Friday, July 15, 2016

विरार होणार "वाय-फाय फास्ट'

विरार होणार "वाय-फाय फास्ट'
मुंबई - मुंबई सेंट्रल स्थानकानंतर प्रवाशांना आता बेलापूर, बदलापूर विरारसह इतर 15 स्थानकांवर वाय-फाय सुविधा मिळणार आहे. 15 ऑगस्टपासून ही सेवा प्रवाशांना वापरता येईल, अशी घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गुरुवारी केली.

पश्‍चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकावर जानेवारीत पहिल्यांदा वाय-फाय सुविधा देण्यात आली. देशातील हे पहिले वाय-फाय स्थानक ठरले. "गुगल‘ आणि "रेलटेल‘ यांच्या उपक्रमाद्वारे ही सुविधा सुरू झाली. वर्षअखेरपर्यंत देशातील गर्दीच्या 100 स्थानकांवर वाय-फाय देण्यात येईल, असे रेल्वेमंत्री प्रभू यांनी जाहीर केले होते. ए-वन गटातील सीएसटी स्थानकावर वाय-फाय सुरू झाले. आता सी गटातील स्थानकांवर ही सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य, हार्बर व पश्‍चिम मार्गावरील 15 स्थानकांची त्यासाठी निवड झाली आहे.

Labels: , , , ,

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home