यालगत बनवण्यात आला असून फूटपाथवर गॅरेजही थाटण्यात आले आहे. स्टँड पासूनजवळच सहा चाकी र्निशा स्टँड आहे. शहरात सहा चाकी रिक्शा वाहतूकीला कायद्याने बंदी आहे. असे असताना विरार एसटी स्टँडला लागून सहा आसनी रिक्शा स्टँड आहे. विशेष म्हणजे सहा आसनी रिक्शा दहा प्रवाशी वाहून नेले जात असताना वाहतूक पोलीस दुर्लक्ष करताना दिसतात. पूर्वेला तर आता सहा चाकी सफेद रंगाच्या रिक्शा, ज्यांना प्रवाशी वाहतूक करण्याची परवानगी नाहीत खुले आम प्रवाशी वाहतूक करू लागल आहेत.

टीम आमची वसई राजोडी समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम!.
समतल व विस्तृत किनारा, मऊ वाळु, शांत समुद्र व किनार्‍याला लागुनच खाण्यापिण्याची सोय असल्यामुळे राजोडी किनारा पर्यटकप्रिय आहे. त्याचबरोबर अनैतिक व्यवसायाचे प्रमाण वाढत चालल्याने बदनाम देखील होत चालला आहे. सकाळी ७ वाजायच्या आधीपासूनच आसरा शोधण्यासाठी जोडपी रीसॉट आणि लॉजची चौकशी करत फिरत असतात. काही ग्रूपने येतात. खाण्यापिण्याचे पदार्थ, प्लॅस्टीकचे पेले, काचेच्या बाटल्या किनार्‍यावरच टाकुन देतात.
वसईतील सातही किनार्‍यांचे अनेक प्रकारे विद्रूपीकरण होत आहे. अनिधकृत बांधकाम, अनैतिक व्यवसाय, वाळुचा उपसा, किनारपट्टीची खारफुटी झाडी आणि सुरु ची बागेची तोड, अंत्यविधीनंतर शिल्लक असलेल्या मानवी अवशेषांची चटक लागलेल्या कुत्र्यांच्या टोळ्या, धुपप्रतिबंधक बंधारा नसल्याने समुद्राचे जमीनीवर आक्र मण वाढत चालले आहे. रानगाव समुद्र किनार्‍याच्या वाळुत कच्च्या तेलाचे प्रमाण जास्त आहे.
अर्नाळा समुद्र किनार्‍यावर मांसाची चटक लागलेल्या कुत्र्यांची संख्या प्रचंड आहे. भुईगावला प्लॅस्टिक कचरा सर्वात जास्त आहे. आणि राजोडी किनार्‍यावर निरोधांचे प्रमाण जास्त आहे. किनार्‍याला लागुन असलेल्या अवैध रीसॉर्ट लॉजची ही कृपा असल्याचे सांगण्यात आले. पोलिस यंत्नणा, महसूल विभाग व लोकप्रतिनिधी झोपा काढतात त्यामूळे वसईत कायदा- सुव्यवस्था आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. स्वच्छ वसई, सुंदर वसई, आमची वसई हे ब्रीदवाक्य असणार्‍या टीम आमची वसईने वसईतील सातही समुद्र किनारे स्वच्छ करण्याचा विडा उचलला आहे.
राजोडी किनार्‍यावर रविवारी जवळपास ३ तास स्वच्छता करुन ४0 गोणी कचरा वर्गीकरण करुन जमा केला. शेजारच्या गावातील गावकर्‍यांनी मोहिमेत सहभाग दर्शवला. उपस्थित पर्यटक, नागरीकांना स्वच्छता, संवर्धन आणि जनजागृतीचे महत्व सांगण्यात आले. देशभक्तीपर जयघोषाने राजोडी समुद्र किनारा स्वच्छता मोहीमेची सांगता करण्यात आली. (वार्ताहर,लोकमत)

 अपुर्‍या मनुष्यबळामुळे पोलिसांची दमछाक, गुन्हे वाढले : शंभर पोलिसांची कमतरता -शौकत शेख■ डहाणू,,लोकमत)
महाराष्ट्र गुजरात तसेच दिव-दमणच्या सीमेवर सूरक्षेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असलेल्या डहाणू पोलीस ठाण्यात एक दोन नव्हे तर तब्बल शंभर पोलीसांची कमतरता असल्याने डहाणू शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून दिवसा ढवळया घरफोडी, तसेच दुकानदारांना भर रस्त्यात लुटण्यांच घटना वाढत आहेत. शिवाय अपूर्‍या मनुष्यबळामुळे रोजच्या रोज होणारे मोर्चे, आंदोलने, पेट्रोलिंग, नाकाबंदी तसेच राकीय घडमोडी इत्यादी साठी प्रभारी पोलीस अधिकार्‍यांना तारेवरची कसतर करून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी लागत आहे.
डहाणू-चर्चगेट लोकल सेवा सुरू झाल्याने झपाटयाने लोकसंख्या वाढत असलेल्या शहरात गुन्हेगारीचे प्रमाण ही वेगाने वाढत आहे. मात्र त्या प्रमाणात पोलीस बळ कमी पडत आहे. मुंबईपासून केवळ १२0 कि.मी. अंतरावर असलेले उहाणू पोलीस ठाण्याच्या १२३ चौ. कि.मी. अंतर्गत येत असलेल्या २८ गावे व शंभर पाड्यातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी डहाणू पोलीस ठाण्यात अधिक पदे र्मिाण करणे गरजेचे असतांना सध्या असलेली पदे ही रिक्त आहेत.
रिक्तपदांमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक, सहाय्यक फौजदार, पोलीस हवालदार, पोलीस शिपाई, महिला पोलीस, या पदांचा समावेश आहे.
डहाणू पोलीस ठाण्यात सन २0१0 नुसार १५५ मनुष्यबळाची गरज आहे. परंतु सध्या या पोलीस ठाण्यात केवळ ५५ अधिकारी, कर्मचारी वर्ग असल्याने दिवसेंदिवस वाढणार्‍या घरफोडी, बलात्कार, विनयभंग, हाणामारी इ. कडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे येथे अपूर्‍या मनुष्यबळामुळे येथील उपलब्ध पोलीसांना चोवीस तास डयूटी करूनही इमरजेन्सीमध्ये बोलावून घेतले जात असल्याने पोलीस ताण तणावाखली असल्याचे दिसून येते.
दरम्यान, नुकतेच डहाणूच्या रामवाडी भागात काही अज्ञात चोरटयांनी दिवसा ढवळया दोन घरफोड्या करून त्यातील सुमारे दोन लाखाचे दागिने चोरून पलायन केले. तर डहाणूच्या इराणी रोड येथे सध्याकाळच्या सूमारस दुकानबंद करून मोटारसायकल वरून जात असतांना काही अज्ञात चोरटयांनी दुकानदाराच्या हातातून तीन लाख रूपये असलेली बॅग हिसकावून पळ काढल्याने येथील व्यापरीवर्गात खळबळ उडाली आहे. तर अनेक दिवस झाले तरी पोलीसांना गुन्हेगार सापडत नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.

वसई पोलीस ठाण्याची जमीन हडप करण्याचा प्रयत्न फसला
वसई पोलीस ठाण्याच्या मालकीची ३० गुंठे जागा हडप करण्याचे षड्यंत्र एका पोलीस पत्नीच्या सतर्कतेने उधळले गेले आहे. या पोलीस ठाण्याच्या जागेचा बनावट नकाशा बनवून त्यातील ३० गुंठे जागा बेपत्ता करण्यात आली होती. मात्र सुकेशिनी कांबळे या पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीने थेट पंतप्रधानांपर्यंत तक्रार केल्यानंतर प्रशासन हादरले. नव्याने मोजणी करून संपूर्ण १ हेक्टर ८४ गुंठे जागा पोलीस ठाण्याला परत मिळाली आहे.
वसई पोलीस ठाण्याच्या मालकीची १ हेक्टर ८४ गुंठे एवढी जागा आहे. त्या जागेवर पोलीस ठाणे आणि पोलीस कर्मचारी वसाहत आहे. उर्वरित मोक्याची जागा मोकळी होती. ही मोकळी जागा हडप करण्याचा डाव बिल्डरांनी रचला होता. त्यासाठी वसई पोलीस ठाण्याचा खासगी सव्‍‌र्हेअरमार्फत दुसरा बनावट नकाशा तयार करण्यात आला होता. या नकाशातून ३० गुंठे जागा बेपत्ता करण्यात आली होती. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता वसई-विरार’ने प्रसिद्ध केले होते.

धबधब्यांवरील ८०० किलो कचऱ्यात ९० टक्के मद्याच्या बाटल्या
पावसाने काढता पाय घेतल्यानंतर धबधब्यांवरील पर्यटकांची गर्दीही ओसरू लागली आहे. मात्र, या धबधब्यांच्या ठिकाणी गेल्या दोन-तीन महिन्यात भीषण कचरा साचला असून यात बहुतांश कचरा ‘तळीराम’ पर्यटकांनी टाकलेल्या मद्याच्या बाटल्यांचा आहे. एका पर्यावरणवादी संस्थेने या ठिकाणांहून जमा केलेल्या जवळपास ८०० किलो कचऱ्यात ९० टक्के या मद्याच्याच बाटल्या आहेत.
मुंबईतील ‘एन्व्हायर्न्मेंट लाइफ’ या पर्यावरणवादी संस्थेने नुकतीच मुंबई शहरानजीकच्या खारघरचा पांडवकडा, वसईतील चिंचोटी, खोपोलीमधील झेनिथ आणि नेरळमधील आनंदवाडी, जुम्मापट्टी, टपलावाडी या सहा अत्यंत गर्दी होणाऱ्या धबधब्यांच्या ठिकाणी सफाई मोहीम राबवली. ‘एनएसएस’ आणि ‘एनसीसी’ व संस्थेचे मिळून २५० कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. वसईतील पवन देशमुख यांच्या ‘साह्य़मित्र’ या गिर्यारोहण संस्थेने सफाई मोहीमेत सहभाग घेतला होता.
संस्थेच्या कार्यकर्त्यांनी २० किलो वजनाच्या ४१ प्लास्टिक पिशव्या भरून जवळपास ८०० किलोच्या आसपास कचरा गोळा केला आहे. यात खारघर येथे ८० किलो, नेरळ-माथेरान येथील धबधब्यांवर ३६० किलो, चिंचोटी, वसई येथे २६० किलो आणि खोपोली येथे १२० किलो कचरा उचलण्यात आला. या कचऱ्यात निव्वळ मद्याच्या बाटल्यांचा खच होता.  – धर्मेश बराई, प्रमुख, ‘एन्व्हायर्मेट लाईफ’संस्था.

ग्रामसेवकांची माहिती देण्यास टाळाटाळ,अपिलासाठी राहिले गैरहजर,आय.एस.ओ. मानांकन कशासाठी?
-सुरेश काटे■ तलासरी,लोकमत.
तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये घरकुलांचे कामात, व जण सुविधांच्या कामात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे जाणवत आहे. आदिवासी लाभार्थ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत घरकुलाचा निधी हडपण्यात आला असल्याची चर्चा होती. त्यामुळे तलासरी तालुक्यातील आदिवासी लाभार्थी घरकुला पासून वंचित आहेत वा त्यांची घरकुले अर्धवट आहेत.
या घरकुलांचे कामाची माहिती घेण्यासाठी काजळी, करंजगाव, कोदाड, सावरोली, वडवली, वसा, संभा, डोंगारी, गिरगाव, उपलाट, झरी, वरवाडी व झाई ग्रामपंचायतींना माहिती अधिकाराचे अर्ज देण्यात आले. पण घरकुलांचे व जन सुविधांच्या कामाची माहिती दडविण्याचा प्रकार सुरु आहे का? असा प्रश्न अर्जदाराकडून विचारला जात आहे. याप्रकरणी तलासरी पंचायत समिती विस्तार अधिकारी ग्रामपंचायत यांच्याकडे अपील करण्यात आले. परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तलासरी पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी तथा अपिलीय अधिकारी बापुसाहेब नाळे यांच्या समोर झालेला सूनावणीस तब्बल १३ ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक माहिती घेऊन न येता हात हलवीत आले. महत्वाचे म्हणजे त्यातील फक्त सहाच जण यावेळी उपस्थित होते. जन माहिती अधिकार्‍याने चार दिवसात अपीलकर्त्यास माहिती द्यावी असा आदेश अपिलीय अधिकारी यांनी दिला. मात्र त्याकडेही या ग्रामसेवकांनी पाठ केली आहे. तलासरी पंचायत समितीला नुकतेच आय एस ओ मानांकन प्राप्त झाले हे मानांकन चांगल्या प्रशासकीय कामा बाबत असते . परंतु तलासरी पंचायत समितीच्या अखत्यारीत असलेल्या ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार, घरकुलांच्या कामात आदिवासी लाभार्थ्यांची फसवणूक, अंगणवाडी चा कपाट घोटाळा, बोरिंगचा घोटाळा तसेच माहिती अधिकाराची पायमल्ली या सर्व कारणामुळे तलासरी पंचायत समितीला मिळालेला आय. एस. ओ. मानांकन नक्की कशासाठी मिळाले या बाबत शंका निर्माण होत आहे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home