Friday, July 1, 2016

विक्रमगडचा पलुचा धबधबा हाऊसफुल्ल

 • राहुल वाडेकर,
  विक्रमगड- पक्ष्यांचा किलबिलाट, पाण्याचा खळखळाट असे निसर्ग सौदर्य लाभलेला विक्रमगडमधील मनोहरी पिकनिक पाईट म्हणजेच पलुचा धबधबा पर्यटकांना खुणावू लागला असून येथील मुबलक पक्षी प्रजातींमुळे संशोधक व छायाचित्रकारांनी सुद्धा इकडे गर्दी करायला सुरुवात केली आहे.
  विक्रमगड ते जव्हार या हरितपट्ट्यामध्ये पलुचा आणि दाभोसा धबधबा तरुणाईचे आकर्षण ठरत आहे. मुंबई आणि ठाणेकर तरुणाई शनिवार, रविवार या दिवशी मोठ्या प्रमाणात येथे हजेरी लावते. हाच जंगलपटटा निसर्गमित्रासाठी पर्वणीच़ ठरतोे. विविध प्रजातीचे व रंगीबेरंगी पक्षीही येथे पाहावयास मिळत असल्यानें पक्षी निरिक्षकही या भागात येऊ लागले आहे.
  पलुचा धबधबा हा जव्हार-विक्रमगड महामार्गापासून जांभागाव हददीतील डोंगरी भागात वसलेला आहे़ जून ते आॅक्टोंबर या काळात येथे मोठया प्रमाणात पर्यटक येतात. दगड व चिखलवाट तुडवतच येथे जावे लागते़ या धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी असते़ मुंबई परिसर व अन्य ठिकाणाहून पर्यटक येथील निसर्गाचे अद्भूत रुप पाहावयास येतात़ या धबधब्यांच्या डोंगर माथ्यावरुन हिरव्या वनराईतून डोकावणारे छोटे छोटे धबधब रोमांचित करीत आहेत़
  या धबधब्याचा पर्यटनदृष्टया विकास व्हावा, यासाठी ठोस प्रयत्नांची गरज असून येथील ग्रामस्थ यासाठी प्रयत्नशिल आहेत़
  या धबधब्याच्या पठारी भागात धरण बांधल्यास हा धबधबा बारमाही वाहु शकतो तसेच या भागातील जमीन ओलिताखाली येऊन पंचक्रोशीतील भाग सुजलाम, सुफलाम होऊ शकेल याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. (वार्ताहर)

Labels: , , , ,

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home