Wednesday, October 5, 2016

वसई-विरार महापालिकेची ‘मिशन २०० कोटी’

वसई-विरार महापालिकेची ‘मिशन २०० कोटी’
वसई-विरार महापालिकेची ‘मिशन २०० कोटी’

वसई-विरार महापालिकेने यंदाच्या आर्थिक वर्षांत २०८ कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी पालिकेने विशेष मोहीम हाती घेतली असून थकबाकीदारांवर जप्तीच्या नोटिसाही पाठविण्यात आल्या आहेत.

वसई-विरांर शहरात साडेसहा लाख मालमत्ता आहेत. शहराच्या विकासकामात मालमत्ताकराद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नाचा मोठा वाटा असतो. त्यामुळे जास्तीत जास्त कर संकलनाचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे. मागील वर्षांत नागरिकांना उशिरा बिल मिळाल्याने करवसुलीसाठी विलंब झाला होता. त्यामुळे पालिकेने आतापासून बिल वाटपावर भर दिला आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षांत पालिकेने २०८ कोटी कर वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यात मागील वर्षांच्या १०४ कोटी रुपयांच्या थकीत रकमेचा समावेश आहे. याबाबत बोलताना पालिकेचे सहायक आयुक्त (आस्थापना) सदानंद सुर्वे यांनी सांगितले की, आर्थिक वर्षांच्या पहिल्या दिवसांपासूनच करवसुलीचे नियोजन केले आहे. नागरिकांना त्यांच्या सोयीनुसार कर भरता यावा यासाठी नऊ प्रभाग समित्यांमधील कार्यालये सातही दिवस सुरू ठेवण्यात आलेली आहेत. ऑनलाइन कर भरण्याची सुविधा पालिकेच्या संकेतस्थळावरून उपलब्ध करून दिलेली आहे. ५२ राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखांमधून ऑनलाइन कर भरता येतो. पालिकेने ‘व्ही. क्लिक’ हे अ‍ॅप विकसित केले असून त्याद्वारेही नागरिकांना कर भरता येणार आहे.

१०४ कोटी बुडविणाऱ्या थकबाकीदारांवर कारवाई

गेल्या आर्थिक वर्षांत महापालिकेने कोटी ९४ कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यापैकी १०८ कोटी वसूल झाले होते. परंतु अद्याप १०४ कोटी रुपयांची थकबाकी रक्कम थकीत आहे. त्यासाठी पालिकेने नोटिसा पाठवून जप्तीची कारवाई सुरू केलेली आहे. पालिका कारवाई करत नाही हा समज खोटा ठरवून कडक कारवाई करण्याचे धोरण पालिकेने राबवले आहे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home