Monday, July 4, 2016

विषाणूजन्य तापाच्या रुग्णांत वाढ

विषाणूजन्य तापाच्या रुग्णांत वाढ
वातावरणात आलेला थंडावा आणि हवेतील ओलसरपणा यामुळे सध्या पालिका आणि इतर सरकारी रुग्णालयांत विषाणूजन्य तापाचे रुग्ण दाखल होत आहेत. या तापाकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला डॉक्‍टर देत आहेत.

मेपासूनच विषाणूजन्य तापाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. पालिका आणि सरकारी रुग्णालयांत दिवसाला सुमारे 700 ते 800 रुग्ण दाखल होत आहेत. अनेकदा तापावर घरगुती उपचार करून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. डॉक्‍टरांच्या मतानुसार, सुरुवातीचा हा ताप दुर्लक्ष केल्यास मोठा होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी त्वरित उपचार घेणे गरजेचे आहे.

साथीच्या आजारांचे तज्ज्ञ डॉ. ओम श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मलेरिया किंवा डेंगीची लक्षणे नसल्यास रुग्णाला तापावर उपचार सुरू केले जातात. ताप नियंत्रणात आला नाही, तर या दोन्हींपैकी एका आजाराची शक्‍यता अधिक असू शकते. रक्त चाचणीत डेंगी किंवा मलेरिया स्पष्ट झाल्यास त्यानुसार उपचार केले जातात. अनेकदा रक्त चाचणीत डेंगी किंवा मलेरिया न आढळल्यास रुग्ण तापाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे डोक्‍यात ताप जाणे, अशक्तपणा, शरीरातील पाणी कमी होणे यांसारख्या तक्रारी उद्‌भवतात.

Labels: , , , , , ,

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home