Sunday, July 17, 2016

फेसबुक व्हाट्सप ट्वीटरवर क्लिकजॅकिंग ( clickjacking )

 फेसबुक व्हाट्सप ट्वीटरवर क्लिकजॅकिंग ( clickjacking )
क्लिकजॅकिंग ( clickjacking )
सध्या क्लिकजॅकिंगने धुमाकूळ घातला आहे. फेसबुक व्हाट्सप ट्वीटरवर वेगवेगळ्या प्रकारे लोक ह्या प्रकाराला बळी पडत आहेत.
तुमचे कुतूहल चाळवणाऱ्या किंवा लक्ष वेधणाऱ्या मथळ्यांच्या बातम्या फोटो पझल्स ऑफर्स ( whatsapp gold, facebook premium, Nikeshoes इत्यादी) सतत फॉरवर्ड केल्या जातात.
ह्या लिंक्स वर क्लिक केल्यावर वेगवेगळी पेजेस उघडतात. त्यात तुम्हाला तुमची वयक्तिक माहिती भरुन किमान ३ किंवा ५ जणाना फॉरवर्ड करावी लागेल त्याशिवाय ऑफर पूर्ण होणार नाही असे सांगितले जाते.
काही ठिकाणी कनेक्ट विथ फेसबुकचा पर्याय असतो. इथे तुम्हाला एक सोपा पर्याय मिळतो. आणि आळशीपणाने तुमच्या फेसबुक अकाउंटची माहिती तुम्ही दुसऱ्याना देऊन टाकता.
फुकट किंवा स्वस्तात मिळणाऱ्या वस्तु किंवा सेवांसाठी लोक स्वतःची माहिती भरुन लिंक्स दुसऱ्याना फॉरवर्ड करतात.
काही वृत्तपत्रे आणि उत्पादक देखील क्लिकजॅकिंगचा वापर करतात.
मिस्टर बीन साठी प्रख्यात असलेले अभिनेता रोवान ॲटकिंसन ह्यांच्या मृत्यूची बातमी क्लिकजॅकिंग वेबसाईटवरुन पसरवली गेली. लाखो लोक ह्या फसवणूकीला बळी पडले.
क्लिकजॅकिंग हे एक प्रकारचे हॅकिंग आहे. तुमची इंटरनेटवर उपव असलेली माहिती चुकीच्या प्रवृत्तीच्या माणसांच्या हातात पडते. हि माहिती आर्थिक घोटाळे, हवाला, दहशतवादी कार्यासाठी वापरली जाऊ शकते.
तुमच्या फोन लॅपटॉप मधला data तुमच्या नकळत वापरला जातो.
===================
क्लिकजॅकिंगपासुन स्वतःचा बचाव कसा कराल ?
वेब ब्राऊजरसाठी ( मोझिला फायरफॉक्स, गूगल क्रोम, ओपेरा , सफारी) Adblock plugin आणि Noscript/NotScript वापरा.
ॲंटिव्हायरसने फोन आणि कॉंप्युटर वेळच्यावेळी स्कॅन करुन घ्या. गरज पडल्यास Antimalwarebyte सारखे मोफत उपलब्ध असलेले सॉफ्टवेअर वापरा.
कुठेहि क्लिक करताना वेबसाईट ॲड्रेस बघा. अनोळखी वेबसाईटचा वापर करु नका. गरजेचे असल्यास त्या वेबसाईटविषयी इंटरनेटवर माहिती मिळवा. google.com वर वेबसाईट चे नाव शोधल्यास पहिल्या ४-५ शोधातच वेबसाईटचा जन्मदिनांक देखील दिसुन येतो.
त्याशिवाय X-Frame-option, web application firewall सारखे उपाय आहेत.
सर्वात महत्वाचे म्हणजे, मोफत वस्तु सेवा रीचार्जला बळी पडुन आपली अमूल्य माहिती इंटरनेटवर देऊ नका. शेवटी नुकसान तुमचेच असणार आहे.
- विक्रांत चौधरी,
माहिती व तंत्रज्ञान सल्लागार.
info@vikrantchaudhari.com

Labels:

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home