Tuesday, July 19, 2016

आगाशी पोलीसांची दमदार कामगीरी

आगाशी पोलीसांची दमदार कामगीरी ( माहिती सौजन्य आमची वसई )
परवाची गोष्ट, माझी मुलगी विरार हून घरी परतत असताना कार मधून जाणाऱ्या काही हुल्लड़ बाज तरुणांनी कट मारण्याच्या इराद्याने तिला जोरदार धडक दिली. नशीब बल्व्वतर म्हणून ती वाचली पण खरी गोष्ट तर पुढेच आहे. हे सगळं पाहणाऱ्या मागून येणाऱ्या एका दुसऱ्या दुचाकी वाल्याने हा सगळा प्रकार पाहून मागचा पुढचा कुठलाच विचार न करता त्यांचा पाठलाग केला पण ते दोघे बरेच पुढं निघून गेले होते. मग पुढे ओलांडा येथे चौकी वर असणारे एक पोलीस दिसताच झाला प्रकार त्यांनी लगेचच त्या पोलीस साहेबांना कथन केला, आणि तुम्हांला आश्चर्य वाटेल पण, आगाशी पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात त्या पाच हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना अर्नाळा समुद्र किनार्यावरुन जेर बंद केले. या सगळ्या घटना क्रमात तिकडे माझ्या मुलीला आणखीन दोन महिलांनी प्रथमोपचार देत मला कळवलं आणि मग मी तिला जवळच असलेल्या सहयोग हॉस्पिटल मधे नेवुन उपचार केले. तो पर्यंत मला शोधत ती पाठलाग करणारी व्यक्ती, त्यांचे नाव ब्रिजेश सिंघ आपली सगळी कामं टाकून पुन्हा मला शोधत हॉस्पिटल मधे पोहचले आणि मला घेवून पुन्हा आम्ही पोलीस स्टेशन ला गेलो.
त्या सर्वांचे खास करून काहीही सम्बंध नसताना त्या मागून येणाऱ्या बाईक वाल्याचे म्हणजेच श्री ब्रिजेश सिंग यांचे आणि अवघ्या अर्ध्या तासात कुठलीच माहिती उपलब्ध नसताना त्या हुल्लडबाजी करणाऱ्या मुलांना अटक करणाऱ्या आगाशी पोलिसांचे, रस्त्यात थांबुन माझ्या मुलीला मदत करणाऱ्या त्या महिलांचे आणि तिकडच्या दुकान दारांचे मी मनपूर्वक आभार मानतो
-------नितीन ठाकुर,सत्पाळा-विरार

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home