Friday, July 29, 2016

वसई-विरार, डहाणू, पालघर सागरी आयुक्तालय बारगळले

वसई-विरार, डहाणू, पालघर  सागरी आयुक्तालय बारगळले

वसई : मीरा-भाईंदर, उत्तन, वसई, पालघर, डहाणू व झाई या किनारी भागात वाढलेल्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी तसेच समुद्रामार्गे अतिरेक्यांपासून होणर्‍या धोक्याबाबत सतर्क राहण्यासाठी या पट्ट्याकरीता सागरी पोलीस आयुक्तालयाची असलेली मागणी जिल्हा विभाजनामुळे सरकारने अमान्य केली आहे.

जनता दल (सेक्युलर) , निर्भय जन संस्था या मागणीसाठी १९९४ पासून सातत्याने शासनाकडे करीत आली आहे. शासनाकडूनही सागरी आयुक्तालयाबाबत नेहमीच सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. तर २१ डिसेंबर २0१२ रोजी हा प्रस्ताव मंजूरीसाठी पोलीस महासंचालकांकडून शासनास सादर करण्यात आला होता. अंतिम स्तरावर प्रकरण असताना आता ठाणे जिल्ह्याचे विभाजन झाल्याने हा प्रस्ताव बारगळल्याचे कळवण्यात आले असल्याची माहिती मनवेल तुस्कानो यांनी दिली.

१३-१४ लाख लोकवस्ती असलेल्या मिरा-भाईंदरसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन होत असून त्यासाठी जागा निश्‍चित करण्यात आली आहे, असे असताना मागील २0-२२ वर्षे मागणी करुनसुध्दा शासनाकडे सादर झालेला प्रस्ताव गुंडाळण्यात आला.
पोलीस महासंचालक दिक्षित वसईत कॅथॉलिक बँकेच्या कार्यक्रमासाठी आले होते तेव्हा त्यांना भेटून त्यांचे लक्ष आम्ही सागरी आयुक्तालयाकडे वेधले होते व त्यांनी सकारात्मक प्रतिसादही दर्शविला होता, अशी माहिती त्यांनी दिली.

या नागरीकरण झालेल्या पट्ट्यात गुन्हेगारीचे, विशेषत लैंगिक गुन्ह्याचे प्रमाण वाढत चालले आहे. वसई विभागात पोलीस दल आजच कमी पडत आहे. तसेच राष्ट्रीय सुरक्षेसाठी किनार्‍यावर दक्ष राहणे अत्यंत गरजेचे आहे.
तरी आपण शासनाकडे विशेष प्रयत्न करुन आधीच्या प्रस्तावाप्रमाणे मीरा-भाईंदर ते डहाणू पर्यंत किंवा मीरा-भाईंदर वेगळे करायचे असल्यास उत्तन-वसई-पालघर ते डहाणू-झाई पर्यंतच्या संपूर्ण सागरी पट्ट्यासाठी सागरी आयुक्तालय स्थापन करावे अशी आग्रही मागणी जनता दल व निर्भय जन संस्थेने केली आहे. याबाबत पालकमंत्री विष्णू सवरा यांनी पुढाकार घेऊन हा प्रस्ताव साकारावा अशी जिल्ह्यातील जनतेची अपेक्षा आहे. (प्रतिनिधी,Lokmat)

वसई-विरारची लोकसंख्या १८ लाखांच्या घरात आहे तरी हा प्रस्ताव रद्द करण्यात आला हे, दुर्दैवी आहे. वसई, पालघर, बोईसर, डहाणू या भागाची लोकवस्ती प्रचंड वाढली असून गुन्ह्याचे प्रमाणही वाढले आहे. याशिवाय सागरी किनारा असुरक्षित असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. तरीसुध्दा शासनाचे किनारी भागावर लक्ष नाही असे स्पष्ट होत असल्याचा तुस्कानोंचा दावा आहे. वसई तालुक्यात गुन्हेगारीचे प्रमाण रोज वाढत असल्याचे दिसत आहे.

Labels: , ,

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home