Wednesday, July 13, 2016

'ती' मुंबईची टगबोट

'ती' मुंबईची टगबोट
हितेन नाईक / शौकत शेख■ पालघर/ डहाणू
वाढवणच्या किनारपट्टीलगत संशयास्पदरित्या आढळलेल्या बोटीला तटरक्षक दलाने जी.पी.एस १९.५३ व ७२.३६ या लोकेशनवरून ताब्यात घेतले असून ती मुंबईतील ग्रोमोअर इम्पेक्स या भारतीय कंपनीच्या मालकीची आहे, ती टग बोट(बंद पडलेले/अपघातग्रस्त जहाज, बोट किनार्‍यापर्यंत ओढून आणण्यासाठी वापरले जाणारे जहाज) असून तिच्यावर चार खलाशी होते व ती हजीरायेथून मुंबई बंदराच्या दिशेने १0 जुलै रोजी निघाली होती परंतु समुद्रात वादळ निर्माण झाल्याने ती भरकटत होती तशाच अवस्थेत ती वाढवण नजीकच्या सागरी क्षेत्रात आली असता हे खलाशी नांगर टाकू पाहत होते. परंतु त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही व ती पुन्हा भरकटली, असे तटरक्षक दलाने स्पष्ट केले आहे. या दलाच्या पश्‍चिम विभागीय मुख्यालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की तुफानी वादळ वारे, पाऊस असतानाही स्थानिक रहिवासी, पोलिस यंत्रणा आणि तटरक्षक दल यांनी याबाबत जी जागरूकता दाखवली ती महत्वाची आणि उल्लेखनीय अशी आहे.
डहाणू जवळील वाढवण-गुंगवाडा गावाच्या समोरील समुद्रात एक मोठी बोट उभी असल्याचे मच्छिमारांच्या लक्षात येताच त्यांच्या मनात २६/११ च्या पाकिस्तानी अतिरेकी हल्ल्याच्या आठवणी जाग्या झाल्या आणि ते जागरूक झालेत मच्छिमारीसाठी बंदी असताना व समुद्र उधाणलेला असताना ही बोट कुणाची व आली कु ठून व कशासाठी असे प्रश्न त्यांना पडले व त्यांनी तात्काळ पोलीसांना ही माहिती दिली. ही बोट हळू हळू मुंबईच्या दिशेने सरकत असतांना मंगळवारी पहाटे ६ वाजता वडराई गावाच्या समोरील समुद्रात उभी असल्याची माहिती संजय मेहेर या मच्छिमाराने सातपाटी सागरी पो.स्टे. चे सहा. पो.नि. किशोर शिंदे यांना दिली. त्यानी तात्काळ ती जिल्हा अधिक्षक राउत यांना कळविली ती त्यांनी कोस्टगार्ड विभाग वरळी (मुंबई), कस्टम कार्यालय तारापूर, मेरीटाईम बोर्ड सातपाटीच्या कार्यालयाला कळविली त्यानंतर बोटीचा शोध घेण्यासाठी हेलीकॉप्टर समुद्रात पाठविले गेले . मंगळवारी झाले मिशन इन्व्हेस्टीगेशन फत्ते, यंत्रणांची तत्परता ठरली प्रशंसनीय मंगळवारी दुपारी १ वाजता इंडियन कोस्टगार्डचे स्टेशन कमांडर चड्डा यांनी शोध घेणारी बोट समुद्रात जी.पी.एस. नंबर १९.७३ व ७२.३६ या २ नॉटीकल लोकेशानवरून ताब्यात घेतली असून तिचा रजिस्ट्रेशन नंबर आय व्ही-२८९ असल्याचेही कळविले. या बोटीत असलेल्या चार खलाशांना कोस्टगार्डने ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी करण्यात येत असल्याचे सांगितले. वाढवणच्या समोर दिसणारी बोटीचा तपास करतांना कोस्टगार्डला वादळ व मुसळधार पावसामुळे खूप अडचणीचे ठरत होते. त्यामुळे सोमवारी या बोटीचा तपास लाऊन ती आपल्या ताब्यात घेण्यास कोस्टगार्ड अपयशी ठरले होते.

Labels: , , ,

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home