Monday, July 18, 2016

शैक्षणिक साहित्याच्या दुकानांवर कारवाई

 शैक्षणिक साहित्याच्या दुकानांवर कारवाई
मुंबई - शैक्षणिक साहित्याची विक्री छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करणाऱ्या राज्यातील सुमारे 253 दुकानांवर वैधमापनशास्त्र यंत्रणेने खटले दाखल केले आहेत. राज्यात एकाच दिवशी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. मुंबईतील सर्वाधिक 16 दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे.

शैक्षणिक साहित्याची विक्री छापील किमतीपेक्षा जास्त दराने करून ग्राहकांची लूट होत असल्याच्या तक्रारी वैधमापनशास्त्र विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने वैधमापनशास्त्र विभागाचे नियंत्रक, विशेष पोलिस महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर विशेष मोहिमेद्वारे तपासणी करण्यात आली. या तपासणीत दोषी आढळलेल्या एकूण 253 प्रकरणांपैकी 10 प्रकरणे ही छापील किमतीपेक्षा जास्त दराने साहित्याची विक्री केल्याबद्दल, 230 प्रकरणे अवेष्टित (पॅकबंद) स्वरूपाच्या शालेय वस्तूंवर विहित माहिती न दिल्याबद्दल आणि आठप्रकरणी माहितीची खाडाखोड केल्याबद्दल खटले दाखल करण्यात आले आहेत. तसेच दोन दुकानांनी छापील माहितीपेक्षा कमी प्रमाणात वस्तू दिल्याप्रकरणी आणि तीन दुकानांनी वजने मापांची विहित वेळेत फेरपडताळणी व मुद्रांकन न केल्याबद्दल तक्रार नोंदविण्यात आली आहे.
खटले दाखल केलेल्या दुकानांची यादी पुढीलप्रमाणे- मुंबई विभाग - मे. स्मिता स्टेशनरी अँड झेरॉक्‍स, परेल, मुंबई, मे. साईकृपा स्टेशनरी, वरळी, मुंबई, मे. लाइफ एंटरप्रायझेस, माहीम, मुंबई, मे. जयहिंद स्टेशनरी, रानडे रोड, दादर, मुंबई, मे. आयडियल स्टार, दादर, मे.आर.के. ट्रेडर्स, सुतार चाळ, मुंबई-2, मे. ऋषभ स्टेशनरी, फोर्ट, मुंबई, मे. राज एजन्सी, काळा चौकी, मुंबई, मे. अनिल कटलरी, सरदार नगर, सायन, मे. ए टू झेड स्टेशनरी, मुंबई सेंट्रल, मे. स्कॉलर बुक डेपो, सांताक्रूझ, मुंबई, मे. रॉयल स्टेशनरी, सांताक्रूझ, मुंबई, मे. नॉव्हेल्टी स्टेशनरी मार्ट, अंधेरी, मुंबई, मे. ए टू झेड स्टेशनरी, अंधेरी, मुंबई, मे. न्यू झेरॉक्‍स पॉईंट, एस. व्ही. रोड, अंधेरी, मुंबई, मे. हरिसन नॉव्हेल्टी, जोगेश्वरी, मुंबई. या शालेय साहित्याची विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करून खटले दाखल करण्यात आले.

शालेय साहित्याची विक्री ही छापील किमतीपेक्षा जादा दराने होत असल्याचे आढळून आल्यास ग्राहकांनी क्षेत्रीय वैधमापनशास्त्र कार्यालयाशी अथवा 022-2288666 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा अथवा dclmms@yahoo.in, dclmms_complaints@yahoo.com अथवा व्हॉट्‌सऍप क्रमांक 9869691666 अथवा legal metrology Maharashtra consumer grievances या फेसबुक पेजवर तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन वैधमापनशास्त्र यंत्रणेचे नियंत्रक गुप्ता यांनी केले आहे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home