Wednesday, July 13, 2016

पालघर जिल्ह्यात मोर्चे, उपोषण, धरणे, आंदोलन व रास्ता रोको मनाई आदेश

पालघर जिल्ह्यात मोर्चे, उपोषण, धरणे, आंदोलन व रास्ता रोको मनाई आदेश
पालघर :

 पालघर जिल्ह्यात दि. १९ जुलै २0१६ रोजी गुरू पौर्णिमा सणाच्यानिमित्ताने शाळा महाविद्यालये धार्मिक स्थळांच्या ठिकाणी विविध कार्यक्र माचे आयोजन करण्यात येते. तसेच जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष व संघटना यांचेकडून त्यांचे विविध मागण्यांकरिता मोर्चे, उपोषण, धरणे, आंदोलन व रास्ता रोको करण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेवून पोलीस अधिक्षक पालघर यांचे कार्यकक्षेतील सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक ११ ते २४ जुलैपर्यंत जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने मनाई आदेश लागू केला आहे.

शस्त्रे, तलवारी, भाले, दंडे, सोटे, बंदूका, सुरे, लाठया अथवा काठया अथवा शारीरीक इजा करण्यासाठी वापरता येईल, कोणताही घातक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा क्षेपणास्त्ने किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, व्यक्तीचे प्रेत किंवा आकृती, किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक रितीने घोषणा देणे किंवा गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे, ज्यामुळे सभ्यता अगर निती यास धक्का पोहचेल अशा प्रकारची भाषणे तत्त्वे, हावभाव करणे, सोंग आणणे, चित्ने, चिन्हे, फलक किंवा कोणतीही जिन्नस, वस्तू तयार करणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

हा आदेश प्रेतयात्ना, लग्नाची मिरवणूक तसेच सक्षम प्राधिकार्‍यांच्या लेखी परवानग्या घेऊन काढलेल्या मिरवणूकीस लागू असणार नाही. सरकारच्या नोकरांना वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य पालन करणार्‍यांना अपंगत्वामुळे काठी बाळगणे आवश्यक आहे अशांना लागू असणार नाही.

Labels: , , , , , , , , ,

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home