Tuesday, July 19, 2016

लोकल रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत

लोकल रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत
मुंबई | July 19, 2016 11:18 AM

मुंबई आणि उपनगरात रात्रभर झालेल्या पावसामुळे मंगळवारी लोकल रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल दहा ते पंधरा मिनिटे उशिरा धावत असून हार्बर मार्गावर कुर्लाकडे धावणाऱया लोकलची गती देखील धीमी झाली आहे. हार्बर मार्गावरील लोकल तब्बल अर्धा तास उशिराने धावत आहे. दरम्यान, मध्य रेल्वे सेवा देखील कोलमडल्याचे चित्र दिसत आहे. सकाळपासून मुंबईत पावसाची रिमझिम सुरुच आहे. पावसाचे पाणी जागोजागी साचले आहे, मात्र रस्ते वाहतूकीवर पावसाचा फारसा परिणाम झालेला नाही. रेल्वे वाहतूक कोलमडल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असून रेल्वे स्थानकावरील गर्दीत अधिक भर होत असल्याचे चित्र पहावयास मिळते आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास प्रवाशांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. - See more at: http://www.loksatta.com/mumbai-news/local-trains-delayed-today-1269785/#sthash.wqQELZo3.dpuf

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home