Tuesday, July 19, 2016

मुंबई ‘लेप्टो’चा धोका वाढला.

मुंबई ‘लेप्टो’चा धोका वाढला.

मुंबई  पालिका रुग्णालयात ७३ रुग्ण दाखल

मलेरिया आणि त्यानंतर डेंग्यू या आजारांच्या साथीनंतर मागील वर्षीपासून लेप्टोच्या साथीने शहरात कहर केला आहे. गेल्या चार दिवसांत पालिका रुग्णालयांत लेप्टोच्या उपचारांसाठी ७३ रुग्ण दाखल झाले आहेत. डेंग्यू रुग्णांपेक्षा ही संख्या अधिक आहे. पालिकेकडे साधारण ३० टक्के रुग्ण येत असल्याने प्रत्यक्षातील लेप्टो रुग्णांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे.

या वर्षी पाऊस जूनच्या तिसऱ्या आठवडय़ात सुरू झाला. जुलच्या पहिल्या दिवसापासून लेप्टोच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली. दर दिवशी पाच ते सात रुग्ण पालिकेच्या विविध रुग्णालयांत दाखल होत आहेत. गेल्या चार दिवसांत तर ही संख्या दररोज वीसहून अधिक होते आहे. गुरुवार ते रविवार या चार दिवसांत लेप्टोचे तब्बल ७३ रुग्ण आले असून डेंग्यू (५३) रुग्णांपेक्षा अधिक आहे. लेप्टोमुळे कांदिवली पूर्व येथील हनुमाननगरमधील ३५ वर्षीय महिलेचा १५ जुल रोजी कांदिवलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात मृत्यू झाला. हा लेप्टोचा पहिला बळी ठरला. गेल्या वर्षी जुलच्या पहिल्या पंधरवडय़ात लेप्टोमुळे १२ जणांचा मृत्यू झाला होता. मात्र लेप्टोचे हे रुग्ण दहिसर ते गोरेगाव या भागातील होते. या वेळी पश्चिम, पूर्व उपनगरांसह दक्षिण भागातही लेप्टोचा प्रसार होताना दिसत आहे. दहिसर, बोरिवली, कांदिवली, अंधेरी, वांद्रे, परळ, भायखळा, कुर्ला, घाटकोपर, भांडुप येथे लेप्टोचे रुग्ण आढळत आहेत.
- See more at: http://www.loksatta.com/mumbai-news/leptospirosis-cases-increase-in-mumbai-1269665/#sthash.M2kpiLQ8.dpuf

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home