Thursday, July 21, 2016

हेल्मेट नसेल तर दुचाकीस्वारांना पेट्रोल मिळणार नाही, परिवहन मंत्र्यांची घोषणा

हेल्मेट नसेल तर दुचाकीस्वारांना पेट्रोल मिळणार नाही, परिवहन मंत्र्यांची घोषणा
दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा, यासाठी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी गुरुवारी एक महत्त्वाची घोषणा विधान परिषदेत केली. यापुढे दुचाकी चालवणाऱ्यांकडे हेल्मेट नसेल तर त्यांना पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळणार नाही, असे दिवाकर रावते यांनी विधान परिषदेत सांगितले. दुचाकी चालवणाऱ्याकडे आणि त्याच्या मागे बसलेल्या प्रवाशाकडे हेल्मेट असले पाहिजे आणि ते त्यांनी घातलेले पाहिजे, तरच त्यांना पेट्रोल पंपावर पेट्रोल देण्यात येईल, असे त्यांनी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
हेल्मेट वापरण्यास दुचाकीस्वारांना प्रवृत्त करण्यासाठी राज्य सरकारने हा नियम केला आहे. गेल्या महिन्यात तेलंगणातील अदिलाबाद जिल्ह्यात प्रशासनाकडून हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांना पेट्रोल न देण्याचे आदेश जारी करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर आता दिवाकर रावते यांनीही हेल्मेट असलेल्या दुचाकीस्वारांनाच पेट्रोल देण्याचा नियम केला. पेट्रोल पंपावर दुचाकीस्वार आणि त्याचा सहप्रवासी या दोघांकडे हेल्मेट असेल, तरच त्याला पेट्रोल देण्यात यावे, अशी सूचना करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मोटारवाहन कायद्याप्रमाणे राज्यात दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट बंधनकारक आहे. विनाहेल्मेट गाडी चालवणे नियमभंग असतानाही अनेक दुचाकीस्वार हेल्मेट घालत नाहीत. हेल्मेटसक्तीला दुचाकीस्वारांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे आता पेट्रोल विकत घेण्यासाठी हेल्मेटसक्ती केल्याचा काय परिणाम होतो, हे लवकरच स्पष्ट होईल. - See more at: http://www.loksatta.com/mumbai-news/now-helmet-is-compulsory-to-purchase-petrol-in-maharashtra-1270994/#sthash.6FQNvNo6.dpuf

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home