Wednesday, July 27, 2016

वसई, विरार, नालासोपारा : दर तीन मिनिटाला हवी लोकल

 वसई, विरार, नालासोपारा : दर तीन मिनिटाला हवी लोकल
वसई पट्ट्यातील रेल्वे प्रवाशांच्या समस्या मांडण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मयुरेश उमाकांत वाघ यांनी नवी दिल्ली येथे नुकतीच केंद्रीय रेल्वेमंत्नी सुरेश प्रभू यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी रेल्वे प्रवाशांच्या मागण्यांबाबतचे निवेदन त्यांना दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, बोरीवली ते डहाणू या पट्ट्याची लोकसंख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे प्रवासी संख्याही वाढत आहे. ट्रेनमधील गर्दी वाढती असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वेकडून उपाययोजना होणे आवश्यक आहेत. दर तीन मिनिटाला एक ट्रेन असायला हवी. वसई, विरार, नालासोपारा ही सर्वाधिक गर्दीची स्टेशन्स असून या स्टेशनचे नूतनीकरण करावे. तसेच त्यात सरकते जिने लावण्यात यावेत, सर्व स्टेशनांवर नवीन तिकीट खिडक्या, सुपर डिलक्स टॉयलेट,नवीन पादचारी पूल, प्रवाशांना विनामूल्य वायफाय सेवा अशी कामे वसई-विरारच्या रेल्वे स्टेशनांवर व्हावीत. रेल्वे स्टेशनांचे परिसर अतिक्र मण मुक्त असावेत, विरार ते डहाणूपर्यंतच्या रेल्वे स्टेशनांमध्ये सीसीटीव्ही लावावेत. लांब पल्ल्यांच्या महत्त्वाच्या गाड्यांना वसई-विरारमध्ये थांबा द्यावा. त्यांनी ते पुढील कार्यवाहीसाठी पाठवले. या प्रयत्नानंतर तरी बदल होतो का हे पाहणे औत्सुक्याचे ठेरेल. (प्रतिनिधी)

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home