Sunday, July 3, 2016

मुंबईः पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस

मुंबईः पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस

*एकाच दिवसात 38 हजार दशलक्ष घनमीटर पाण्याची वाढ*

तळकोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची दमदार हजेरी, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये संततधार

*रेल्वेच्या तिनही मार्गांवर मेगाब्लॉकः*

मध्य रेल्वेः मुलुंड ते माटुंगा, अप स्लो लाईन, स. 11.15 ते दु. 3.15 पर्यंत

पश्चिम रेल्वेः सांताक्रुझ ते गोरेगाव, अप आणि डाऊन फास्ट लाईन, स. 10.35 ते दु. 3.35 पर्यंत

हार्बर लाईनः कुर्ला ते वाशी, अप आणि डाऊन मार्ग, स. 11.30 ते दु. 3.30 पर्यंत

सकाळच्या हेडलाईन्सः
————————
तब्बल 24 तास कोसळल्यानंतर मुंबईत पावसाची काहीशी विश्रांती, कांदिवली-मालाडमध्ये रिमझिम सरी, तर पूर्व उपनगरांमध्ये पाऊस थंडावला
—————-
कोकणात सलग सातव्या दिवशी धुवाधार पाऊस, खेड-महाडच्या बाजारपेठेत पाणी, पश्चिम महाराष्ट्रात दमदार एन्ट्री, कोल्हापूरचा राजाराम बंधारा पाण्याखाली
—————-
मुख्यमंत्र्यांनी घेतली ठाणे शहर पोलिसांची शाळा, समस्यांच्या ट्विटकडे कानाडोळा करणाऱ्यांना
शिकवला धडा, उदाहरणादाखल स्वतः ट्विट करून दाखवलं
—————–
कुठलंही विधान विचार केल्याशिवाय करत नाही, पेशवाई आणि छत्रपतींवरच्या टिप्पणीवर शरद पवार ठाम, जातीय राजकारणाला वेग
————–
यवतमाळमध्ये विजय दर्डांच्या शाळेची तोडफोड, विद्यार्थ्यांच्या लैंगिक छळाप्रकरणी मुख्याध्यापक अटकेत, मुख्यमंत्र्यांचं कारवाईचं आश्वासन
—————
मुंबईतमधील चेंबूर परिसरातील आरसीएफ कॉलनीत दुरुस्तीदरम्यान बॉयलरचा स्फोट, तीन कामगारांचा मृत्यू, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु
—————-
ढाक्यामध्ये दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्यांमध्ये भारतीय तरूणीचा समावेश, ओलीस ठेवलेल्या 20 जणांची निर्घृण हत्या,तर 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
—————-
फळ-भाजीपाला बाजार समितीतून वगळण्याच्या अध्यादेशाला व्यापाऱ्यांचा विरोध, उद्या राज्यभरातल्या बाजार समित्यांमध्ये बंद
———————

Labels: , , , , ,

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home