Wednesday, July 27, 2016

पालघर: श्रमजीवी पुन्हा कान पिळणार , पिंडदानानंतर आता रवाळ

पालघर: श्रमजीवी पुन्हा कान पिळणार , पिंडदानानंतर आता रवाळ
 बोईसर : जिल्हयाच्या निर्मितीला एक ऑगस्ट रोजी दोन वष्रे पूर्ण होत आले तरी अनेक कार्यालयाचे कामकाज अजुनही ठाणे जिल्हयातून होत असून विविध विभागांतील अनेक पदे रिक्त असून सरकार व प्रशासन ढीम्म असल्याचा आरोप श्रमजीवीने केला आहे. सरकार व प्रशासनाला सुबुध्दी देण्याकरीता येत्या २ ऑगस्ट रोजी पालघर जिल्हयाच्या प्रत्येक तालुक्यामध्ये श्रमजीवी संघटनेतर्फे रवाळचे आयोजन करण्यात येणार असून झोपलेल्या सरकार व प्रशासनाचे पुन्हा कान पिळणार आहे.
रविवारी येथील हॉटेल सिल्व्हर अँव्हेन्यूमध्ये श्रमजीवी संघटनेतर्फे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी अध्यक्ष विवेक पंडीत, महाराष्ट्र सचिव विजय जाधव, पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड आणि पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी नवनिर्मित पालघर जिल्हयातील आरोग्य, कुपोषण, शिक्षण, आo्रमशाळा, रोजगार हमी योजना, जिल्हयातील रस्ते, ई-टेंडरींग आदिवासी भागातील सोयी-सुविधा, स्थलांतरीत न झालेली कार्यालये, रिक्त असलेली पदे तसेच प्रशासनाच्या त्रुटीबाबतचे वास्तव मांडले.
रवाळ आयोजनाबाबत माहिती देताना विजय जाधव यांनी सांगितले की, आम्ही श्रमजीवी संघटनेतर्फे टोकाची आंदोलने करून बघीतली, परंतु सरकारने गेंडयाची कातडी परिधान केल्यामुळे फारसे यश मिळले नाही. म्हणून सरकारला सुबुध्दी देण्याकरीता रवाळच्या माध्यमातून साकडे घालणार आहोत, हे सर्व प्रतिकात्मक असल्योचेही त्यांनी सांगितले. (वार्ताहर)
पूर्वी डॉक्टर कमी प्रमाणात होते त्या वेळी रवाळच्या माध्यमातून भगत तयार करून तो काही औषधे किंवा वनौषधे द्यायचा त्यात एक तारपावाला असतो, झेंडूचे फुल घेऊन तारपा वाजवण्यात येतो. त्या वेळी फुल ठेवून देवाला कौल लावला जातो. पालघर जिल्हयाचा विकास कधी होईल असे देवा तू तरी आता सांग असा औपरोधीक सवाल या रवाळमध्ये प्रतिकात्मक पध्दतीने विचारण्यात येणार आहे.
विवेक पंडीत यांनी शक्य आहे तेथे प्रशासनाला सहकार्य व आवश्यक आहे तेथे संघर्ष अशी श्रमजीवी संघटनेची परंपरा व भूमिका असून जिल्यातील काही अधिकारी चांगले काम करतात परंतु व्यवस्थेतील त्रुटीमुळे अडचणी येत आहेत.
त्यांनी जिल्हयातील आरोग्य, कुपोषण, शिक्षण, आश्रमशाळा, रोजगार हमी योजनेतील त्रुटी, ई-टेंडरींग, ट्रान्सपरन्सी, रस्ते टेंडर व ठेकेदार त्यांची टक्केवारी आदीबाबत विस्तृत माहिती देऊन प्रत्येक विभागाच्या कामाचे शवविच्छेदन करून संताप व्यक्त केला.
जर रवाळच्या आयोजनानंतरही सरकार व प्रशासन जागे न झाल्यास जिल्हयातील गोर-गरीब आदिवासी व सर्वसाधारण नागरीकांकरीता आंदोलन उभे करण्याचा इशारा दिला.

Labels:

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home