Tuesday, October 4, 2016

पालघर न्युज 📡💻 *४ ऑक्टोबर*वसईविरार महानगरपालिका अग्निशमनच्या ताफ्यात ७ फायर फायटिंग बुलेट*
•या बुलेट अद्ययावत असून या बुलेट वाहनावर फायर इस्टिंग्विशर, स्नेक स्केचर स्टीक, वॉटर मीस्ट फायर फायटिंग सिस्टीम अशा यंत्रणा आहेत.
•अडगळीच्या ठिकाणी जाण्यास, साप पकडण्यास या बुलेटचा उपयोग होणार आहे.
•एका बुलेटची किंमत तब्बल सात लाख रुपये आहे.
•महापालिकेने सात बुलेट खरेदी केल्या असून आणखी अशा बुलेट टप्प्याटप्प्याने विकत घेतल्या जाणार आहेत.

*शहराच्या स्वच्छतेसाठी रविवारी वसई-विरारमधील तब्बल १० हजार नागरिक एकाच वेळी रस्त्यावर उतरले.*
हातात झाडू घेऊन या नागरिकांनी रस्ते, मैदाने, शहरातील चौक आणि परिसराची स्वच्छता केली, त्याशिवाय १२०० तरुणांनी फ्लॅश मॉब करून शहर स्वच्छतेचा संदेश दिला. या दोन्ही उपक्रमांची नोंद गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे.
स्वच्छता अभियान स्कायवॉकखाली मोठय़ा उत्साहाने राबवले गेले. शेकडो लोक खाली परिसर स्वच्छ करीत होते. विद्यार्थ्यांच्या रॅलीतून स्वच्छतेचे महत्व पटवून दिले जात होते. त्याचवेळी कार्यकर्त्यांना स्कायवॉकची सफाई करण्याचे सुचले नाही. त्यामुळे ती तशीच पडून राहिली होती. विशेष म्हणजे स्कायवॉकला लागून वसई विरार पालिकेचे नवघर-माणिकपूर विभागीय कार्यालय आहे. या ठिकाणी दररोज बसणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍यांनाही तो स्वच्छ करण्याचे भान राहिले नाही.

वसईमधील प्रसिद्ध गुजराती नाट्य रसिक परिवाराने आयोजित केलेला नवघर-माणिकपूर शहरातील साईनगरातील गरबा चांगलाच रंगात आला आहे. असे असले तरी यंदा *नवरात्रौत्सवात दररोज आरती आणि देणगीच्या रुपाने जमा होणारा निधी शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी मदत म्हणून देण्यात येणार आहे.* विशेष म्हणजे दररोज रात्री राष्ट्रगीताने गरब्याची सांगता केली जात आहे.

*कोकण पर्यटन भूषण पुरस्काराने सन्मान*
डहाणू/बोर्डी : संतोष शेट्टी (डहाणू) व श्रीकांत सावे (तलासरी) यांना कोकण पर्यटन भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आधुनिक कोकणच्या निर्मितीसाठी सह्याद्री कॅम्पसच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्नात केलेल्या कार्याबद्दल संतोष शेट्टी यांना गौरविण्यात आले आहे. तर महाराष्ट्र गुजरात सीमेवरील तलासरी तालुक्यातील झाई बोरीगाव येथील सावे यांना कोकण भूषण पुरस्काराने गौरविले आहे.

विरार : जनावरांच्या १५० किलो मांसाने भरलेली क्वॉलीस वसईच्या पूर्वेकडील मुंबई-अहमदाबाद मार्गावरील सातीवली खीडीत सापडल्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने चालक सोहेल गेजला मारहाण करून गाडीचीही तोडफोड केली. या प्रकारामुळे गुजरात राज्यातील गोध्रातून वसईला जनावरांच्या मांसाचा पुरवठा होत असल्याचे उजेडात आले आहे.

*विरारचे कराटेपटू वर्ल्डकपमध्ये चमकले*
वसई/पारोळ: मुंबई येथे झालेल्या १८ व्या वर्ल्डकप शोतोकोन कराटे स्पर्धेत विराराच्या प्रियंका गुरव (गोल्ड), आशीष गुरव (गोल्ड/ब्रांझ) सूर्यकांत वेलकर (गोल्ड) धनश्री पवार (गोल्ड) विराराच्या मुलांनी या वर्ल्डकप कराटे स्पर्धेत पदके मिळवून विरारचे नाव मोठे केले. या स्पर्धेत श्रीलंका, नेपाळ, पोर्तुगाल, रशिया, भूतान, ब्राझील, अफगाणिस्तान या देशांतील कराटेपटूंनी भाग घेतला होता. या स्पर्धेत प्रशिक्षक राजू रायकर यांनी वसई-विरार मुलांकडून कामगिरी करवून घेतली असून या मुलांचे विरार परिसरात कौतुक होत आहे.


0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home