Monday, July 18, 2016

वसईत पोलीस विभागासाठी जनसंपर्क अधिकारी

 वसईत पोलीस विभागासाठी जनसंपर्क अधिकारी

वसई: तालुक्यात दररोज घडणार्‍या गुन्हेगारी घटनांची सविस्तर माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी वसई पोलीस उपविभागात स्वतंत्र जनसंपर्क अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात आली आहे.
वसई तालुक्यात घडणार्‍या गुन्हेगारी घटनांचे वृत्तसंकलन करताना पत्रकारांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, पालघर पोलीस मुख्यालयातून त्रोटक स्वरुपाच्या प्राप्त होणार्‍या प्रेसनोटमधून अगदीच संक्षिप्त माहिती उपलब्ध होत असल्याने वसई तालुक्यातील सातही पोलीस ठाण्यांसाठी वेगळा जनसंपर्क अधिकारी नेमावा, अशी मागणी दोन आठवड्यांपूर्वी वसई विरार महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिलराज रोकडे यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या शिष्टमंडळातर्फे वसईचे अप्पर पोलीस अधीक्षक योगेश कुमार आणि पोलीस उपअधीक्षक अनिल आकडे यांच्याकडे स्वतंत्र भेटीत केली होती. त्या अनुषंगाने वसई पोलीस उपविभागात स्वतंत्र जनसंपर्क अधिकारी म्हणून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक वसई कक्षाचे पोलीस उपनिरीक्षक रणजित शिरसाठ यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे पोलीस प्रशासनाने पत्रकार संघाला पत्राने कळवण्यात आले आहे. (प्रतिनिधी) वसई तालुक्यातील वसई, विरार, नालासोपारा, तुळिंज, वालीव व अर्नाळा (सागरी) या सातही पोलीस ठाण्यांत गुन्हेगारीच्या चोरी, दरोडा, खून, फसवणूक,आत्महत्या, घरफोडी, बलात्कार, चेन स्नॅचिंग, मुलींची विक्री, अपहरण, बेपत्ता, अपघात या व अशा अनेक प्रकारच्या घटना घडतच असतात. या घटनांच्या सविस्तर माहितीसीठी पोलीस स्टेशनला गेलेल्या पत्रकारांना पोलिसांकडून सहकार्य मिळत नव्हते. अनेकदा तपास अधिकारी भेटत नाहीत, दुसरे कोणी माहिती देत नाही, घटना घडली असतानाही ठाणे अंमलदार एम.आय.आर, एन.सी. बुकची पानं ही न पलटवता सगळं शांत असल्याचे सांगून मोकळे होतात. त्यावर पत्रकाराने अमुक घटना घडली आहे, त्याची माहिती द्या, असे सांगितल्यानंतरच त्याला माहिती दिली जाते.

महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रूम व्हाटसप क्रमांक

POLICE SETUP & CONTACT NUMBERS

Labels: , , , , , ,

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home