Tuesday, July 12, 2016

विरार-वसईमधील रस्त्यांची चाळण

 विरार-वसईमधील रस्त्यांची चाळण
वसई: पावसाच तडाख्याने वसई विरार परिसरातील अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. अनेक मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना त्रासांचा सामना करावा लागत आहे.
विरार स्टेशन ते मनवेलपाडा तलावापर्यंतच मुख्य रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. तसेच विरार पूर्वेकडील जीवदानी रस्ता खडडामय बनला आहे. विरार शहरात भुयारी गटार योजनेसाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. मात्र, त्यासाठी खोदण्यात आलेले खड्डे तसेच असल्याने मुख्य रस्त्यांसह सर्वच रस्ते खड्डेमय बनले आहेत. नालासोपारा शहरातील सेंट्रल पार्कला जाणार्‍या मुख्य रस्त्यावर खड्डे पडले आहेत. वसई रेल्वे उड्डाणपूलाला जोडणार्‍या रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. सत्पाळा भंडार आळी समोरील रस्ता तसेच जि.प. शाळेपुढील रस्ता डांबरीकरण न करता ६ महिन्यांपासून तसाच ठेवण्यात आला आहे. सत्पाळा राजोडी रस्ता रुंदीकरण होऊन एक वर्ष झाले. गटाराचें काम बाकी होते म्हणून तेवढय़ा भागाचे डांबरीकरण केले नव्हते. त्यामुळे पावसाळ्यात तेवढय़ा ठिकाणी चिखल होऊन अपघात होऊ लागले आहेत. (प्रतिनिधी)

Labels: , , , , ,

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home