Thursday, July 14, 2016

खासदारांची वसई किनार्‍यावरील गावांची पाहणी

चिंतामण वनगा  खासदारांची वसई किनार्‍यावरील गावांची पाहणी
विरार : गेल्या आठवड्यात समुद्राच्या उधाणाने नुकसान झालेल्या वसई समुद्र किनार्‍यावरील गावांना खासदार चिंतामण वनगा यांनी भेट घेऊन तेथील नुकसानीची पाहणी केली. अर्नाळा किल्ला आणि कळंब येथे धूपप्रतिबंधक बंधारे बांधण्याच्या कामाला प्रशासकीय मंजूरी मिळाली असून कामांना लवकरच सुरुवात होईल, अशी माहिती खासदार वनगा यांनी दिली. उधाणाच्या तडाख्याने अर्नाळा किल्ला गावातील पंचवीस घरे वाहून गेली. सरकारने बांधलेला निवारा शेड व मासे सुकवण्यासाठी असलेला चौथरा नामशेष झाला आहे. तर अर्नाळा, रानगाव, कळंब, भुईंगाव, येथील किनार्‍यावरील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या परिसराची पाहणी करून खासदार वनगा यांनी नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळवून देण्याचे आदेश संबंधित खात्याला दिले, अशी माहिती भाजपाचे वसई तालुका अध्यक्ष महेंद्र पाटील यांनी दिली. (प्रतिनिधी)

Labels: , , , ,

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home