Monday, July 18, 2016

तलासरी पंचायत समिती आयएसओ

तलासरी पंचायत समिती आयएसओ
तलासरी: तलासरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहुल धूम हे तलासरीत रुजू होताच पंचायत समितीच्या कामकाजात शिस्तबद्धता आणून कामकाजात सुधारणा घडवून आणल्या आहेत. त्यांच्या या तीन वर्षांच्या कामकाजाचा लेखाजोखा पाहून तलासरी पंचायत समितीला 'आयएसओ ९00१ - २0१५' हे प्रमाणपत्न देण्यात आले आहे.
दिल्ली येथील डीएमजीक्यूएमएस यांनी तलासरी पंचायत समितीच्या कामकाजाची तसेच सेवा, इमारती, प्रशासन, प्रामुख्याने स्वच्छता यांची पाहणी करून तलासरी पंचायत समितीला हे प्रमाणपत्न दिले.
आयएसआचा दर्जा देणार्‍या कंपनीचे व्यवस्थापक प्रमोद पाटील यांनी गटविकास अधिकारी राहुल धूम यांना प्रमाणपत्र दिले. तालुक्यात या घटनेचा आनंद आहे. (वार्ताहर)

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home