Sunday, July 17, 2016

वसई-विरारकरांना शवविच्छेदनगृह नाही

वसई-विरारकरांना शवविच्छेदनगृह नाही

विरार : वसई विरार महापालिकेची स्थापना होऊन सहा वर्षे उलटून गेली तरी पालिकेच्या रुग्णालयांमध्ये शवविच्छेदन आणि शवागरांची सुविधा अद्याप सुरु करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरीकांना जिल्हा परिषद आणि ग्रामीण रुग्णालयात मोक्याच ठिकाणी असलेल्या जावे लागत आहे. लोकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी पालिकेने प्रत्येक विभागात शवविच्छेदन गृह आणि शवागर सुरु करावे अशी मागणी शिवसेनेचे गटनेते धनंजय गावडे यांनी केली आहे.
वसई-विरार महानगरपालिकेच्या रुग्णालयात शवागार आणि शवविच्छेदन गृह उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब वसईतील एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने माहितीच्या अधिकाराखाली मिळवलेल्या माहितीवरुन उघडकीस आली आहे. सध्या या परिसरातील मृतदेह मुंबईतील रुग्णालयात न्यावे लागतात आणि याचा त्रास मृतांच्या नातेवाईकांना सहन करावा लागतो. आत्महत्या, घातपात आणि अपघातांच्या प्रकरणामध्ये पोलीसांना शवविच्छेदन अहवाल वेळेत मिळत नसल्याने तपासात विलंब होतो व परिणामी पोलीसांचा वेळ वाया जातो आणि त्यांच्या कामाचा व्याप देखील वाढतो. (प्रतिनिधी)
महिन्याकाठी दहा अपघात 
वसई-विरार शहराची लोकसंख्या सुमारे २0 लाखांत पोहोचली आहे. त्यातच तालुक्यात महिन्याकाठी आठ ते दहा जणांचे अपघाती मृत्यू होतात. रेल्वे आणि अन्य इतर छोट्या-मोठय़ा दुर्घटनांची आकडेवारी तर वेगळीच असते.वसईतील नवघर, कामण, सोपारा आणि विरार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जरी मृतदेहांचे शवविच्छेदन केले जात असले तरी एक शवविच्छेदन सुरु असताना अन्य मृतदेह आल्यास मृतांचे नातेवाईक येई पर्यंत थांबावे लागते तर काही वेळा शवविच्छेदन करणारा कर्मचारी गैरहजर असतात. तेव्हे कर्मचारी येई पर्यंत मृताच्या नातेवाईकांना थांबावे लागते.

Labels: , ,

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home