Tuesday, July 19, 2016

मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी, अप्पर वैतरणा, भातसा आणि मध्य वैतरणा धरणांमध्ये पाणीसाठय़ात वाढ

मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी, अप्पर वैतरणा, भातसा आणि मध्य वैतरणा धरणांमध्ये पाणीसाठय़ात वाढ
मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी, अप्पर वैतरणा, भातसा आणि मध्य वैतरणा धरणांमध्ये पाणीसाठय़ात वाढ
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात गेले काही दिवस पावसाने मुक्काम केल्यामुळे जलसाठय़ामध्ये समाधानकारक वाढ झाली आहे. आजघडीला तलावांमध्ये तब्बल ७,२६,३५५ दशलक्ष लिटर साठा उपलब्ध झाला आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत लागू असलेली १५ टक्के पाणीकपात आणखी काही दिवस सुरूच राहणार आहे.
जून आणि जुलैमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी, अप्पर वैतरणा, भातसा आणि मध्य वैतरणा धरणांमध्ये सोमवारी सकाळी ६ वाजता झालेल्या नोंदीनुसार ७,२६,३५५ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध झाले आहे. गेल्या वर्षी याच दिवशी तलावसाठा २,७२,१६१ दशलक्ष लिटर इतका होता.
मुंबईकरांना वर्षभर पुरेसा आणि सुरळीत पाणीपुरवठा करता यावा यासाठी सप्टेंबरअखेरीस तलावांमध्ये १४ लाख दशलक्ष लिटर पाणी असणे गरजेचे आहे. सध्या पावसाने तलाव क्षेत्रात मुक्काम ठोकला आहे. मात्र भविष्यातील तरतूद म्हणून आताच पाणीकपात मागे घेणे योग्य ठरणार नाही, असे पालिकेचे म्हणणे आहे. - See more at: http://www.loksatta.com/mumbai-news/water-levels-in-mumbai-dams-increased-1269690/#sthash.5NdHQC2G.dpuf

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home