Friday, July 1, 2016

नालासोपारा (वसई) : मॉडेलिंगच्या अमिषाने दोन तरुणींचे शोषणनालासोपारा, वसई :

mms scandal blackmail,मॉडेलिंग नालासोपारा वसई

फेसबुकवर मॉडेलिंगचे आमिष दाखवून लैंगिक शोषण करुन पैसे उकळल्याची तक्रार एका अल्पवयीन मुलीसह दोघींनी केल्यानंतर तुळींज पोलिसांनी एका तरुणा विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. चौकशीमध्ये त्याने अनेक तरुणींची फसवणूक केल्याचे उजेडात आले आहे.

रिंकू यादव (२५) असे तरुणाचे नाव असून तो नालासोपारा येथील संतोष भुवन येथे राहणारा बेरोजगार आहे. त्याचा सिनेसृष्टीशी कोणताही संबंध नाही. रिंकूने फेसबुकवर एक बनावट खाते उघडले होते. त्याने सिने सृष्टीत काम करण्याची अथवा मॉडेलिंगची आवड असणाऱ्यां युवतींना संपर्क साधण्याचे आवाहन करून स्वत:चा मोबाईल नंबर दिला होता.

तसेच काही मुलींची बनावट खाती उघडून त्यात रिंकूमुळे आपणाला मॉडेलिंंग आणि चित्रपटात कामे मिळाल्याची माहिती दिली होती. त्याला भुलून नालासोपाऱ्यातील दोन मुली त्याच्या जाळ्यात फसल्या होत्या. या दोघींनी बुधवारी रात्री तुळींज पोलीस ठाण्यात रिंकू विरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. यातील एक मुलगी अल्पवयीन आहे. अधिक तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)

रिंकूने आपणाला फोटोशूट करण्याच्या बहाण्याने कळंब येथील एका रिसॉर्टमध्ये नेले. त्याठिकाणी आपले अश्लिल फोटो काढण्यात आले. त्यानंतर रिंकूने ते फोटो सोशल नेटवर्कींग साईटवर टाकून बदनामी करीन अशी धमकी देऊन बलात्कार केला. त्यानंतर हे प्रकरण दाबण्यासाठी मारण्याची धमकी देऊन आपणा कडून ५० हजार रुपये उकळल्याची फिर्याद एका १९ वर्षीय तरुणीने दिली आहे. 

>फोटो शूटच्या बहाण्याने ओढले जाळ्यात
रिंकूने फसवणूक करून बलात्कार केल्याची दुसरी एक तक्रार बुधवारी एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने दिल्या नंतर रिंकू विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून यादववर पोक्सो (बाल लैंगिक शोषण विरोधीकायदा) नुसार ही कारवाई केली जाणार आहे. यादव कडून पोलिसांनी मुलींचे काढलेले अश्लिल फोटो जप्त केले आहेत. यादवच्या जाळ्यात अनेक मुली फसल्या असल्याचा संशय असून त्यांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Labels: , , , , ,

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home