Tuesday, July 19, 2016

अवैध बांधकामप्रकरणी नालासोपारामध्ये सात बिल्डर अटकेत

अवैध बांधकामप्रकरणी नालासोपारामध्ये सात बिल्डर अटकेत

नालासोपारा पश्चिमेच्या बस डेपोजवळ सव्‍‌र्हे क्रमांक ४११ आहे. या ठिकाणी मोठय़ा इमारतींचे संकुल उभारण्यात आले होते. परंतु बिल्डरांनी सिडको प्रशासन, महापालिकेच्या बोगस विकास परवानग्या तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या सह्या असलेल्या बोगस बिनशेतीे परवानग्या बनवून या इमारती बांधल्या होत्या. बँकांनीही या इमारतीसाठी ग्राहकांना कर्ज दिले होते. -
महापालिकेत खास कक्ष
वसई-विरार शहरात घरे घेण्यापूर्वी नागरिकांनी पालिकेच्या मुख्यालयात जाऊन संबंधित इमारत अधिकृत आहे का याची खात्री करावी, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. त्यासाठी नगररचना विभागात खास कक्ष उभारण्यात आला आहे. अवघ्या काही मिनिटात संबंधित इमारतीची माहिती मिळू शकते. याशिवाय पालिकेच्या संकेतस्थळावरही सव्‍‌र्हे क्रमांक टाकला की अधिकृत इमरतींची माहिती मिळू शकेल. पालिकेने अनधिकृ त इमारतींच्या प्रवेशद्वारावर इमारत अनधिकृत असल्याचे फलक लावण्यासही सुरुवात केली आहे.

हे बिल्डर अटकेत
* विजय नितोरे (साईदर्शन कन्स्ट्रक्शन)
* सुभाष माने (नवलादेवीे एन्टप्राइजेस)
* दुर्गा बी जगतसिंग (नवदुर्गा बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स)
* उदय चव्हाण (मनीषा एण्टरप्राइझेस)
* अखिलेश यादव (ओम साई बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स)
* रूपेश वराडकर (साईशक्ती एण्टरप्राइझेस)
* सुनील कोळंबे (भवानी कन्स्ट्रक्शन्स)

- See more at: http://www.loksatta.com/thane-news/seven-builder-of-nalasopara-arrested-for-building-illegal-buildings-1269541/#sthash.CEo0LZ0I.dpuf

Labels: , , , ,

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home