Friday, October 14, 2016

पालघर न्यूज १४ ऑक्टोबर

'विरारच्या प्रवाशांच्या विरोधात असंतोष',पालघर-डहाणूकर आंदोलनाच्या पवित्र्यात,
पालघर मुंबई सेंट्रलवरून गुजरातकडे जाणाऱ्या लांबपल्ल्याचा ट्रेनमधून पालघर-डहाणूच्या दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दमदाटी करणाऱ्या विरारच्या प्रवाशांच्या विरोधात सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या विरोधात सोशल मीडियावरून  रेल रोको मेसेजला मोठा पाठिंबा मिळत आहे.
येथील प्रवासी संघटनेने वेळोवेळी रेल्वे प्रशासनास निवेदनाद्वारे लोकल गाड्यांची संख्या वाढविण्याची मागणी केली आहे. मात्र त्या पत्रव्यवहाराचा कुठलाही परिणाम न झाल्याने शेवटी स्थानिक प्रवाशांना पालघर-डहाणू ते विरार ते पुढे चर्चगेट असा प्रवास अनेक वर्षे उभ्याने व गर्दीने कोदटलेल्या वातावरणात करण्याची पाळी ओढवली आहे. प्रवासी संघटना आणि प्रवासी ह्यांनी अनेक वेळा रेल रोकोआंदोलने करून प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला. वेळोवेळी प्रसिद्धी माध्यमांनी प्रवाशांच्या समस्याही मांडल्या. त्यानंतर तब्बल १४ वर्षांनी १६ एप्रिल २०१६ रोजी उपनगरीय लोकल वाहतूक सेवा सुरू करण्यात आली. लोकल वाहतूक सुरू करण्यात आल्याने आपली अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाल्याने आता सुखा समाधानाने प्रवास करता येईल या स्थानिकांच्या अपेक्षेला रेल्वे प्रशासनाने धक्का देत मोजक्याच आणि अपुऱ्या लोकल सेवा दिल्या.त्यामुळे नाईलाजाने पालघर. डहाणू, वाणगाव. बोईसर, सफाळे वितरणा. आदी भागातील प्रवाशांना पुन्हा मेल, एक्सप्रेस वर अवलंबून रहावे लागले. परंतु मुंबई सेंट्रल वरून सुटणाऱ्या वलसाड एक्स्प्रेस, सौराष्ट्र मेल, लोकशक्ती एक्स्प्रेस ह्या रात्री सुटणाऱ्या गाड्यांना विरार स्टेशनला थांबा देण्यात आल्याचा फायदा उचलीत विरारच्या प्रवाशांनी सफाळेपर्यंत रेल्वे पास काढून विरारपर्यंत प्रवास करण्याची क्लुप्ती शोधून काढली आहे. चर्चगेट ते विरार दरम्यान दर पंधरा मिनिटांनी एक लोकल गाडी असतानाही मोठ्या संख्येने विरारचे प्रवासी ह्या एक्स्प्रेसमध्ये चढू लागल्याने आणि त्यांचे आरक्षित डब्यातील प्रवाशांशी हुज्जत घालण्याचे प्रमाण वाढू लागल्याने त्याचा फटका पालघर, डहाणूतील प्रवाशांना बसून रेल्वे पोलिस, टीसी यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. तसेच विरार स्टेशनवरून वैतरणाच्या पुढे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्याने ट्रेनमध्ये चढणाऱ्या आणि उतरणारे प्रवासी ह्यांच्यात मोठ्या प्रमाणात वादावादीच्या घटना वाढीस लागल्या. विरारच्या प्रवाशांसाठी दर पंधरा मिनिटांनी लोकल सेवा असताना त्यांनी लांबपल्याच्या ट्रेनमधून प्रवास करणेच चुकीचे असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणूनही काही उपयोग होत नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई सेंट्रल स्टेशनवरून सुटणाऱ्या वलसाड एक्स्प्रेस बोरीवलीला संध्याकाळी ६.५५ला आल्यानंतर थेट दीड तासाच्या अवधी नंतर ८.२५ ला लोकशक्ती एक्स्प्रेस गाडी येते. त्यामुळे दीड तासाच्या कालावधीत पालघर-डहाणू कडे जाण्यासाठी एकही ट्रेन नसल्याने बोरिवली, विरार येथे मोठी गर्दी जमते. नेमकी ह्याचवेळी विरारला उतरणारे विरारकर आणि पालघरकडे जाण्यासाठी चढणारे यांची एकच चढाओढ लागते. ह्यावेळी अनेक पालघरकडे जाणारे प्रवासी ट्रेनमध्ये चढू शकत नसल्याने विरारला अडकतात, तर विरारला उतरणारे उतरू न शकल्याने सफाळे, पालघरपर्यंत येतात. ह्यावेळी प्रवाशात मोठी भांडणे होतात. तक्रार करूनही एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या विरारच्या प्रवाशांवर रेल्वे प्रशासन कारवाई करीत नसल्याने शेवटी इथल्या प्रवाशांनी रेलरोको आंदोलन करण्याचा पवित्रा उचलला असून सोशल मीडिया वरून त्याला मोठा प्रतिसादही मिळत आहे.  ( म. टा. वृत्तसेवा)

वसई, विरार-पालघर, डहाणू प्रवाशांत संघर्ष?
पालघर : पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट विरार दरम्यान मुबलक लोकल ट्रेन सेवा असताना मुंबई सेंट्रल वरून गुजरातकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याचा ट्रेन मधून प्रवास करीत पालघर-डहाणूच्या दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दमदाटी करणाऱ्या विरारच्या प्रवाशां विरोधात सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या विरोधात सोशल मिडियावरील रेल रोकोच्या मेसेजला मोठा पाठिंबा मिळत आहे.
पश्चिम रेल्वेच्या पालघर जिल्ह्यातील विरार ते डहाणू दरम्यानच्या भागाला सन १९९९ मध्ये उपनगरीय क्षेत्र म्हणून रेल्वे प्रशासनाने जाहीर केले.परंतु या घोषणेनंतर रेल्वे सेवा सुरु होण्याच्या हालचालींना वेग येईल ही इथल्या प्रवाशांची अपेक्षा फोल ठरली. त्यामुळे इथल्या प्रवासी संघटनेने वेळोवेळी रेल्वे प्रशासनास निवेदनाद्वारे मागण्या केल्या. मात्र त्या पत्रव्यवहाराचा कुठलाही परिणाम न झाल्याने शेवटी स्थानिक प्रवाशांना पालघर-डहाणू ते विरार ते पुढे चर्चगेट असा प्रवास अनेक वर्षे उभ्याने, कोंदटलेल्या वातावरणात करण्याची पाळी ओढवली. प्रवासी संघटना आणि प्रवासी यांनी अनेक वेळा रेल रोको आंदोलने करून प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला. वेळोवेळी प्रसिद्धी माध्यमांनी प्रवाशांच्या समस्याही मांडल्या. त्यानंतर तब्बल १४ वर्षांनी १६ एप्रिल २०१६ रोजी उपनगरीय लोकल वाहतूक सेवा सुरू करण्यात आली.
लोकल वाहतूक सुरु करण्यात आल्याने आपली अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाल्याने आता सुखासमाधानाने प्रवास करता येईल ह्या स्थानिकांच्या अपेक्षेला रेल्वे प्रशासनाने धक्का देत मोजक्याच आणि अपुऱ्या लोकल सेवा दिल्या. त्यामुळे नाईलाजाने पालघर, डहाणू, बोईसर, सफाळे इ. भागातील प्रवाशांना पुन्हा मेल, एक्सप्रेस वर अवलंबून रहावे लागले.परंतु मुंबई सेंट्रल वरून सुटणाऱ्या वलसाड एक्स्प्रेस, सौराष्ट्र मेल, लोकशक्ती एक्स्प्रेस ह्या रात्री सुटणाऱ्या गाड्याना विरार स्टेशनला थांबा देण्यात आल्याचा फायदा उचलीत विरारच्या प्रवाशांनी सफाळेपर्यंत रेल्वे पास काढून विरार पर्यंत प्रवास करण्याची क्लृप्ती शोधून काढली. चर्चगेट ते विरार दरम्यान दर पंधरा मिनिटांनी एक लोकल गाडी असतानाही मोठ्या संख्येने विरार चे प्रवासी या एक्स्प्रेस मध्ये चढू लागल्याचा फटका पालघर, डहाणू तील प्रवाशांना बसून रेल्वे पोलीस, टीसी यांनी त्रास द्यायला सुरु वात केली. विरारच्या प्रवाशांसाठी दर पंधरा मिनिटांनी लोकल सेवा असताना त्यांनी लांब पल्याच्या ट्रेन मधून प्रवास करणेच चुकीचे असल्याच्या तक्रारी रेल्वे प्रशासनाकडे वारंवार केल्या गेल्यात परंतु त्यांची कोणतीही दखल रेल्वेने घेतली नाही. त्यामुळे आता उग्र आंदोलन करण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही. (वार्ताहर,लोकमत)

वसई - विरारचे खड्डे गिनीज बुकात जाणार?
वसई : परग्रहावरही जेवढे खड्डे नसतील तेवढे खड्डे वसई वैतरणा रस्त्यावर आहेत. या खड्ड्यांमधून नेमके जायचे तरी कसे असा प्रश्न पडतो. वसई- विरार महानगरपालिकेच्या हद्दीतील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेक अपघात घडत असतात. त्यात रस्त्यावर पदपथही धड नाहीत. अपघातात जखमी, वयोवृद्ध, तान्ही मुलं, गर्भवती महिला यांना या खड्ड्यांमधून रुग्णालयात न्यायचे तरी कसे? आपत्कालीन सेवा या वसई : परग्रहावरही जेवढे खड्डे नसतील तेवढे खड्डे वसई वैतरणा रस्त्यावर आहेत. या खड्ड्यांमधून नेमके जायचे तरी कसे असा प्रश्न पडतो. (लोकमत)

डहाणू तालुक्यातील विवळवेढे (महालक्ष्मी) ग्रा.पं.ची हलगर्जी : विजेचे बिलच नाही भरले, खड्ड्यातले पाणी पिण्याची वेळ, एककोटीची पाणीयोजना बंद
विवळवेढे ग्रामपंचायतीमध्ये चार वर्षापूर्वी १ कोटी ९ लाख रुपयाचा निधी खर्च करुन विवळवेढे पेयजल योजना सुरु केली. मात्न ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे विजेचे बील न भरल्याने महावितरणने योजनेचा वीज पुरवठा खंडित केल्याने ती मागील वर्षापासून धूळखात पडली आहे. त्यामुळे विवळवेढे (महालक्ष्मी) डोंगरीपाडा, पडवळपाडा या पाड्यातील आदिवासींवर खड्डय़ातील दूषित पाणी पिण्याची वेळ ओढवली आहे. (लोकमत)

वाड्यातील डम्पिंग ग्राउंड महामार्गावर!
वाडा शहरात प्रवेश करताच घाण व उग्र वास घेऊन आपले स्वागत करण्यासाठी डम्पिंग ग्राउंड उभे असून आता तर ही घाण महामार्गावर आल्याने वाहनचालकांच्या समस्येत अधिकच भर पडत आहे.असे असले तरी, ग्रामपंचायत मात्न हे डम्पिंग ग्राउंड निर्मनुष्य स्थळी हलवायला तयार नसल्याने जनतेने याबाबत संताप व्यक्त केला आहे. कुठल्याही शहराच्या स्वागतासाठी सुंदर कमान, गार्डन अथवा एखादी ठळक गोष्ट असते. ज्यावर त्या शहराची ओळख, सौंदर्य व प्रतिष्ठा व्यक्त होते मात्न वाडा शहराच्या स्वागताला असणार्‍या डम्पिंग ग्राउंडमुळे या शहराला लाजेने मान खाली घालावी, अशी परिस्थिती आहे. वाडा शहरातील घनकचरा टाकण्यासाठी वाडा ग्रामपंचायतीकडे कुठलीही जागा उपलब्ध नसल्याचे कारण सांगत हा घनकचरा वाडा भिवंडी महामार्गावर गांधरे गावाजवळ भर रस्त्याकडेला टाकला जातो, ज्याचा उग्र वास व कुजलेल्या अन्न धान्यावर सतत वळवळ करणार्‍या प्राण्यांचा येथून येजा करणार्‍या लोकांना तसेच विद्यार्थ्यांना प्रचंड त्नास सहन करावा लागतो.
आतातर हा कचरा महामार्गावर आल्याने महामार्गाची एक बाजू जवळपास बंद होण्याच्या मार्गावर आहे. ज्याचा त्नास लोकांना व वाहनचालकांना नाहक सहन करावा लागत असून याकडे ना ग्रामपंचायत लक्ष देते ना सुप्रीम कंपनी किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाला याच गांभीर्य वाटते. (वार्ताहर,लोकमत)

नाळ्यात डुकरांची कत्तल, मांसविक्री
वसई : नाळे गावात डुकरांची कत्तल करून मांसाची खुलेआम विक्री केली जात असलमुळे रोगराई पसरणची भीती व्यक्त करून या प्रकारावर बंदी घालण्याची मागणी विक्रेत्याच्या सख्ख्या भावाने महापालिकेकडे केली आहे.
पानगाळी या गावात रिचर्ड डागो लोपीस याने घराच्या परिसरातच अनधिकृतपणो डुक्कर पालनाचा व्यवसाय सुरु केला आहे.या पाळीव डुकरांची बुधवार,शुक्रवार आणि रविवारी खुलेआम कत्तल केली जाते.या कत्तलीचे भयानक चित्र पहावे लागते आणि डुकरांनी फोडलेला हृदयद्रावक टाहो वारंवार कानी येतो. त्यामुळे लहान मुलांवर प्रचंड दडपण येत आहे. ते सतत भांबावलेल स्थितीत असतात. कत्तल केल्यानंतर डुकराचे आतडे आणि तत्सम टाकाऊ अवयव जवळच टाकली जातात. त्यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. अशी तक्रार रिचर्डचे सख्खे भाऊ अंतोनी डागो लोपीस यांनी महापालिकेकडे केली आहे.
डुकरांची कत्तल केल्यानंतर भर नाक्यावर उघड्यावर त्याच्या मांसाची विक्री केली जात आहे. डुकरपालन, त्यांची कत्तल आणि विक्री अशी कोणतीही परवानगी नसल्यामुळे काही ग्रामस्थांनीही रिचर्डच या प्रकारावर हरकत घेतली असता,त्यांना शिवीगाळ करून डुक्कर मारण्याच्या हत्याराने भोसकीन, अशी धमकी रिचर्डद्वारे दिली जात आहे. त्यामुळे त्याची या परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे त्याच्या या अवैद्य धंद्याला चाप बसवून कारवाई करणत यावी, अशी मागणी अंतोनी यांनी नालासोपारा पोलीसांकडे केली आहे. (प्रतिनिधी) प्राण्यांची कत्तल आणि मांसविक्री या दोनही बाबींसाठी परवाना घ्यावा लागतो, तो संबंधिताने घेतला आहे का? नसेल तर हा प्रकार महापालिका कसा काय चालू देते आहे? यातून नागरिकांच्या आरोग्याला निर्माण होणार्‍या
धोक्याला जबाबदार कोण? असे प्रश्न निर्माणझाले आहेत. (लोकमत)

वसईतील पोलीसाला वर्दीतील निरीक्षकापासूनच धोका ?
वसईतील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी खाजगी सर्व्हेअर काळे अँड असोसिएटस यांनी एका बड्या इसमाच्या बंगल्यासाठी रस्ता मिळावा, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील वसई पोलीस लाईनच्या नावे असलेल्या जागेच्या बोगस सातबार्‍यात दाखवून व सरकारी नकाशात फेरबदल करून बनावट आणि खोटे दस्तऐवज तयार केले आहेत. त्यामुळे संबंधीतांवर फौजदारी दखलपात्र गुन्हा दाखल दाखल करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वसई पोलीस लाइनमध्ये राहणार्‍या सर्व महिलांनी मुख्यमंत्र्यांकडे एका अर्जाद्वारे केली होती. त्यात पोलीस शिपाई शशिकांत कांबळे यांच्या पत्नीचाही समावेश होता. त्यामुळे कांबळे यांच्याबद्दलचा राग मनात धरुन वसई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांनी शशिकांत कांबळे यांच्या विरोधात बदनामी सुरु केली आहे. पोलीस लाईनमध्ये अतिक्रमण करण्यात आल्याची तक्रार महिलांनी केली असताना ही तक्रार पोलीस शिपाई कांबळे यांनी केल्याचे संपतराव पाटील यांनी भासवले. जमिल शेख यांना पाठवलेल्या नोटीसीत पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांनी थेट शशिकांत कांबळे यांनी तक्रार केल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. सर्वे क्र.९ ब, १ हेक्टर ८४ गुंठे या सरकारी जागेत जमील अहमद शेख यांनी अतिक्रमण करून बंगला उभारला आहे.आणि या बंगल्यात जाण्यासाठी पोलीस लाइनची जागा हडप करून त्यावर रस्ता उभारण्यात आला आहे. अशी तक्रार शशिकांत कांबळे यांनी केल्याचे संपतराव पाटील यांनी जमील शेख यांना लेखी कळवून चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले. विशेष म्हणजे पाटील यांनी शेख यांना दोन वेळा चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावूनही शेख पोलीस ठाण्यात फिरकलेसुद्धा नाहीत. त्यांच्यावर कारवाई करण्याचे सोडून पाटील यांनी तक्रारदार पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांची नावे उघड करून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक शशिकांत कांबळे यांनी पोलीस निरीक्षक पाटील यांनी नोटीसीत आपल्या नावाचा उल्लेख करून याप्रकरणात आपल्याला नाहक गुंतवल्याची तक्रार वरिष्ठांकडे केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. शेख यांच्यावर कारवाई करण्याऐवजी कांबळे यांच्याबाबत शेख यांच्या मनात अढी निर्माण होईल, या हेतूनेच पोलीस निरीक्षक पाटील यांनी नोटीस बजावल्याचा आरोप आमदार आनंद ठाकूर यांनी केला आहे. (वार्ताहर,लोकमत)

वसईला चोर्‍या, घरफोडीचे ग्रहण, विरारमध्ये सर्वाधिक : आठ महिन्यांत २६७ घरफोड्या
संजू पवार■ विरार
वसई तालुक्यात घरफोडी आणि चोर्‍यांचे सत्र सुरुच असून गेल्या आठ महिन्यात २६७ घरफोड्या आणि ४८६ चोर्‍या सात तालुक्यात झाल्या आहेत. विरार ठाण्याच्या हद्दीत घरफोडी आणि चोरींचे सर्वाधिक गुन्हे घडले आहेत. वसई तालुक्यात जानेवारी २०१६ ते ऑगस्ट २०१६ या आठ महिन्याच्या कालावधीत २६७ घरफोड्या, चोरीच्या ४८६ घटना घडल्या आहेत. त्यात अनेक घर, सदनिका, बंगलो, वाडी, कारखान्यातून लाखो रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. काही घटनांमध्ये सोन्या चांदीची दुकाने लुटण्यात आली आहेत. यामध्ये चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे. यातील काही गुन्ह्यांची उकलही झालेली आहे. मात्र, अनेक गुन्हे अद्याप उघडकीस आलेले नाहीत. वसई पोलीस ठाण्यात १७, विरारमध्ये ५०, माणिकपूर पोलीस ठाण्यात ४२, नालासोपार्‍यात ४३, वालीवमध्ये ६१, तुळींजमध्ये ४० आणि अर्नाळा १४ मिळून तालुक्यातील सात पोलीस ठाणंमध्ये गेल्या आठ महिन्यांमध्ये एकूण २६७ घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सर्वाधिक ६१ घरफोडया वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्या आहेत. विरार पोलीस ठाणे दुसर्‍या क्रमांकावर असून नालासोपारा, माणिकपूर, तुळींज या पोलीस ठाण्यांमध्येही घरफोडयांची संख्या लक्षणीय आहे. विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या १२९ घटना घडल्या आहेत. वालीवमध्ये चोरीचे ९१ गुन्हे दाखल झाले आहेत. चोरीत तुळींज पोलीस ठाण्याचा तिसरा क्रमांक असून आठ महिन्यात ८९ गुन्हे नोंदले गेले आहेत. माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ८२, नालासोपार्‍यात ३६, वसईत ३० आणि अर्नाळ्यात २९ गुन्हे घडले आहेत. (लोकमत)

माकणे नवरात्नोत्सवाचे कुपोषितांसाठी १0 हजार
सफाळे : माकणे नवरात्नोत्सव मंडळाने नऊ दिवस विविध समाजप्रबोधनपर कार्यक्रम घेऊन व कुपोषित बालकांच्या आहारासाठी १0 हजाराची मदत करून आदर्श घडविला. यात प्रामुख्याने आजची तरुणाई विविध व्यसनाच्या आहारी जाऊन आपलं उभं आयुष्य संपवित आहे. भरधाव वेगाने मोटार वाहने चालवून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करते तसेच अनेकदा भीषण अपघातांच्या घटनेत मृत्युमुखी पडण्याच्या घटनाही वाढल्याने याबाबत एक विशेष प्रबोधनाचा कार्यक्रम मंडळाने घेतला.  (लोकमत)

वसई : भव्य ग्राहक बाजारपेठेचे आजपासून आयोजन
वसई : देवी वाघेश्‍वरी महिला बचत गट व सुहासिनी महिला बचत गट यांच्या माध्यमातून दिवाळी सणाच्या निमीत्ताने भव्य ग्राहक बाजारपेठेचे आयोजन करण्यात आले आहे.शनी मंदिर फूलारे, वाघोली येथे ग्राहक बाजारपेठेचे उद्घाटन शुक्रवार दिनांक १४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता सामवेदी ब्राम्हण समाजाचे अध्यक्ष मा.श्री. बबनशेट नाईक यांच्या हस्ते होणार आहे. या दिवाळी बाजारपेठेत विविध प्रकारच्या गृहोपयोगी वस्तू , ड्रेस मटेरीयल, इमिटेशन ज्वेलरी, लेदर बॅग्ज, पेंटिंग, वेगवेगळे मसाल्याचे पदार्थ, आकर्षक कंदील तसेच दिवाळी सणासाठी लागणाया फराळासाठी आगाऊ बूकींगचे स्टॉल लावण्यात येणार आहेत.योग्य दरात चांगल्या वस्तू ग्राहकांना एकाच छताखाली उपलब्ध व्हावी म्हणून या भव्य ग्राहक बाजारपेठ भरविण्यात आली असून नागरीकांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती महिला बचत गटातर्फे करण्यात आली आहे. (वार्ताहर,लोकमत)

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home