Friday, July 22, 2016

महापालिकेच्या परिवहन दरवाढीला प्रवाशांचा विरोध

वसई-विरार महापालिकेच्या परिवहन दरवाढीला प्रवाशांचा विरोध
सर्वसामान्यांच्या पैशावर अधिकाऱ्यांचा फायदा करण्याचा डाव; वसईतील विरोधी पक्षांचा आंदोलनाचा इशारा

वसई-विरार महापालिकेच्या परिवहन विभागाने तिकीटदरात वाढ केल्याने त्याला सर्वस्तरातून विरोध करण्यात आला आहे. ही दरवाढ अधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी असल्याचा आरोप प्रवाशांनी केला. पालिकेकडे अधिकाऱ्यांना द्यायला पैसे आहेत, मात्र सर्वसामान्यांना सेवा देण्यास पैसे नाहीत, अशी टीका विरोधी पक्षांनी केली आहे. ही दरवाढ मागे घेतली नाही, तर ‘भीक मांगो’ आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

वसई-विरार महापालिकेने परिवहन सेवेत प्रत्येक टप्प्यात दोन रुपयांची दरवाढ केली आहे. पालिकेच्या महासभेत त्याला एकमताने मंजुरी देण्यात आली. या भाववाढीला सर्वच पक्षांनी तीव्र विरोध केला आहे. अधिकाऱ्यांच्या वाहनभत्त्यात भरघोस वाढ आणि सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री ही क्रूर चेष्टा असल्याचा आरोप मनसे वसई शहर अध्यक्ष स्वप्निल नर यांनी केला आहे. पालिके च्या बस धूर ओकत असतात. त्या चांगली सेवा देत नाही मग दरवाढ तरी कशाला करता, असा सवाल त्यांनी केला आहे.

सध्या कुठल्याही प्रकारची पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झालेली नाही. मग अचानक ही दरवाढ का केली, असा सवाल भाजप वसई शहर अध्यक्ष मारुती घुटुक डे यांनी केला आहे.

कंपनीला फायदा पोहोचविण्याचा प्रयत्न

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या दरवाढीला जोरदार विरोध करून ३० जुलैपर्यंत दरवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे. पालिकेकडे पैसे नसतील तर आम्ही भीक मागून पैसे जमा करू आणि ते पालिकेला देऊ, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर यांनी सांगितले. परिवहन सेवा चालविणाऱ्या भगीरथ ट्रान्सपोर्ट कंपनीला फायदा पोहोचविण्यासाठीच ही दरवाढ केल्याचा आरोप त्यांनी केला.

स्वस्त दरात बससेवा म्हणून आम्ही प्रवास करत होतो, पण दोन रुपये दरवाढ केल्याने आम्हाला आर्थिक भरुदड बसणार आहे. पेट्रोल-डिझेल दरात वाढ झाली नसतानाही दरवाढ करून प्रवाशांच्या खिशाला कात्री लावण्याचा हा प्रयत्न आहे.

– प्रकाश डायस, प्रवासी
- See more at: http://www.loksatta.com/thane-news/vasai-transport-service-hike-ticket-prices-2-1271257/#sthash.2qYF2cfe.dpuf

Labels: , , , ,

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home