Friday, July 29, 2016

वसई-विरार : ‘राष्ट्रवादी’चे उद्या ‘भीक मांगो’ आंदोलन

वसई-विरार : ‘राष्ट्रवादी’चे उद्या ‘भीक मांगो’ आंदोलन
वसई-विरारमधील प्रवाशांना कोणतीही चांगली सुविधा न देणाऱ्या परिवहन सेवेच्या ठेकेदाराच्या आर्थिक फायद्यासाठी वसई-विरार शहर महापालिकेने तिकिटात दरवाढ केली असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. यामुळे प्रवाशांवर आर्थिक बोजा येणार असून दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 'भीक मांगो' आंदोलन शनिवारी करणार आहे.

परिवहन सेवा चालविणारा ठेकेदार जुन्या कालबाह्य बसगाड्या चालवत आहे. अनेक बसेस धूर ओकत असून प्रदुषणात वाढ करीत आहेत. बऱ्याचशा बसगाड्या रस्त्यात बंद पडतात. बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांना बसवून वाहतूक केली जाते. बसमधील काही कर्मचारी प्रवाशांशी अरेरावी व उद्धट वर्तन करतात. अनियमित बस सेवेमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. प्रवाशांच्या गैरसोयी दूर करून त्यांना दिलासा देण्याऐवजी प्रशासनाने भाडेवाढीचा निर्णय घेतला आहे. त्याला सर्वपक्षीय नगरसेवकांनी मान्यता दिल्यामुळे परिवहन सेवेच्या तिकिटात वाढ करण्यात आली आहे.

ठेकेदाराच्या आर्थिक फायद्यासाठी प्रवाशांवर लादण्यात आलेली दरवाढ पालिका प्रशासनाने मागे घ्यायला हवी, अशी मागणी करण्यात आली आहे. पालिका परिवहन सेवा दरवाढीच्या विरोधात शनिवार ३० जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता नालासोपाऱ्यात तुळींज पोलिस स्टेशनसमोर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते 'भीक मागो' आंदोलन करणार आहोत, असे राष्ट्रवादीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

Labels: , , ,

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home