Sunday, July 24, 2016

वसईत दोन मटकाकिंग अटकेत

 वसईत दोन मटकाकिंग अटकेत
वसई : वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीत नर्सरी बाग घाटे आळी येथे चालणार्‍या जुगार-मटक्याच्या अड्यावर धाड टाकून पोलिसांनी दोघांना अटक केली. विशेष म्हणजे ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक विभागाने केल्याने स्थानिक पोलिसांकडे संशयाने पाहिले जात आहे.
प्रल्हाद चव्हाण आणि दीपक राठोड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून मालक शाम लक्ष्मण चव्हाण मात्र फरार झाला आहे. वसई विरार परिसरात अनेक ठिकाणी क्लबच्या नावाखाली मटका-जुगार तेजीत असून त्यावर स्थानिक पोलीस कोणतीच कारवाई करीत नसल्याच्या तक्रारी आहेत. अनैतिक मानवी वाहतूक विभागाने केलेली ही वसईतील गेल्या काही वर्षांतील पहिली कारवाई मानली जाते. याठिकाणी क्लबच्या नावाखाली जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश निकम यांना मिळाल्यावरून त्यांनी छापा टाकला. यावेळी मुंबई जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार प्रतिबंधित असलेल्या जुगाराचा खेळ सुरु असल्याचे आढळून आले. आरोपींकडून जुगाराचे साहित्य आणि २२ हजार ८६0 रुपांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. (प्रतिनिधी,Lokmat)

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home