Saturday, July 30, 2016

डहाणू, वसई, वाड्याची गरज : स्वतंत्र बाजारपेठ हवी

डहाणूचे चिकू, वसईची सूकेळी, वाडयाचा कोलम ,  डाहणू, तलासरी, पालघर, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा स्वतंत्र बाजारपेठ हवी
डहाणूचे चिकू, वसईची सूकेळी, वाडयाचा कोलम ,  डाहणू, तलासरी, पालघर, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा स्वतंत्र बाजारपेठ हवी
डहाणूचे चिकू, वसईची सूकेळी, वाडयाचा कोलम या सारखी प्रत्येक तालुक्याची बागायती उत्पादनासाठी प्रसिध्द आहे. शिवाय पालघर जिल्हयात फूले आणि भाजीसाठी स्वतंत्र बाजारपेठ नसल्याने दलाल मलामाल तर शेतकरी हलाल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. येथे खरेदी विक्रीसाठी मुख बाजारपेठा नसल्याने डाहणू, तलासरी, पालघर, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा येथील शेतकर्‍यांना १२५ ते १५0 किमी अंतर कापून भाजी मंडई साठी वाशी येथे तर फूल बाजारासाठी दादर गाठावे लागते. यामूळे वाहतूकीचा त्रास वाविण्यासाठी या भागात दलालांची मोठी साखळी तयार झाली आहे.
दलालांच्या एकजूटीमुळे शेतकरी शेतमाल विकू शकत नाही. अशी परिस्थिती आहे. शेतकर्‍यांची ही पिळवणूक टाळण्यासाठी मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत चारोटी ते वसई दरम्यान, बाजारपेठ झाल्यास शेतकर्‍यांना भरपूर मोबदला मिळवून ते आर्थिक सक्षम होईल. अशी मागणी पालघर जिल्हयात होऊ लागली आहे.
मुंबई शहराला दररोज भाजीपाला पूरवठा करण्यात पालघर, डहाणू, तलासरी तालुक्यांचा सिहाचा वाटा आहे. येथील शेकडो प्रगतशील शेतकरी पावसाळयानंतर नवनवीन तंत्रज्ञानाच्या आधारे मोठया प्रमाणात भाजीपाला लागवड करीत असतात.
वानगाव, चिंचणी, डहाणू, केळवे, भोगरबाव, असनगाव, चंडीगाव सारख्या ठिकाणी तर दररोज येथील दूधी, टॉमेटो, भेंडी, कारली, काकडी, मिरची इत्यादी भाजीपाला मुंबई शहरात पाठविला जातो.
तसेच गुलाबाचे फूल, झेंडू, मोगरा, पहाटेच्या सुमारास मुंबई व इतर शहराला पाठविला जातो. येथील शेतकरी परंतू जिल्हयात भाजी आणि फुलांसाठी स्वतंत्र बाजारपेठ नसल्याने दलालामार्फत गेलेल्या मालाची वाहतूक दलाली, हमाली कापून शेतकर्‍याच्या हातात अल्प मोबदला येत असल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहे. शेतकर्‍यांची होणारी पिळवणूक टाण्यासाठी मुंबई-अहमदाबाद महार्मालगत चारोटी ते मनोर, वसई दरम्यान बाजारपेठ झाल्यास शेतकर्‍यांची होणारी पिळवणू थांबेल. वाहतूक खर्च वाचेल. ग्राहकांना कमी दारात भाजी मिळू शकते. आणि शेतकर्‍यांना थेट पैसा हातात पडू शकतो. एकीकडे शेतीसाठी लागणार्‍या अवजारे आणि खते बियाणे, किटक नाशके, मजुरीचे दर यांच्या वाढत्या किंमती या मध्ये शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. त्यातच शेतकर्‍यांना मुंबई सारख्या ठिकाणच्या वाहतूकीचा खर्च ही द्यावा लागातो. हे सर्व शेतकर्‍यांच्या खिशातून जात असते. त्यातच शेतकर्‍यांना योग्य भाव ही मिळत नसल्याने शासनाने या भागात स्वतंत्र बाजारपेठ उभी करण्याची मागणी होत आहे.
शौकत शेख ■ डहाणू

Labels: , , , , , , , , ,

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home