Sunday, July 24, 2016

बिलांच्या तक्रारींकडे महावितरणचे दुर्लक्ष

वसई :  बिलांच्या तक्रारींकडे महावितरणचे दुर्लक्ष
वसई : महावितरणकडून अद्यापही भरमसाठी रकमेची वीज बिले पाठवली जात असलने ग्राहक हैराण झाले आहेत. यापरिसरातील महावितरणच्या कार्यालयात दररोज शेकडो तक्रारी येत असल्या तरी महावितरणचे अधिकारी काणाडोळा करीत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
त्याविरोधात अनेक पक्षांनी आंदोलने केली आहेत. मात्र, आंदोलनकर्त्यांना आश्‍वासन देऊन मोकळे करणारे अधिकारी वीज बिलांवर अंकुश ठेवण्यास अपयशी ठरत आहेत. रिडींग घेण्यासाठी नेमण्यात आलेले ठेकेदार नियमीतपणे रिडींग घेत नाहीत. त्यामुळे स्लॅब वाढून ग्राहकांना वाढीव बिले येत असल्याची बाब उजेडात आल्यानंतरही महावितरणकडून यावर कोणताच अंकुश ठेवण्यात आलेला नाही.
शुक्रवारी नवघर-माणिकपूर शहरातील अनेक महिलांनी वाढीव बिलाविरोधात अधिकार्‍यांना घेराव घातला. मला स्वत:ला तब्बल वीस हजार रुपयांचे बिल आले. माझ्यासोबत असलेल्या असंख्य महिलांना पाच ते दहा हजार रुपयांची बिले आली आहेत. आम्ही अधिकार्‍यांकडे गेलो मात्र, त्यांच्याकडून उत्तरे नाहीत. त्यामुळे ग्राहक संतापले आहेत, अशी माहिती बविआच्या श्रद्धा मोरे यांनी दिली. (प्रतिनिधी)

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home