Thursday, July 14, 2016

ऑलिव्ह रिडले कासव सापडले, पुन्हा अर्नाळा समुद्रात

 ऑलिव्ह रिडले कासव सापडले, पुन्हा अर्नाळा समुद्रात
विरार : अर्नाळा समुद्रकिनारी बृधवारी सकाळी कोळी बांधवांच्या जाळयात ऑलिव्ह रिडले जातीचे कासव सापडले होते.काही लोक ते कासव घरी घेऊन जात असताना वसई वैभव टीमचे प्राणीमित्न महेश भोईर व त्यांच्या सहकार्‍यांनी त्याला समुद्रात सोडले.
गेल्याच आठवडयात चिंचणी समुद्रकिनारी दांडेपाडा येथे ऑलिव्ह रिडले जातीचेच समुद्री कासव जखमी अवस्थेत सापडले होते. त्यावेळी स्थानिक मच्छीमार व युवा दांडेपाडा मांगेला संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या दुर्मीळ जातीच्या कासवाला डहाणू येथील 'वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन अँण्ड अँनिमल वेल्फेअर असोसिएशन' या वन्य व समुद्री जीवरक्षक संस्थेत दाखल केले. तत्काळ उपचार केल्यामुळे त्याचा जीव वाचला आहे.
या किनार्‍यावर गेल्या वर्षभरात अनेक सागरी जीव मृत किंवा जखमी अवस्थेत कोळी बांधवांच्या जाळ्यात सापडले आहे. यामध्ये डॉल्फीन व दुर्मीळ प्रजातींच्या कासवांचा समावेश आहे. आतापर्यंत ३0 पेक्षाही जास्त डॉल्फीन मृत झाल्याचे मच्छीमारांकडून सांगण्यात येते. (वार्ताहर) डॉल्फीन व कासवे स्फोटामुळे दगावतात!
काही दिवसांपूर्वी ओएनजीसी कंपनीच्यावतीने एक सर्वे केला जात होता. त्यात खोल समुद्रात स्फोट करण्यात आल्यामुळे त्याच्या हादर्‍याने डॉल्फीन मासे व कासवे दगावत असल्याचा आरोप मच्छीमार बांधव करीत आहेत. काही महिन्यांपुर्वी २५ किलो वजनाचे याच प्रजातीचे कासव राजोडी समुद्रकिनारी सापडले होते. ओएनजीसी कंपनीच्यावतीने करण्यात येणार्‍या स्फोटांबद्दल अजूनही ठोस माहिती नसली तरी जखमी व मृत समुद्री जीव डहाणू ते वसई किनारपट्टीवर येण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

Labels: , , , , ,

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home