Saturday, July 30, 2016

बोईसर एसटी डेपोत तळे की तळ्यात डेपो ?

 बोईसर एसटी डेपोत तळे की तळ्यात डेपो ?
एस.टी. डेपोमधून पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थितपणे होत नसल्याने डेपोच्या एका भागात पाणी साचून अक्षरश: तळ्य़ाचे रुप आले असल्याने डेपोमध्ये तळे की, तळ्य़ात डेपो असा प्रश्न प्रवाशांना पडत आहे. तसेच उर्वरित सर्वभागामध्ये खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने रोज हजारो पवाशांना तेथे साचून राहिलेल्या दुर्गधीयुक्त पाण्यातून आणि खड्ड्यातून मार्गक्रमण करावे लागते आहे.
बोईसर एस.टी. डेपातून कोल्हापूर, अहमदनगर, बिड, पुणे, औरंगाबाद, पुणे अशा एकूण २१ लांब पल्ल्यांच्या तर ठाणे, कल्याण इ मध्यम पल्लयाच्या तर परिसरातील तीन ते चाळी किमी. पर्यंतच्या ग्रामीण मागातील प्रवाशांची वाहतूक केली जाते या मध्ये रोखीने प्रवास करणार्‍या प्रवाशांबरोबरच मासि तसेच त्रैमासिक पासेसद्वारे प्रवास करणारे प्रवासी आणि शाळकरी विद्यार्थीआणि विद्यार्थिनी मिळून सुमारे २२ ते २५ हजार प्रवासी रोज बाईसर डपोच्या बसेसमधून प्रवास करीत असतात.
या डेपामध्ये सध्या एकूण ६५ बसेस उपलब्ध असून प्रतिदिन सुमारे १८ हजार किमी. सरासरी एसटी धावते तर त्या माध्यमाूतन दिवसाचे उत्पन्न साधारणत: पाच ते सहा लाख रुपये मिळत आहे. एवढे उत्पन्न मिळत असूनही डेपोमध्ये साचून राहणार्‍या पाण्याचा जलदपणे निचरा होण्याकरिता संबंधित यंत्रणेद्वारे जागोजागी पडलेल्या खड्यांचा मानसिक त्रास वयोवृद्ध, महिला तसेच शाळकरी विद्यार्थ्यांनी सहन करावा लागत आहे.
साचलेल्या दुर्गंधीयुक्त घाण पाण्यातून जीवाचा आकांत कयन कशी बशी आपापल्या गावाकडे जाणारी बस पकडावी लागते तर साचून राहात असलेलया पाण्यामुळे आरोग्यावरही त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याला जबाबदार कोण असा संतत्पपणे प्रश्न प्रवासी विचारत आहेत. केंद्र व राज्य शासन सद्या स्वच्छ भारत अभियान राबवित आहे परंतु त्याच शासनाच्या आस्थापनेत घाणीचे साम्राज्य या डेपोमध्ये पहावयास मिळत आहे.
बर्‍याच वेळा स्थानकातून गरोदर महिला तसेच रुग्ण प्रवास करतात. त्यांना बसची वाट पहावी लागते. मात्र, आरोग्याच्या द्रुष्टीने हाणीकारक वातावरणामुळे या प्रवाशांना मोठय़ा त्रासाचा सामना करावा लागतो. बोईसर एसटी डेपोमध्ये पडलेल्या खड्यासंदर्भात सिव्हिल सेक्शनला पत्राद्वारे कळविण्यात आले असून लवकरच तो प्रश्न मार्गी लागेल.
- प्रमोद तेलवेकर, डेपो मॅनेजर. डेपोमध्ये साचलेले दुर्गंधीयुक्त पाणी भरधाव वेगाने जाणार्‍या बसेसमुळे प्रवाशांच्या अंगावर उडून त्यांचे कपडे खराब होतात तर पाऊसाच्या पाण्याने खड्डे भरल्यानंतर खड्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्यने वयोवृद्धांबरोबर सर्वसाधारण प्रवाशांना चाचपडत बस पकडावी लागते.
-पंकज राऊत■ बोईसर

Labels:

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home