Thursday, July 14, 2016

श्रीक्षेत्र निर्मळ येथील वाहतूक कोंडीवरील कारवाई!!
श्रीक्षेत्र निर्मळ येथील होणाऱ्या वाहतूक कोंडीवरील कारवाईसाठी आयुक्त श्री सतीश लोखंडे ह्यांचे अभिनंदन !!

विरार नालासोपारा व वसईला जोडणाऱ्या ह्या प्रमुख रस्त्याच्या निर्मळ नाक्यावर वाहतूक कोंडी कायमची पुजली आहे. अर्नाळा उंबरगोठण नंदाखाल वटार नाळे वाघोली कळंब राजोडी मर्देस निर्मळ ह्या गावातील लोकांसाठी अर्नाळा वसई रस्ता हा एकमेव मार्ग आहे.

मुलांच्या शाळा, नोकरदारांची कामावर जायची घाई, स्थानिक शेतकरी व व्यावसायिकांची बाजारात लवकर पोहचुन रोजीरोटी कमवायची धडपड ह्या सर्वांवर निर्मळ नाक्यावरील वाहतुक कोंडीने विरजण पडत असते.

आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयानंतर काही अतिरिक्त बांधकाम जमिनदोस्त करुन काही प्रमाणात रस्ता मोकळा करण्यात आला आहे.
परंतु ह्याच नाक्यावरील महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या बांधकामास अभय मिळाल्याने जनतेकडून सदर कारवाईवर प्रशचिन्ह देखील उमटले आहे.

 महाराष्ट्र सरकारने वसई विरार शहर महानगरपालिकेतुन वगळलेल्या वसई तालुक्यातील गावांमध्ये होणाऱ्या वाहतुक कोंडीकडे लक्ष देणारे महानगरपालिकेचे आयुक्त शहरातील वाहतुक कोंडीकडे लक्ष का देत नाहीत? जसे विरार पूर्व व पश्चिम, नालासोपारा पूर्व व पश्चिम तसेच नावघर-माणिकपूर येथील जनतेलाही आयुक्तां कडून फार अपेक्षा आहे.

- समीर वर्तक, वाघोली.

                              

Labels: , , , , , ,

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home