Thursday, October 6, 2016

पालघर न्यूज ६ ओक्टोबर

वसई विरार शहर महापालिका मेरी तुस्कानो जोसेफ ऑगस्टीन तुस्कानो
सहाय्यक आयुक्त तुस्कानोंच्या पतीस अटक,नातलगांचाही सहभाग
बोगस सीसीप्रकरण : चार महिन्यांनी कारवाई


वसई : बेकायदा बांधकाम करताना बोगस व खोटी विकास परवानगी तसेच दस्तऐवज केल्याप्रकरणी चार महिन्यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त मेरी तुस्कानो यांचे पती जोसेफ तुस्कानो यांना अटक केली. सहाय्यक आयुक्तांचाच पती बोगस सीसीप्रकरणात गुंतल्याने इतर अधिकार्‍यांकडे आता संशयाने पाहिले जात आहे.
वसई विरार शहर महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची जबाबदारी सहाय्यक आयुक्त मेरी तुस्कानोंवर सोपवण्यात आली होती. राजोडी येथील सर्व्हे क्रमांक ४६, हिस्सा क्रमांक ७ या हरित पट्ट्यावर सहाय्य्क आयुक्त मेरी तुस्कानो यांचे पती जोसेफ ऑगस्टीन तुस्कानो आणि प्रशांत चौधरी यांनी बोगस व खोटी विकास परवानगी व दस्तऐवज तयार करून बेकायदेशीर बांधकाम केले होते. मेरी तुस्कानो यांनी पदाचा गैरवापर करीत आपल्या पतीच्या बेकायदा बांधकामास संरक्षण दिले होते.

वसई विरार पालिका परिवहन: लोकप्रतिनिधींना प्रवास फुकट, प्रवाशांवर दरवाढीचा बोजा,कंत्राटदाराने थकविले कोट्यावधीचे कर, बाल पोषण आहार अधिभाराचे ५0 लाख भरलेच नाही
तोट्यात चालत असल्याचे कारण पुढे करीत परिवहन सेवेच्या तिकीट दरात काही महिन्यांपूर्वीच वाढ करून सर्वसामान्य प्रवाशांवर बोजा टाकला होता. परिवहन सेवेने आजी माजी खासदार, आमदार आणि विद्यमान नगरसेवकांसह परिवहन समिती सदस्यांना मोफत प्रवास सुविधा जाहीर केली आहे. डायलिसीसच्या रुग्णांना राखीव सीट,पुढच्या दाराने प्रवेश आणि तिकीटाच्या दरात सवलत देण्यात येणार आहे. सर्व प्रवाशांना मोफत वायफाय सेवा,दोन महिन्यांच्या पासावर तीन महिने प्रवास करण्याची सुविधा दिली जाणार आहे. या सुविधा सोमवारपासून लागू करण्यात आल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ठेकेदाराने प्रवाशांकडून वसूल केलेला सरकारचा कोट्यवधीचा कर तोटा असल्याने थकवल्याची कबुली खुद्द महापालिकेने माहिती अधिकारात दिली आहे. ठेकेदाराने प्रवाशांकडून सरकारी तिजोरत भरणा करावयाचा जानेवारी २0१४ ते जून २0१६ पर्यंत वसूल केलेला २ कोटी ७१ लाख ५0 हजार रुपयांचा प्रवासी कर थकवला आहे. त्याचबरोबर बाल पोषण आहार अधिभारापोटी ठेकेदाराने प्रवाशांकडून वसूल केलेले एप्रिल २0१४ ते जून २0१६ पर्यंत ५0 लाख ७९ हजार ९४८ रुपये अद्याप सरकारी तिजोरीत न भरता स्वत:कडे ठेवले आहेत. ठेकेदाराने या रकमेसह सप्टेंबर महिन्याअखेरपर्यंत वसूल केलेली रक्कम सरकारच्या तिजोरीत अद्याप जमा केलेली नाही.

वाढवण बंदर सरकार-समितीत संघर्षाची चिन्हे, बंदी कशी उठविणार?
शौकत शेख■ डहाणू
सरकारने एका बाजूला वाढवण बंदर उभारण्याचा घाट घातला असला तरी दुसर्‍या बाजुला डहाणू च्या पश्‍चिम किनारपट्टी वरील २५ ते ३0 गावातील हजारो मच्छीमार ,शेतकरी ,बागायतदार ,डायमेकर्स यांना उध्वस्त करणार्या या बंदराच्या सर्व्हेला विरोध करण्यासाठी परिसरातील हजारो लोक आक्रमक झाल्याने ,वाढवण बंदर संघर्ष समिती आणि सरकार यांच्यात तीव्र संघर्ष होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

 पावसामुळे वसई तालुक्यातील 'पिवळे सोने' धोक्यातपारोळ/वसई : तालुक्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तालुक्यातील १५२हेक्टर भात पिकाला धोका निर्माण झाला आहे. त्या मुळे हाता तोंडाशी आलेला घास वाया जाणार हया भीतीने शेतकर्‍र्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. वसईत ग्रामीण भागात मोठया प्रमाणात भाताचे पीक घेतले जाते. बियाणे, मजूरी, खते औषधे, महाग झाली असल्यामुळे भात शेती परवडत नसतानाही कर्ज काढून बळीराजाला ती करावी लागते. पण निसर्गाच्या लहरीपणामुळे या वर्षी हळवे भात तयार झाले असतांनाही परतीचा पाऊस लांबल्याने बळीराजाच्या पिवळ्या सोन्याला धोका निर्माण झाला आहे. या वर्षी चांगला पाऊस झाल्याने मोठया प्रमाणात पीक हातात येईल असे वाटत असतांनाच या पावसामुळे उभे पीक वाया जाणार असल्याने या वर्षी ही भात शेती तोट्यात जाणार आहे. कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्‍यांना शासनाने मदतीचा हात दयावा असे पारोळ चे शेतकरी निलेश पाटील यांनी लोकमतला सागितले. सुनिल घरत


वसईमध्ये कॅन्सर चिकित्सा शिबीर
वसई : प्रदूषण, धूम्रपान, गुटखा, अतिमद्यपान, लठ्ठपणा, तळलेल्या पदार्थांचे अतिसेवन, आदी कॅन्सर बाधा होण्याची शक्यता असलेली काही कारणे आहेत. प्राथमिक टप्प्यावर कॅन्सर कळत नाही. म्हणून प्रतिबंधन हाच त्यावर खरा उपाय आहे. तसेच तपासणीत वेहीच निष्पन्न झाल्यास उपचार करता येतो. असे कॅम्प भरवणे साधे काम नाही. पण निर्भय जनमंचने १00 कॅम्प भरवले याचे कौतुक आहे, असे प्रतिपादन पालघर येथील सुप्रसिध्द स्त्रीरोग तज्ज्ञ आणि पुरोगामी विचारांचे डॉ.विलास पोसम यांनी कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूल, नंदाखाल येथे निर्भय जनमंचच्या १00 व्या कॅन्सर चिकित्सा शिबीराच्या उदघाटन सोहळ्यात केले.

पालघरात वाटले २१ कोटींचे मुद्रा कर्ज
कृषी व पूरक व्यावसायिकांनाही लाभ : ४५00 लाभार्थी, योजना होणार व्यापक
या मुद्रा योजनेचे व्यवसायाच्या स्वरूपाने शिशु, किशोर व तरुण असे तीन प्रकार असून व्यवसायाच्या व्यापाकतेनुसार या प्रकारात रोजगाराच्या साधनांवर कर्ज ठरवले जाते. या योजनेमध्ये शिशु कर्जाअंतर्गत लाभार्थी ५ ते ५0 हजारापर्यंत, किशोर कर्जाअंतर्गत ५0 हजार ते ५ लाखांपर्यंत व तरु ण कर्जाअंतर्गत ५ लाखांपासून ते १0लाखांपर्यंतचे कर्ज घेऊ शकतात. योजनेच्या निकषाप्रमाणे हे कर्ज व्यवसायासाठी लाभाथ्यांना दिले जात असून हे कर्ज विनाअनुदानीत तत्वावर असून लाभार्थ्यांना ही कर्जे शहानिशा करून तात्काळ वाटप केली जातात.
या योजनेत दिलेले मुद्राकार्ड मुख्यत: कृषि क्षेत्नाच्या व्यतिरिक्त व्यवसाय उद्योग करण्यासाठी देण्यात येत होते. परंतु नुकतेच कृषि क्षेत्नाला पूरक असणार्‍या व्यवसायासाठीही या अंतर्गत कर्ज मिळणार आहे. छोटे व्यवसाय जसे भाजीपाला विक्री, स्टेशनरी दुकान, झेरॉक्स मशीने, खानावळ, ब्युटी पार्लर, खाद्य पदार्थ विक्री करणारी गाडी टाकणे, पोल्ट्री फार्म, सेवा देणारा उद्योग अशा प्रकारचा कुठलाही लघु उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी या योजने अंतर्गत कर्ज उपलब्ध करु न देण्यात येते. या मुद्रा योजनेचा लाभ जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, खाजगी बँका, पतसंस्थांमधून घेता येईल. 

वसई : वसई विरार पालिकेने सातीवली येथे मात बाल संगोपन केंद्र सुरु केले असून त्याचे उद्घाटन आमदार क्षितिज ठाकूर यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर प्रवीणा ठाकूर, आमदार विलास तरे, माजी खासदार बळीराम जाधव, आयुक्त सतीश लोखंडे उपस्थित होते.

विक्रमगड तालुक्यातील खुडेदच्या घोडीचा पाडा येथील ९ लाख ९९ हजार ५३0 रु पयाच्या मंगल कार्यालय सभागृहाची रक्कम हडप केल्या प्रकरणी दोषी असलले सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हारचे कार्यकारी अभियंता नितीन पालवे, विक्रमगडचे उपअभियंता सुदाम ससाणे, ठेकेदार औसरकर, आदिवासी विकास निरीक्षक एस. जी. भोये, सरपंच प्रदीप पाडवी या पाचजणांविरोधात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. आता या सर्व आरोपीना अटक कधी होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. लोकमतनेच हे प्रकरण सर्व प्रथम उघडकीस आणून सातत्याने त्याविरोधात आवाज उठवला होता. अशाच स्वरुपाची १00 कोटी रुपयांची बोगस कामे करण्यात आली असून आता त्यातील दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.

वसई : इंडियन नॅशनल थिएटर (आयएनटी) ने विर्लेपार्ले येथील साठे कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या हिंदी एकांकिका स्पर्धेत वर्तक कॉलेजच्या मजार एकांकिकेने प्रथम क्रमांक व अन्य पाच पारितोषिके पटकावली.
उत्कृष्ट एकांकिका, लेखन (प्रथम , लेखक इरफान मुजावर), दिग्दर्शक (प्रथम, मनीष सोपारकर), नेपथ्य (प्रथम, संदेश ब्रिद, विनित म्हात्रे), उत्कृष्ट अभिनय (तृतीय, संजय कोकरे) ही पारितोषिके मजारने पटकावली.
भारत-पाकीस्तान सीमेवरील सैनिकी जीवनाचे वास्तव चित्रण करणार्‍या या एकांकिने रसिकांचे लक्ष वेधून घेतले. याआधी मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात या एकांकिकेतील प्रिती पटेल या विद्यार्थीनीला अभिनयाचे प्रथम आणि संजय कोकरे या विद्यार्थ्याला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते.

रुईघर - बोपदरी सुविधांपासून वंचित
विकास फक्त कागदावर : आरोग्य, शिक्षण, रोजगार, रस्ते, वीज या समस्या कायम
जव्हार : तालुक्यातील गुजरात व दादरानगरहवेली राज्यांच्या हद्दीवर लागून असलेले रुईघर बोपदरी या गावातील आदिवासी नागरिकांना शासनाच्या मूलभूत सुविधांपासून समस्यांपासून वंचित राहावे लागते आहे. शासनाच्या मूलभूत सुविधा आरोग्य, शिक्षण, रस्ते, रोजगार, वीज, या समस्या या नागरिकांपर्यंत पोहचल्याच नाहीत. त्यामुळे या रु ईघर बोपदरी गावात आजही कुपोषित मुलांचे प्रमाण कायम आहे.
तालुक्यापासून ४३ कि. मी अंतर असलेल या गावात भोकरण, पाचबुड, ठानापाडा, चंदोशी, असे पाच पाडे असून या गाव-पाडे मिळून एकूण- २ हजार ६00 च्या आसपास लोकसंख्या आहे. मात्न या गावाला शासनाच्या मूलभूत सुविधा अद्याप पर्यंत मिळाल्याच्या नाहीत. त्यामुळे गाव- पाड्याच्या श्रेणीनुसार आरोग्य विभागाच्या नोंदीप्रमाणे १९ बालके कुपोषणाच्या विळख्यात आहेत. यापैकी १७ बालके तीव्र व २ बालके अतितीव्र अवस्थेत आहेत.
शासनाच्या योजना या बालकांपर्यंत व्यवस्थितरित्या पोहचत नसल्याचे ग्रामस्थानी सांगितले. हे गावं चालतवड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आहे. रुईघर ते प्राथमिक आरोग्य केंद्र हे ३२ कि.मी. असल्याने, अनेक कुपोषित बालक व येथील रुग्णांना आरोग्य सेवा व्यविस्थत वेळेत मिळत नाही.(वार्ताहर) खराब रस्त्यामुळे एसटी बंद
रुईघर येथे जाण्यासाठी रस्त्याची सोय नाही. २0 ते २५ वर्षापूर्वी बनविण्यात आलेल्या रस्त्यावरील डांबर व खडी पूर्णपणे निघून गेली आहे. तो पूर्णत: खड्डेमय झाल्याने एसटी बस येत नाही. या गावात जाण्या येण्यासाठी फक्त एक खाजगी जीप आहेत. ती ही वारंवार खराब होणे, किंवा तीचा ड्रायव्हर बाहेरगावी जाणे या कारणांमुळे वारंवार बंद असते त्यामुळे येथे कुठलेही प्रवासाचे साधन मिळत नाही. परिणामी येथील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विद्यार्थ्यांना फक्त जि.प. शाळेचा आधार
रुईघर बोपदरी गावात जिल्हा परिषद शाळा सोडली तर शिक्षणाची सुविधा नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांवर आधुनिक शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. हे जिल्ह्यातील शासनाच्या सुविधांपासून वंचित राहीलेले हे गाव आहे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home